Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >शेअर बाजार > शेअर मार्केटचे ७ 'धुरंधर' स्टॉक्स, घसरत्या बाजारातही दिला १५०-१७०% परतावा...

शेअर मार्केटचे ७ 'धुरंधर' स्टॉक्स, घसरत्या बाजारातही दिला १५०-१७०% परतावा...

Multibagger Stocks: भारतीय शेअर बाजारात मागील एका वर्षात अनेक चढ-उतार पाहायला मिळाले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 14:27 IST2026-04-14T14:22:29+5:302026-04-14T14:27:37+5:30

Multibagger Stocks: भारतीय शेअर बाजारात मागील एका वर्षात अनेक चढ-उतार पाहायला मिळाले.

Multibagger Stocks: 7 'dhurandhar' stocks of stock market, gave 150-170% returns even in a falling market | शेअर मार्केटचे ७ 'धुरंधर' स्टॉक्स, घसरत्या बाजारातही दिला १५०-१७०% परतावा...

शेअर मार्केटचे ७ 'धुरंधर' स्टॉक्स, घसरत्या बाजारातही दिला १५०-१७०% परतावा...

Multibagger Stocks: भारतीय शेअर बाजाराने गेल्या एका वर्षात अनेक चढ-उतार अनुभवले. आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापार धोरणांमधील बदल, डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ निर्णयांचा परिणाम, तसेच परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FIIs) काढता पाय घेतल्याने आणि आता मध्यपूर्वेतील युद्धामुळे बाजारावर प्रचंड दबाव आला आहे. अशा सर्व नकारात्मक परिस्थितीतही काही कंपन्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळवून दिला आहे. Nifty 500 मधील अशाच ७ कंपन्यांनी १५०% ते १९०% पर्यंत परतावा दिला आहे.

1. Hindustan Copper

या शेअरने मागील एका वर्षात सुमारे १६४%, तीन वर्षांत ४२६%, तर ५ वर्षांत २७९% परतावा दिला आहे. या शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ₹७६०, तर नीचांक ₹१९८ आहे.

2. Force Motors

या शेअरने एका वर्षात १७७%, तर पाच वर्षांत तब्बल १८४५% परतावा दिला आहे. 

3. Trent Ltd.

या शेअरने एका वर्षात १५०% परतावा दिला. Zudio आणि Westside ब्रँडमुळे रिटेल क्षेत्रात याची चांगली वाढ झाली.

4. Multi Commodity Exchange of India

एका वर्षात १५०% परतावा दिला. कमोडिटी बाजारातील चढ-उताराचा याला फायदा झाला.

5. Aditya Infotech

या शेअरच्या IPO ची किंमत ₹६७५ होती, तर याचा उच्चांक ