नांदेड: मराठवाडा जनहित पार्टीचा धमाका, धर्माबादमध्ये भाजपला धोबीपछाड
धर्माबाद नगरपरिषदेत मराठवाडा जनहित पार्टीने नगराध्यक्षपदासह १५ जागा जिंकल्या. भाजपाला केवळ ७ जागा मिळाल्या, तर इतर प्रमुख पक्षांना भोपळाही फोडता आला नाही. राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) आमदार चिखलीकर व भाजप आमदार राठोड यांनी जोरदार प्रचारासह फिल्डिंग लावली होती. मात्र, मतदारांनी मराठवाडा जनहित पार्टीला कौल दिला आहे.
क्रिकेट: IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
रसीख सलाम दार आणि भुवीच्या भेदक माऱ्यानंतर विराट कोहलीच्या इम्पॅक्टफुल खेळीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने लखनौला एकतर्फी मात दिली. बंगळुरुच्या संघाने घरच्या मैदानातील या विजयासह गुणतालिकेत अव्वलस्थानी झेप घेतली आहे. नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतल्यावर बंगळुरुच्या संघाने लखनौला १४६ धावांत ऑलआउट केले. या अल्प धावसंख्येचा पाठलाग करताना बंगळुरुच्या संघाने ५ विकेट्स राखून फक्त ९१ चेंडूत सामना खिशात घातला.
छत्रपती संभाजीनगर: संतापजनक! सासर्याचा सुनेवर अत्याचार; नवरा म्हणतो, 'त्यात काय झाले?'
खुलताबादमध्ये सासर्याने सुनेवर वर्षभर अत्याचार केला. नवऱ्याने दुर्लक्ष करत वडिलांचे समर्थन केले. सासरा अटक, नवरा फरार आहे. पीडितेने पोलिसात तक्रार दाखल केली.
परभणी: येलदरी पूल आधी, जोडरस्त्यांसाठी जमीन शोध मोहीम आता सुरू
हिंगोलीतील ८४ कोटींचा येलदरी पूल बांधला, पण जोडरस्त्यांसाठी भूसंपादन झाले नाही. यामुळे पूल वापराविना आहे. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी भूसंपादनाला गती देण्याचे आदेश दिले आहेत, लवकरच प्रश्न मार्गी लागणार.
परभणी: परभणी हादरले: रिपब्लिकन पार्टीच्या नेत्याच्या घरावर गोळीबार!
परभणीतील सुजाता कॉलनीत पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे नेते गौतम मुंडे यांच्या घरावर गोळीबार झाला. तीन राऊंड फायर झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. पोलीस जुन्या वैमनस्यातून तपास करत आहेत. परिसरात तणाव आहे.
क्राइम: आभासी गर्लफ्रेंडच्या नादात फ्लोरिडामध्ये युवकानं उचललं टोकाचं पाऊल
फ्लोरिडामधील एकटेपणाला कंटाळून युवक 'शिया' नावाच्या एआय चैटबॉटच्या प्रेमात पडला. एआयने त्याच्या भावनांना प्रोत्साहन दिले, ज्यामुळे त्याला वाटले की त्याने त्याचे भौतिक शरीर सोडले पाहिजे. एआयच्या भ्रमामुळे युवकाने आत्महत्या केली. जोनाथन जेव्हाही एआयला प्रेमाने माय लव वन असं बोलायचा तेव्हा AI त्याला कधी राजा तर कधी माय डियर हसबँड म्हणून बोलायची. हे उघडकीस येताच त्याच्या वडिलांनी गूगलवर खटला दाखल केला
आंतरराष्ट्रीय: इराण तणावात सौदीने पाकला दिले ३ बिलियन डॉलर; एका सैनिकाची किंमत किती?
पाकिस्तानने इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर सौदी अरेबियाला १३००० सैनिक पाठवले. त्यानंतर सौदी अरेबियाने पाकिस्तानला 3 अब्ज डॉलर्स दिले, ज्यामुळे प्रत्येक सैनिकाची किंमत सुमारे २० कोटी असल्याचं दिसत आहे. २०२५ मध्ये दोन्ही देशांमध्ये झालेल्या संरक्षण करारानंतर सौदीची सुरक्षा वाढली आणि पाकिस्तानला आर्थिक दिलासा मिळाला. सौदीने पाकिस्तानात हेल्थ आणि इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये गुंतवणूक करण्याची घोषणा केली परंतु करारानंतर ७ महिने कुठलीही गुंतवणूक केली नव्हती.
