ऑनलाईन ओळख अन् फिल्मी स्टाईलने केलेलं प्रपोज! 'अशी' आहे चिन्मय मांडलेकरची लव्हस्टोरी, स्वत:च सांगितला किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 17:23 IST2026-04-14T17:21:52+5:302026-04-14T17:23:54+5:30

ऑनलाईन ओळख,पवईत भेटले अन् थेट लग्नाची मागणी, अशी आहे चिन्मय मांडलेकरची लव्हस्टोरी, वाचा किस्सा

marathi cinema actor chinmay mandlekar and wife neha joshi shares their love story | ऑनलाईन ओळख अन् फिल्मी स्टाईलने केलेलं प्रपोज! 'अशी' आहे चिन्मय मांडलेकरची लव्हस्टोरी, स्वत:च सांगितला किस्सा

ऑनलाईन ओळख अन् फिल्मी स्टाईलने केलेलं प्रपोज! 'अशी' आहे चिन्मय मांडलेकरची लव्हस्टोरी, स्वत:च सांगितला किस्सा

Chinmay Mandlekar: चिन्मय मांडलेकर हा मराठी सिनेसृष्टीतील हरहुन्नरी अभिनेत्यांपैकी एक  आहे. एक उत्तम अभिनेता असण्यासोबतच चिन्मय मांडलेकरने आपल्या लेखणीने आणि दिग्दर्शनाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे.इतकंच नाहीतर चिन्मय निर्माता म्हणून देखील सर्वश्रुत आहे.आजवर अनेक  कलाकृतींमधून सिनेरसिकांच्या मनोरंजन करणाऱ्या चिन्मच्या प्रेमकहाणीबद्दल तुम्हाला माहिती आहे का? नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत चिन्मय आणि त्याची पत्नी नेहाने दोघांची पहिली भेट आणि प्रेमकहाणीबद्दल सांगितलं आहे.

अलिकडेच चिन्मय मांडलेकर आणि त्याची  पत्नी नेहाने ‘द अनुरुप शो’  मुलाखत दिली.यावेळी  चिन्मय म्हणाला, आम्ही २००७ मध्ये पहिल्यांदा भेटलोय. त्याला आता १९ वर्ष होतील. आमचं ऑनलाईन प्रेम आहे. आम्ही एकमेकांना भेटण्याआधी फक्त चॅट आणि फोनवर बोलायचो. चिन्मय मांडलेकरची पत्नी नेहा फारशी प्रसिद्धी झोतात नसते. नेहा एक वाइल्ड फोटोग्राफर आहे.  

दरम्यान, मुलाखतीत चिन्मयची पत्नी नेहा त्यांच्या पहिल्या भेटीबद्दल सांगताना म्हणाली, "मी एका डॉक्यूमेन्ट्रीवर काम करत होते. सायलेंट क्राईज असं त्याचं नाव होतं. नंतर ती डॉक्यूमेन्ट्री झालीच नाही. आधी ही डॉक्यूमेन्ट्री हिंदी आणि इंग्लिशमध्ये असणार होती. त्याकरिता माझ्यासोबत मोठी टीम देखील होती. पण, कालांतराने त्यात बराच बदल झाला  आणि मग ती मराठीतच करू की काय? असा मग आमचा विचार झाला.आता ते मराठीत करायचं म्हणजे कोणीतरी लिहिलं पाहिजे."

पुढे नेहा म्हणाली, "मग याचीच वादळवाट मालिका बघून पुण्यातील चाहतीने मला याच्याविषयी सांगितलं. ती योगायोगाने माझी देखील मैत्रीण आली होती. ती मला म्हणाली,अगं चिन्मय मांडलेकर नावाचा एक लेखक आहे.तू याला मेल तर करून बघ. मग नंतर तिनेच मला याचा फोन नंबरही दिला. त्यानंतर मी त्याला फोन केला तर हा म्हणाला तुम्ही मेल करा. त्याच्यानंतर १०-१५ दिवस झाले तरी याचा रिप्लाय नाही. म्हणून मी त्याला फोन केला. मला असं वाटत होतं की आपण एकदम सगळं भारी लिहिलंय.मी म्हणाले... सर, तुम्ही ते स्क्रिप्ट वाचलं का?...तर हा म्हणाला, हो, मी वाचलं. पण, अहो तुम्ही त्याच्यात असं काही लिहिलं नाही जे आधी लोकांना माहित नसेल. असं तो पटकन बोलला होता. तो याचा आणि माझ्यामधील पहिला संवाद होता."

फिल्मी स्टाईलने केलेलं प्रपोज...

"त्यानंतर मग आम्ही त्यानिमित्ताने एक-दोनदा फोन कॉल्स झाले आणि नंतर चॅटिंग सुरु झालं. मग आम्ही खूप बोलायचो. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत बोलत राहायचो. मग आमचं भेटायचं ठरलं. म्हणजे मी त्याला चॅट करताना त्याला सांगितलेलं, मी तुझ्या प्रेमात पडले आहे. आणि मला भेटल्यानंतर तुझंही तेच होणार आहे,असं मी याला स्पष्टपणे सांगितलं.तर हा म्हणाला...असं काही नसतं. त्याच संध्याकाळी मग याने भेटशील का विचारलं. आम्ही भेटल्यानंतर पुन्हा याने फोन केला आणि परत भेटण्यासाठी विचारलं. भेटल्यानंतर हा असं अगदी फिल्मी स्टाईलने म्हणालेला, नेहा मला ते तीन मॅजिकल वर्ड्स  बोलायचे नाहीतर, मी ते चार मॅजिकल वर्ड्स बोलणार आहे... Will You Marry Me...".

चिन्मय काय म्हणाला...

"आम्ही पवईला का भेटायचं यामागे एक कारण होतं, तेव्हा नेहा ठाण्याला आणि मी अंधेरीला राहायचो. पवईला पहिल्याच कॉर्नरच्या टर्नला ते रेस्टॉरंट आहे. ते आमचं भेटण्याचं ठिकाण होतं. तिथून आम्ही फिरायला जायचो. कारण, तिला तिथल्या पवईतल्या गल्ल्या माहित होत्या. आजही त्या ठिकाणाहून गेल्यानंतर मला त्या दिवसांची आठवण होते." अशी सुंदर लव्हस्टोरी त्याने शेअर केली. 

Web Title : चिन्मय मांडलेकर की प्रेम कहानी: ऑनलाइन मुलाकात, फिल्मी अंदाज़ में प्रपोज़!

Web Summary : चिन्मय मांडलेकर और नेहा ऑनलाइन मिले, चैट और कॉल पर बातचीत हुई। नेहा ने पहले अपनी भावनाओं का इज़हार किया। चिन्मय ने फिल्मी अंदाज़ में प्रपोज़ किया, "क्या तुम मुझसे शादी करोगी?" पवई में।

Web Title : Chinmay Mandlekar's love story: Online meet to filmy proposal!

Web Summary : Chinmay Mandlekar and Neha met online, bonding over chats and calls. Neha confessed her feelings first. Chinmay proposed in filmy style, asking, "Will You Marry Me?" at Powai.