Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Social Viral > उंदीर-झुरळं-पाली-मुंग्या पळतील घराबाहेर - पाहा धूप आणि कापराचा सोपा उपाय - करा कायमचा बंदोबस्त...

उंदीर-झुरळं-पाली-मुंग्या पळतील घराबाहेर - पाहा धूप आणि कापराचा सोपा उपाय - करा कायमचा बंदोबस्त...

home remedies to get rid of rats, cockroaches, ants, Lizards : natural ways to repel rats, cockroaches, ants, Lizards from home : घराच्या कानाकोपऱ्यातील उंदीर, झुरळं पालींना पळवून लावण्यासाठी घरगुती उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2026 15:29 IST2026-04-14T15:25:12+5:302026-04-14T15:29:52+5:30

home remedies to get rid of rats, cockroaches, ants, Lizards : natural ways to repel rats, cockroaches, ants, Lizards from home : घराच्या कानाकोपऱ्यातील उंदीर, झुरळं पालींना पळवून लावण्यासाठी घरगुती उपाय...

how to keep rats, cockroaches, ants, Lizards away naturally home remedies to get rid of rats, cockroaches, ants, Lizards | उंदीर-झुरळं-पाली-मुंग्या पळतील घराबाहेर - पाहा धूप आणि कापराचा सोपा उपाय - करा कायमचा बंदोबस्त...

उंदीर-झुरळं-पाली-मुंग्या पळतील घराबाहेर - पाहा धूप आणि कापराचा सोपा उपाय - करा कायमचा बंदोबस्त...

घरात एकदा का उंदरांचा सुळसुळाट सुरु झाला की, घराची शांतताच हरवते. कधी कपडे कुरतडणे, कधी धान्याची नासाडी तर कधी घरातील महागड्या वस्तूंची मोडतोड, उंदरांचा हा असा बेफाम सुळसुळाट आपल्याला हैराण करून सोडतो. इतकंच नाही तर या सगळ्यामुळे घरातील स्वच्छता आणि सुरक्षितता दोन्ही धोक्यात येतात. उंदीर केवळ घरातील वस्तूंचे नुकसान करत नाहीत, तर ते आरोग्यासाठीही तितकेच घातक असतात. उंदरांमुळे घरात पसरणारी दुर्गंधी आणि त्यांच्या विष्ठेमुळे विविध आजार होण्याची भीती असते. रात्र झाली की छतावर किंवा स्वयंपाकघरात उंदरांच्या पळण्याने घरातील प्रत्येकाचीच झोपमोड होते सोबतच त्यांच्या वावरण्याने नको इतका मनस्ताप होतोच...(home remedies to get rid of rats, cockroaches, ants, Lizards).

बाजारात मिळणारे पिंजरे किंवा केमिकल्स औषध - गोळ्या वापरूनही उंदीर पुन्हा पुन्हा येत असतील, तर आपल्याला काहीतरी वेगळं करण्याची गरज आहे. उंदरांना वासाची तीव्र जाणीव असते आणि याच गोष्टीचा फायदा घेऊन आपण त्यांना घराबाहेर हाकलवून लावू शकतो. आपल्या देव्हाऱ्यातील 'कापूर' आणि 'धूपबत्ती' उंदरांना पळवण्यासाठी किती फायदेशीर ठरू शकतात, याची आपण कल्पनाही केली नसेल. उंदरांना मारण्यापेक्षा त्यांना पळवून लावणे हा सर्वात उत्तम पर्याय आहे. कापूर आणि धूपबत्तीचा तीव्र सुवास उंदरांच्या श्वसनसंस्थेसाठी असह्य असतो. हा नैसर्गिक आणि सुगंधी उपाय सहज करुन आपलं घर कसं स्वच्छ ठेवू शकतो अशी भन्नाट ट्रिक पाहूयात...हा उपाय केल्यानंतर उंदीर आपल्या घराकडे पुन्हा ढुंकूनही पाहणार नाहीत, सहजसोपा (natural ways to repel rats, cockroaches, ants, Lizards from home) खिशाला परवडेल असा घरगुती उपाय... 

उंदरांना घरातून पळवून लावण्यासाठी सोपा घरगुती उपाय... 