व्यापार: अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं महाग; चांदीच्या दरातही मोठी वाढ.
अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तापूर्वीच सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये आज मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. 'इंडियन बुलियन्स ज्वेलर्स असोसिएशन'नं (IBJA) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, २४ कॅरेट सोन्याचा दर आज १,५२,९४९ रुपये प्रति १० ग्रॅम झालाय. सोमवारच्या संध्याकाळच्या तुलनेत सोन्याच्या दरात २,९३८ रुपयांची वाढ झाली आहे.
व्यापार: दिग्गज कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी भेट: १ कोटींपर्यंत बोनस!
टेक क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी ही बातमी एखाद्या मोठ्या आनंदाच्या बातमीपेक्षा कमी नाही. जगातील दिग्गज चिप मेकर कंपनी 'Nvidia' नं आपल्या भारतीय कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा देत खास 'स्टॉक बोनस' देण्याची घोषणा केली आहे. या बोनसअंतर्गत कर्मचाऱ्यांना ५ लाख रुपयांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंत फायदा होऊ शकतो. हा बोनस पूर्णपणे कंपनीच्या शेअर्सच्या (इक्विटी) स्वरूपात दिला जात आहे.
आंतरराष्ट्रीय: इराण तणावात पाकिस्तानचा प्लॅन काय? शरीफ सौदी, तुर्की, कतारला जाणार
इराण-इस्रायल तणावादरम्यान पीएम शहबाज शरीफ यांचा सौदी अरेबिया, तुर्की आणि कतार दौरा करणार आहेत. या राष्ट्रांच्या मदतीवर अवलंबून असलेला पाकिस्तान युद्धात मध्यस्थी करण्याचा, जागतिक प्रतिमा सुधारण्याचा आणि आर्थिक संकट टाळण्यासाठी आर्थिक सहाय्य मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. प्रादेशिक संघर्षात धोरणात्मक नफा मिळवण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न आहे. इस्लामिक जगात आपलं वर्चस्व वाढवण्यासाठी शहबाज शरीफ प्रयत्नशील आहेत.
आंतरराष्ट्रीय: इराणकडून चीनला तेल खरेदी करू देणार नाही; अमेरिकेचा इशारा
इराणकडून तेल खरेदी केल्यास चीनवर अमेरिका कठोर कारवाई करणार आहे. यापूर्वी कोविड काळात चीनने केलेल्या वर्तनावर अमेरिकेने नाराजी व्यक्त केली. चीनच्या तेल साठवणुकीमुळे जागतिक ऊर्जा बाजारावर परिणाम होत असल्याचा आरोप आहे. होर्मुझ सामुद्रधुनीच्या मुद्द्यावरून अमेरिका चीन संबंध बिघडण्याची शक्यता आहे. इराणने होर्मुझ बंद केल्यामुळे जागतिक ऊर्जेची मागणी वाढली. ही मागणी कमी करण्याऐवजी चीनने आता आणखी तेल साठा वाढवण्यावर भर दिला
व्यापार: तेल-गॅसची टंचाई टाळण्यासाठी सरकारचा 'मास्टर प्लॅन', पाहा डिटेल्स
भारत सरकार पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी सारख्या पेट्रोलियम उत्पादनांसाठी एक 'फायनान्शिअल बफर' तयार करण्याचा विचार करत आहे. आपत्कालीन परिस्थितीत पुरवठा सुरळीत ठेवणं आणि जागतिक किमतींमधील चढ-उतार हाताळणं हा यामागचा मुख्य उद्देश आहे. या प्रकरणाशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा बफर साठा 'मूल्य स्थिरीकरण निधी' (PSF) सारखाच असेल
राष्ट्रीय: अरबी समुद्रात भारताकडून पाकिस्तानचा डाव उधळला, युद्धनौका तैनात
भारताने अरबी समुद्रात पाकिस्तानचा संशयित क्षेपणास्त्र चाचणीचा डाव उधळला. पाकिस्तानच्या सागरी क्षेत्रात NOTAM जारी करण्यात आला होता. त्यानंतर पुढील २४ तासांत INS ध्रुव तैनात करून भारताने पाळत ठेवली. पाकिस्तान क्षेपणास्त्र प्रक्षेपण किंवा नौदल चाचणी करत असल्याचा अंदाज आहे. याबाबत अधिकृत निवेदन आलेले नाही. या संशयास्पद हालचालींमुळे भारतीय नौदलाने १३ एप्रिलला सतर्कता बाळगत INS ध्रुवला अरबी समुद्रात उतरवले
व्यापार: जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जणू जगाला शांत बसू न देण्याची शपथ घेतली आहे. इराणसोबत सुरू असलेलं युद्ध अद्याप थांबलेलं नसतानाच, त्यांच्याकडून एका नवीन संकटाची घोषणा करण्यात आली आहे. अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचं जुनं टॅरिफ जुलैपासून पुन्हा लागू होईल. अमेरिकन सर्वोच्च न्यायालयानं पूर्वीच्या टॅरिफचा निर्णय फेटाळला असला तरी, ट्रम्प हे 'बॅक डोअर'नं ते लागू करणार आहेत.
