Join us
Daily Top 2Weekly Top 5

ICC Test Rankings : या वर्षांत एकही टेस्ट न खेळता बुमराह ठरला बेस्ट! यशस्वी गिलही फायद्यात

वनडेसह टी-२० मध्ये दबदबा; कसोटीत टीम इंडिया कितव्या स्थानी?

By सुशांत जाधव | Updated: May 13, 2026 18:59 IST

Open in App

भारतीय संघ या वर्षांत एकही कसोटी सामना खेळलेला नाही, पण त्यातही जसप्रीत बुमराहनं कसोटी क्रमवारीत आपला दबदबा कायम ठेवला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं बुधवारी कसोटी क्रमवारी जाही केली. यात बुमराह ८७९ रेटिंग गुण असून तो जगातील नंबर-१ कसोटी गोलंदाज ठरला आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

यशस्वीसह शुभमन गिल टॉप १० मध्ये

फलंदाजांच्या क्रमवारीत यशस्वी जैस्वाल आणि भारताचा कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिल ही दोघे आघाडीच्या १० मध्ये आहेत. यशस्वी जैस्वाल ७५० गुणांसह आठव्या स्थानी असून गिलला एका स्थानाचा फायदा झाला आहे. तो ७३० गुणांसह नवव्या क्रमांकावर पोहोचला आहे. कसोटीत फलंदाजाच्या क्रमवारीत इंग्लंडचा माजी कर्णधार जोस रूट हा ८८० गुणांसह फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी कायम आहे. त्याच्यानंतर हॅरी ब्रूक, ट्रॅविस हेड आणि स्टीव्ह स्मिथ आघाडीच्या चौथ्या क्रमांकावर आहे. 

विराटकडून प्रेरणा; आईच्या मार्गदर्शनाखाली फिटनेस स्तर उंचावला! IPL गाजवणाऱ्या साईची खास गोष्ट


२०२६ मध्ये भारताने एकही कसोटी खेळलेली नाही, तरी...

भारतीय संघाने २०२६ मध्ये अद्याप एकही कसोटी सामना खेळलेला नाही. नोव्हेंबरमध्ये टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अखेरचा कसोटी सामना खेळला होता. तरीही कसोटी क्रमवारीत गोलंदाजांच्या यादीत जसप्रीत बुमराह अव्वलस्थानी कायम आहे. गोलंदाजांच्या यादीत ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क एका स्थानाच्या फायद्यासह दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. न्यूझीलंडचा मॅट हेन्री तिसऱ्या स्थानावर असून ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार पॅट कमिन्स चौथ्या स्थानावर आहे. मोहम्मद सिराज १२व्या स्थानावर आहे. तर रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव अनुक्रमे १४व्या आणि १५व्या स्थानावर आहेत.

वनडेसह टी-२० मध्ये दबदबा; कसोटीत टीम इंडिया कितव्या स्थानी?

कसोटी क्रमवारीआधी आयसीसीच्या वार्षिक वनडे क्रमवारीत भारतीय संघाने अव्वलस्थान कायम राखले होते. एवढेच नाही तर टी-२० क्रिकेटमध्येही भारतीय संघ अव्वलस्थानावर आहे. कसोटीमध्ये ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यापाठोपाठ भारतीय संघ तिसऱ्या स्थानावर आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : ICC Test Rankings: Bumrah best despite no Tests; Jaiswal, Gill gain.

Web Summary : Despite India playing no Tests, Bumrah tops ICC rankings. Jaiswal and Gill are in the top 10 batsmen. India ranks third in Test format, leading in ODIs and T20s. Starc is second in bowlers.
टॅग्स :भारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघजसप्रित बुमराहयशस्वी जैस्वालशुभमन गिल