उन्हाळ्यात वेफर्स-पापडासाठी भरपूर बटाटे आणले? ५ टिप्स -बटाटे काळे पडणार नाहीत, मोड येणार नाहीत..
Updated:April 14, 2026 16:43 IST2026-04-14T16:40:32+5:302026-04-14T16:43:38+5:30
Why do potatoes turn black and how to avoid it: Storing potatoes without refrigerator: आपण अशाच ५ सोप्या टिप्स पाहणार आहोत, ज्यामुळे बटाटे खराब होणार नाही.

घरात कोणतीही भाजी नसली तरी अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने आपल्याला बटाट्याची सुकी, रस्सा भाजी किंवा बटाट्यापासून अनेक पदार्थ करता येतात. पण उन्हाळ्यात जास्तीचे बटाटे घरात आणून ठेवल्यावर उष्णता आणि आर्द्रतेमुळे बटाटे लवकर मऊ पडतात, काळे होतात किंवा त्यांना मोड येऊ लागतात. एकदा का बटाट्याला मोड आले की त्यातील पोषक तत्वे कमी होतात आणि त्याची चवही बदलते. (Tips to avoid sprouting in potatoes)
अनेकदा आपण बटाटे प्लास्टिकच्या पिशवीत किंवा कांद्यासोबत ठेवतो, जी सर्वात मोठी चूक ठरते. उन्हाळ्याच्या दिवसात हवा खेळती नसलेल्या ठिकाणी बटाटे ठेवल्यास त्यांना लवकर बुरशी लागते किंवा ते सडतात. योग्य काळजी घेतली तर बटाटे महिनाभर अगदी शेतातून काढल्यासारखे ताजे, कडक आणि फ्रेश राहू शकतात. आपण अशाच ५ सोप्या टिप्स पाहणार आहोत, ज्यामुळे बटाटे खराब होणार नाही. (How to store potatoes for summer long time)
बटाटे आणि कांदे कधीही एकत्र टोपलीत ठेवू नका. कांद्यातून इथिलीन नावाचा गॅस बाहेर पडतो, ज्यामुळे बटाटे लवकर पिकतात आणि त्यांना मोड येतात.
बटाटे प्लास्टिकच्या पिशवीत ठेवण्याऐवजी जाळीदार टोपली, बांबूची पाटी किंवा सुती कापडाच्या पिशवीत ठेवा. यामुळे हवा खेळती राहते आणि ओलावा साचत नाही.
बटाट्यांवर सूर्यप्रकाश पडल्यावर ते हिरवे पडतात आणि कडू होतात. त्यामुळे ते स्वयंपाकघरातील अशा कोपऱ्यात ठेवा. जिथे अंधार आणि थंडावा असेल.
अनेकांना बटाटे धुवून साठवण्याची सवय असते. पण यामुळे बटाट्याला ओलावा लागला की ते लगेच सडू लागतात. बटाटे वापरण्यापूर्वीच धुवावेत.
टोपलीच्या तळाशी वर्तमानपत्र अंथरल्यास बटाटे जास्तीचा ओलावा शोषून घेते, ज्यामुळे बटाटे दीर्घकाळ कोरडे आणि ताजे राहतात.