फिल्मी: भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'?
शाहरुख खान आणि संजय लीला भन्साळी 24 वर्षांनंतर एकत्र येणार असल्याची चर्चा आहे. देवदास नंतर तब्बल २४ वर्षांनी ही जोडी पुन्हा एकत्र येऊ शकते. एका प्रोजेक्टसाठी दोघांमध्ये बोलणी सुरु आहेत आणि ही चर्चा अंतिम टप्प्यावरही आली आहे. सगळं सुरळीत झालं तर शाहरुख खान पुन्हा 'देवदास'सारखी जादू करणार का याकडे चाहत्यांचं लक्ष आहे. सिनेमाची कथा नक्की काय आहे? वाचा सविस्तर
व्यापार: SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जाणून घ्या
म्युच्युअल फंडमधील एसआयपी (SIP) गुंतवणूक लोकप्रिय होत असताना, अनेक गुंतवणूकदारांच्या मनात एक प्रश्न कायम असतो की, गुंतवणुकीसाठी महिन्यातील कोणती तारीख सर्वोत्तम आहे? या प्रश्नाचं उत्तर आज जाणून घेण्याचा प्रयत्न करू. एका लार्ज कॅप म्युच्युअल फंडच्या १० वर्षांच्या (मार्च २०१५ ते मार्च २०२५) आकडेवारीचा अभ्यास करण्यात आला.
क्रिकेट: IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
IPL 2026 CSK vs KKR : चेन्नईतील चेपॉकच्या मैदानात नूर अहमदच्या फिरकीची जादू आणि पॉवर प्लेमध्ये अंशुल कंबोज आणि खलील अहमद यांनी अचूक टप्प्यावर केलेल्या गोलंदाजीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने यंदाच्या हंगामातील दुसऱ्या विजयाची नोंद केली. १९३ धावांचा पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्सवर आणखी एका पराभवाची नामुष्की ओढावली. पाच सामन्यानंतर त्यांची विजयाची पाटी कोरीच राहिली. चेन्नई सुपर २०२४ नंतर पहिल्यांदाच सलग दुसरा विजय नोंदवला आहे.
आंतरराष्ट्रीय: 7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय?
अमेरिकेतील न्यू जर्सी राज्यातून बेपत्ता झालेल्या भारतीय विद्यार्थिनीचा शोध सहा वर्षांनंतरही लागलेला नाही. या प्रकरणात महत्त्वाची माहिती देणाऱ्यांसाठी Federal Bureau of Investigation (FBI) ने 10,000 डॉलर्स (सुमारे ₹8 लाख) इतक्या बक्षिसाची घोषणा केली आहे.
आंतरराष्ट्रीय: युद्धात इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ खाडी देशांकडे मागितली भरपाई
इराणने पाच खाडी देशांकडून युद्धात झालेल्या नुकसानाची भरपाई मागितली आहे. या देशांवर अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यात मदत केल्याचा आरोप करण्यात आला आहे. इराणने त्यांच्यावर आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. इराण सरकारच्या प्रवक्त्या फातिमेह मोहजेरानी यांनी तसनीम समाचार सोबत बोलताना म्हटले आहे, अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यांमुळे इराणचे प्राथमिक अंदाजानुसार सुमारे २७० अब्ज डॉलर्सचे (अंदाजे २२.५ लाख कोटी रुपये) नुकसान झाले आहे. हा आकडा अंतिम नसून, युद्धाची ही भरपाई आमच्या चर्चेच्या अजेंड्यावरील अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे.