उंदरांना घरातून पळवून लावण्यासाठी घरगुती सोपा उपाय करण्यासाठी आपल्याला अतिशय साध्या गोष्टींची गरज लागणार आहे. ज्या आपल्या स्वयंपाकघरात किंवा देवघरात सहज मिळतील. यासाठी आपल्याला २ धूपबत्ती, ५ कापूर वड्या आणि १ डांबर गोळी घ्यायची आहे. कापूर आणि धूपबत्तीचा जो तीव्र वास असतो, तो उंदीर आणि कीटकांना घरापासून दूर ठेवण्यासाठी अतिशय फायदेशीर ठरतो. 

सर्वात आधी २ धूपबत्ती आणि ५ कापूर वड्या एकत्र घेऊन त्यांची बारीक पूड करून घ्या. त्यानंतर, एक डांबर गोळी सुद्धा वेगळी कुटून त्याची मऊ पावडर तयार करा. आता ही तिन्ही सामग्री एका वाटीत घेऊन व्यवस्थित एकत्र करा, जेणेकरून एक मिश्रण तयार होईल. डांबर गोळीचा वास अतिशय उग्र असतो, जो कीटक किंवा उंदीर अजिबात सहन करू शकत नाहीत. तयार केलेली पावडर एका वाटीत काढा आणि त्यात थोडे कोमट पाणी टाका. हे मिश्रण साधारण १० मिनिटांसाठी तसेच ठेवून द्या, जेणेकरून सर्व घटकांचा अर्क पाण्यात नीट विरघळेल. १० मिनिटांनंतर हे मिश्रण एका गाळणीच्या मदतीने गाळून घ्या.

वेटलॉससाठी 'सब्जा' की 'चिया सीड्स'? ९०% लोक करतात १ चूक - चरबी मेणासारखी वितळण्यासाठी खाण्याची योग्य पद्धत...

दीपिका पादूकोण ते आलिया भट-रोज सकाळी उपाशी पोटी ‘हे’ काय खास पितात पाहा, चेहऱ्यावरच्या ग्लोचं सिक्रेट...

गाळणीत गाळून जे शिल्लक राहिल ती पूड फेकून देऊ नका. त्यात २ चमचे गव्हाचे पीठ मिसळा आणि थोडे पाणी घालून ते नीट मळून घ्या. आता या पिठाच्या लहान-लहान गोळ्या तयार करा. या गोळ्या उंदरांना स्वतःकडे आकर्षित करतील, मात्र कापूर आणि डांबर गोळीच्या तीव्र परिणामामुळे या गोळ्या खाताच उंदीर घर सोडून पळून जातील.

मिश्रण गाळून घेतल्यानंतर जे लिक्विड (पाणी) उरले आहे, ते एका स्प्रे बाटलीमध्ये भरून घ्या. या स्प्रेचा वापर तुम्ही पाल, झुरळे, माश्या आणि डास पळवून लावण्यासाठी करू शकता. घराचे कोपरे, सिंकच्या खाली आणि पडद्यांच्या मागे जिथे हे कीटक लपलेले असतात, तिथे याचा शिडकावा करा. या मिश्रणाच्या तीव्र सुगंधामुळे हे कीटक घरात टिकू शकणार नाहीत.

उंदरांसाठी तयार केलेल्या पिठाच्या गोळ्या रात्रीच्या वेळी घराच्या अशा भागात ठेवा जिथे उंदरांचा वावर सर्वाधिक असतो. उंदीर सहसा रात्रीच्या वेळीच जास्त ॲक्टिव्ह असतात. तसेच, तयार केलेल्या स्प्रेचा वापर संध्याकाळच्या वेळी खिडक्या आणि दरवाजांच्या जवळ केल्यास डास आणि माश्या घरात येणार नाहीत.

Web Title : चूहे और कीड़े भगाएं: कपूर और धूप से सरल उपाय

Web Summary : कपूर और धूप का उपयोग करके चूहों और कीड़ों को भगाएं। कपूर, धूप पाउडर और गेहूं के आटे से चारा बनाएं। कीड़ों को स्वाभाविक रूप से दूर करने के लिए घर के चारों ओर एक पतला घोल स्प्रे करें। एक सरल, लागत प्रभावी घरेलू उपाय।

Web Title : Drive Away Rodents & Pests: Simple Camphor & Incense Remedy

Web Summary : Eliminate rodents and pests using camphor and incense. Create bait with camphor, incense powder, and wheat flour. Spray a diluted solution around the house to repel insects naturally. A simple, cost-effective home remedy.