अक्षय तृतीयेला आमरस करण्याआधी लक्षात ठेवा ४ टिप्स, रस होईल मस्त- खा मनसोक्त

Updated:April 14, 2026 16:34 IST2026-04-14T16:24:25+5:302026-04-14T16:34:32+5:30

अक्षय तृतीयेला आमरस करण्याआधी लक्षात ठेवा ४ टिप्स, रस होईल मस्त- खा मनसोक्त

अक्षय तृतीया म्हणजे साडेतीन मुहुर्तांपैकी एक दिवस. शिवाय या दिवसाचे आणखी एक महत्त्व म्हणजे बहुसंख्य लोक अक्षय्य तृतीयेपासूनच आमरस खायला सुरुवात करतात. त्यामुळे या दिवशी घरोघरी आमरस पुरी किंवा आमरस पोळीचा बेत करण्यात येतो.

अक्षय तृतीयेला आमरस करण्याआधी लक्षात ठेवा ४ टिप्स, रस होईल मस्त- खा मनसोक्त

आता आमरस करण्याआधी जर काही गोष्ट लक्षात ठेवल्या तर तुम्हाला रस खाण्याचा मनसोक्त आनंद घेता येईल. शिवाय आंब्याचा त्रास होऊन वजन, शुगर मुळीच वाढणार नाही.

अक्षय तृतीयेला आमरस करण्याआधी लक्षात ठेवा ४ टिप्स, रस होईल मस्त- खा मनसोक्त

आंबे आणल्यानंतर तर ते एखादा तास थंड पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर ते स्वच्छ पुसून कोरडे करून घ्या आणि मगच रस करा. कारण यामुळे आंब्यामधली उष्णता कमी होते.

अक्षय तृतीयेला आमरस करण्याआधी लक्षात ठेवा ४ टिप्स, रस होईल मस्त- खा मनसोक्त

आंबा पिळून त्याचा रस काढल्यानंतर तो मिक्सरमधून फिरवू नका. तो जसाच्या तसाच खा. कारण आमरस मिक्सरमधून फिरवल्यामुळे त्यातील फायबर नष्ट होतात आणि तो पचायला अवघड होतो.

अक्षय तृतीयेला आमरस करण्याआधी लक्षात ठेवा ४ टिप्स, रस होईल मस्त- खा मनसोक्त

आमरसामध्ये साखर घालणेही टाळावे. यामुळे अतिरिक्त कॅलरी पोटात जातात आणि वजन, शुगर दोन्ही वाढते.

अक्षय तृतीयेला आमरस करण्याआधी लक्षात ठेवा ४ टिप्स, रस होईल मस्त- खा मनसोक्त

आमरस त्याच्या नैसर्गिक स्वरुपात खाल्ला तर तो बाधत नाही. त्यामुळे खरंतर त्यात दूध, पाणी असं काहीही घालू नये. तो जसा आहे तसाच खायला हवा.