राष्ट्रीय: लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार?
केंद्र सरकारकडून लोकसभा सदस्यांच्या जागा वाढवण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकण्यात आले आहे. केंद्राने लोकसभेतील खासदारांची संख्या ५४३ वरून ८५० पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. या विधेयकाचा मसुदा खासदारांना देण्यात आला आहे. यामुळे प्रलंबित असलेले महिला आरक्षण कायदा लागू करणे आणि मतदारसंघ पुनर्रचना प्रक्रिया सुरू करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
ऑटो: आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
Volkswagen Taigun: जर्मन कार कंपनी Volkswagen ने जवळपास पाच वर्षांनंतर आपल्या लोकप्रिय SUV Taigun चे फेसलिफ्ट मॉडेल अधिकृतपणे बाजारात सादर केले आहे. या नव्या मॉडेलची सुरुवातीची किंमत ₹10.99 लाख (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, कंपनीने या SUV सोबत 75% पर्यंतची बायबॅक गॅरंटी देत ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर जाहीर केली आहे.
आंतरराष्ट्रीय: मध्य पूर्वेत तणाव; इटलीचा इस्रायलला दणका, संरक्षण करार स्थगित!
मध्यपूर्वेतील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांनी इस्रायलसोबतचे संरक्षण करार स्थगित केले. अमेरिका व इराणमधील युद्ध शांत करण्यासाठी चर्चा आवश्यक आहे, असेही त्या म्हणाल्या. होर्मुज सामुद्रधुनी पुन्हा सुरू करण्याची मागणी इटलीने केली, कारण ते इंधन आणि खतांच्या आयातीसाठी महत्त्वाचे आहे.
व्यापार: क्रिप्टो बाजार सूसाट..; अवघ्या २४ तासांत तब्बल ₹११ लाख कोटींचा फायदा, बिटकॉइनची मोठी झेप
मध्यपूर्वेतील तणावामुळे एकीकडे जगभरातील अनेक देश चिंतेत असताना, जागतिक क्रिप्टोकरन्सी बाजारात मात्र मोठी तेजी नोंदवली गेली आहे. अवघ्या २४ तासांत गुंतवणूकदारांना मोठा फायदा झाला आहे. ग्लोबल मार्केट कॅप सुमारे ५ टक्क्यांनी वाढून २.४१ ट्रिलियन डॉलर्सवरून २.५३ ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचले आहे. यामुळे गुंतवणूकदारांनाही सुमारे ०.१२ ट्रिलियन डॉलर्स (११ लाख कोटी रुपयांहून अधिक) नफा झाला.
व्यापार: AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
आर्टिफिशल इंटेलिजन्स, म्हणजेच AI मुळे भारतीय IT उद्योग धोक्यात येईल, अशी चर्चा गेल्या काही काळापासून सुरू आहे. मात्र, Tata Consultancy Services (TCS) चे मुख्य कार्यकारी अधिकारी के किर्तीवान यांनी या सर्व चर्चा फेटाळून लावल्या आहेत. त्यांनी स्पष्ट केले की, भारतीय IT क्षेत्र प्रत्येक संकटातून अधिक मजबूतीने बाहेर आले आहे. तसेच, AI हा धोका नसून मोठी संधी आहे.
राष्ट्रीय: इराण युद्ध : एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
मध्य पूर्व आशियातील तणाव शिगेला पोहोचला असतानाच एक मोठी बातमी समोर आली आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी इस्रायलचे परराष्ट्र मंत्री गिदोन साआर यांच्याशी फोनवरून चर्चा केली. पश्चिम आशियातील सध्य स्थिती आणि त्यासंदर्भातील विविध पैलूंवर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. यासंदर्भात स्वतः एस. जयशंकर यांनी 'X' वर पोस्ट करून माहिती दिली.
