शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
5
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
6
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
7
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
8
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
9
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
10
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
11
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
12
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
13
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
14
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
15
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
16
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
17
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
18
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
19
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
20
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

ओटवणे देवांच्या मूर्तींना सूर्यकिरणांचा अभिषेक

By admin | Updated: October 23, 2014 00:03 IST

४५० वर्षांपूर्वीच्या सावंतवाडी संस्थानाच्या परंपरेत सूर्यकिरण अभिषेक सोहळा

ओटवणे : येथील जागृत देवस्थान श्री देवी सातेरी रवळनाथ पंचायतन देवस्थानातील देवीच्या मूर्तीला दिवाळीदिवशी सूर्यकिरणांचा अभिषेक अर्पण करण्यात आला. सावंतवाडी राजेशाही संस्थानापासून रूढ झालेली ही धार्मिक परंपरा आजही जपली जाते.  सुमारे ४५० वर्षांपूर्वीच्या सावंतवाडी संस्थानाच्या परंपरेत सूर्यकिरण अभिषेक सोहळा ओटवणे पंचायतन देवस्थानात महत्त्वाचा मानला जातो. फक्त दिवाळीदिवशी आरशाने सूर्याची किरणे परावर्तित करून हा सूर्यकिरणांचा अभिषेक येथील मूर्तींना अर्पण केला जातो. या दिवशी सर्व गावातील भाविक ग्रामस्थ उपस्थित राहून मंदिरातील मूर्तींना तेल लावून अभ्यंगस्रान घालतात. यानंतर गाव मानकरी आणि दैवी सेवकांच्या उपस्थितीत, ढोलताशांच्या वाद्यात दैवी मूर्तींना सूर्यकिरणाभिषेक अर्पण करण्यात येतो. यावेळी दैवी मूर्तीचे तेजस्वी असे विलोभनीय रूप भाविकांना पहायला मिळते. सूर्यकिरणांच्या अभिषेकात गावचे आराध्य दैवत श्री देव रवळनाथचे तेजस्वी रूप पाहण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित असतात. देव रवळनाथला अभ्यंगस्रान घातल्यानंतर अंग पुसण्यासाठी किरणाच्या रुपाने साक्षात सूर्यदेवच श्री रवळनाथाच्या सेवेसाठी उपस्थित असतो, अशी काहीशी प्रतिमा या अभिषेकात उभी राहते. श्री देव रवळनाथाची मूर्ती स्वयंभू आहे. आधी समुद्र, मग कासव, कासवावर पाच फणांचा नाग, नागावर शिवलिंग असून त्यावर रवळनाथाची पाषाणी मूर्ती आहे. अशा स्वयंभू मूर्तीवर सूर्यकिरणांचे तेज पडल्यानंतर मूर्तीची जागृत धार्मिकता लक्षात येते. पंचायतन देवस्थानातील रवळनाथ, सातेरी, भगवती, महादेव, वेताळ, क्षेत्रफळ, पावणाई, म्हारींगण या मंदिरातील मूर्तींना सूर्यकिरणांचा अभिषेक अर्पण केला जातो. या दिवशी रवळनाथाच्या मंदिराचा गाभा साक्षात सूर्यदेवाने प्रज्वलित केलेला दिसतो. सूर्यकिरणांंनी रोषणाई निर्माण होऊन मंदिरात दिवाळीच साजरी होते. सूर्योदय आणि सूर्यास्ताची किरणे श्री देव रवळनाथाच्या चरणी पडतील, अशी अद्भूत रचना या मंदिराची आहे. ग्रामदैवत श्री देव रवळनाथासह पंचायतन देवस्थानातील सर्व मंदिरातील मूर्तींवर सूर्यकिरणांचा अभिषेक होईल, अशी चौफे र रचना येथील प्रत्येक मंदिराची केलेली आहे. ढोलताशांच्या वाद्यात आणि पुरोहित ब्राम्हणांच्या मंत्रघोषात हा सूर्यकिरण अभिषेक सोहळा पूर्ण केला जातो. (प्रतिनिधी)