रायपूरच्या मैदानात रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील ५७ वा सामना खेळवण्यात येत आहे. प्लेऑफ्सच्या शर्यतीत स्थान भक्कम करण्यासाठी दोन्ही संघासाठी हा सामना महत्त्वपूर्ण असताना पावसाच्या बॅटिंगमुळे नाणेफेकीला उशीर होत आहे. पाऊस थांबला असून खेळ सुरु होणार असला तरी जर पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना होऊ शकला नाही तर कोणत्या संघाला फटका बसणार हा प्रश्न अनेक चाहत्यांना पडला आहे. इथं जाणून घेऊया पावसामुळे प्लेऑफ्सच्या प्रवासात कुणाला बसेल फटका? त्यासंदर्भातील सविस्तर
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
RCB आणि KKR यांच्यात जमीन-आसमानचा फरक
रजत पाटीदारच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघ ११ सामन्यानंतर ७ विजयासह १४ गुणांची कमाई करत दुसऱ्या स्थानावर आहे. हा सामना जिंकून त्यांना प्लेऑफ्सचं स्थान निश्चित करण्याची संधी आहे. दुसरीकडे कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाला याआधी पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यात पावसामुळे प्रत्येकी १-१ गुण विभागून मिळाला होता. त्यामुळे १० सामन्यानंतर अजिंक्य रहाणेचा संघ ४ विजय आणि अनिर्णित सामन्यात मिळालेल्या एका गुणासह ९ गुण मिळवत गुणतालिकेत आठव्या स्थानावर आहे.
विराटकडून प्रेरणा; आईच्या मार्गदर्शनाखाली फिटनेस स्तर उंचावला! IPL गाजवणाऱ्या साईची खास गोष्ट
सामना होण्याची आस, पण रद्द झाला तर काय?
जर हा सामना पावसाच्या व्यत्ययामुळे होऊ शकला नाही तर नियमानुसार दोन्ही संघांना प्रत्येकी १-१ गुण दिला जाईल. या परिस्थितीत १२ सामन्यानंतर RCB च्या खात्यात १५ गुण जमा होतील. प्लेऑफ्समध्ये पात्र ठरण्यासाठी आरसीबीला उर्वरित दोन सामन्यात किमान एक सामना जिंकावा लागेल. या परिस्थितीत कोलकाताच्या खात्यात ११ सामन्यानंतर १० गुण जमा होतील. उर्वरित सर्वच्या सर्व ३ सामने जिंकून त्यांना १६ गुणांपर्यंत पोहचता येईल. दोन्ही संघाचे स्वबळावर प्लेऑफ्स गाठण्याची आस कायम राहिल. पण RCB च्या तुलनेत KKR साठी समीकरण अधिक आव्हानात्मक होईल.
पाऊसाची बॅटिंग अन् कट-ऑफचा नियम
निर्धारित वेळेनुसार सामना संध्याकाळी ७ वाजून २० मिनिटांनी सुरू झाल्यास, मधल्या २० मिनिटांच्या ब्रेकसह तो रात्री १० वाजून ५० मिनिटांपर्यंत संपण्याची अपेक्षा असते. सामना सुरू होण्यास उशीर झाल्यास अतिरिक्त १ तासाची तरतूद ठेवण्यात आली आहे. या अतिरिक्त वेळेत सामना पूर्ण होऊ शकत असेल, तर षटकांमध्ये कपात केली जात नाही. मात्र, उशीर अधिक वाढल्यास उपलब्ध वेळेनुसार षटकं कमी केली जातात.
IPL मध्ये सामना अधिकृत मानला जाण्यासाठी दोन्ही संघांनी किमान ५-५ षटके खेळणे आवश्यक आहे. अतिरिक्त वेळेत सामना सुरु झाला तर षटके कमी करण्याशिवाय सामना खेळवण्याचा निर्णय घेतला जातो. हा टप्पा पूर्ण झाल्यास सुधारित लक्ष्य ठरवण्यासाठी डकवर्थ लुईस (Duckworth-Lewis-Stern) नियम लागू केला जाईल. जर दोन्ही संघांना ५ षटकेही खेळता आली नाहीत, तर सामना रद्द घोषित केला जातो. त्यानंतर दोन्ही संघांना प्रत्येकी १-१ गुण दिला जातो.
मॅच झाली तर कट ऑफ नियमानुसार षटकांची कपात होणार का?
रायपूरच्या मैदानता पाऊस थांबल्यानंतर मैदानातील कव्हर्स हटवण्यात आले असून ८ वाजून १५ मिनिटांनी पंच मैदानाचे निरीक्षण करणार आहेत. ८ वाजून ३० मिनिटांनी नाणेफेक झाल्यावर ८.४५ मिनिटांनी पहिला चेंडू फेकला जाईल, अशी माहिती समोर येत आहे.
Web Summary : Rain delays RCB vs KKR crucial IPL match. If washed out, both get a point. RCB needs one win from two games for playoffs; KKR needs to win all remaining matches, making their path tougher.
Web Summary : बारिश के कारण RCB बनाम KKR का महत्वपूर्ण IPL मैच बाधित। रद्द होने पर दोनों को एक अंक। RCB को प्लेऑफ के लिए दो मैचों में से एक जीत की जरूरत; KKR को बाकी सभी मैच जीतने होंगे, जिससे उनका रास्ता मुश्किल होगा।