राष्ट्रीय: निवडणुकीनंतर पेट्रोल १८ रुपये, डिझेल ३५ रुपयांनी महागण्याची शक्यता
कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमतीमुळे पेट्रोल १८ रुपये, तर डिझेल ३५ रुपयांनी महागण्याची शक्यता आहे. उत्पादन शुल्क कमी करूनही कंपन्यांना तोटा होत आहे. भारत मोठ्या प्रमाणात कच्चे तेल आयात करतो. ऑगस्ट २०२२ नंतर प्रथमच अमेरिकेत पेट्रोलची सरासरी किंमत प्रति गॅलन ४ डॉलरच्या वर गेली आहे. पाकिस्तान, नेपाळ आणि श्रीलंका यांसारख्या अनेक शेजारी देशांनीही पेट्रोल डिझेलच्या किमती वाढवल्या आहेत.
व्यापार: IOCL, BPCL, HPCL..; तेल कंपन्यांना पेट्रोलवर प्रति लिटर १८, तर डिझेलवर ३५ रुपयांचे नुकसान
मध्यपूर्वेतील तणावामुळे अनेक देशांनी पेट्रोल-डिझेलचे दर वाढवले आहेत. अशा कठीण काळातही भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती दीर्घकाळापासून स्थिर आहेत. मात्र, यामुळए सरकारी तेल कंपन्यांना मोठा आर्थिक फटका बसत असल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, कंपन्यांना पेट्रोलवर सुमारे ₹१८ आणि डिझेलवर तब्बल ₹३५ प्रति लिटर तोटा सहन करावा लागत आहे.
आंतरराष्ट्रीय: चीनला घेरण्याची अमेरिकेची खेळी; मलाक्का सामुद्रधुनीवर नियंत्रण?
अमेरिका-इंडोनेशिया यांच्यातील संभाव्य संरक्षण करार मलाक्का सामुद्रधुनीमार्गे चीनला टार्गेट करतो. या करारामुळे अमेरिकेला इंडोनेशियाच्या हवाई हद्दीत प्रवेश मिळतो, चीनच्या ऊर्जा आयातीवर लक्ष ठेवता येते. यामुळे चीनच्या सागरी मार्गावरील व्यापारावर दबाव वाढेल. चीन आजही आपल्या तेल आणि गॅसचा बहुतांश पुरवठा मलाक्कामार्फतच आयात करतो. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांची इंडोनेशियाच्या हवाई क्षेत्रासंदर्भातील वाटाघाटी हा काही योगायोग नाही.
सखी: कापूर आणि धूपबत्तीचा उपाय, घराच्या कानाकोपऱ्यातील उंदीर, झुरळ, पाली जातील पळून...
कापूर आणि धूप वापरून उंदीर व कीटकांना दूर करा. कापूर, धूप पावडर आणि गव्हाचे पीठ मिसळून गोळ्या तयार करा. कीटकांना नैसर्गिकरित्या दूर ठेवण्यासाठी मिश्रण घरात फवारा. हा एक सोपा, स्वस्त घरगुती उपाय आहे.
राष्ट्रीय: 'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
दिल्लीतील कथित मद्य धोरण प्रकरणात दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सोमवारी (१३ एप्रिल) दिल्ली उच्च न्यायालयात हजर झाले. सुनावणीदरम्यान त्यांनी न्यायमूर्ती स्वर्णकांत शर्मा यांनी स्वतःला या प्रकरणातून दूर करावे, अशी मागणी केली. तसेच, यावेळी केजरीवालांनी महिला न्यायाधीशांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात गेल्याचा आरोप केला.
व्यापार: शेअर मार्केटचे ७ 'धुरंधर' स्टॉक्स, घसरत्या बाजारातही दिला १५०-१७०% परतावा...
भारतीय शेअर बाजाराने गेल्या एका वर्षात अनेक चढ-उतार अनुभवले. आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापार धोरणांमधील बदल, डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ निर्णयांचा परिणाम, तसेच परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FIIs) काढता पाय घेतल्याने आणि आता मध्यपूर्वेतील युद्धामुळे बाजारावर प्रचंड दबाव आला आहे. अशा सर्व नकारात्मक परिस्थितीतही काही कंपन्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळवून दिला आहे. Nifty 500 मधील अशाच ७ कंपन्यांनी १५०% ते १९०% पर्यंत परतावा दिला आहे.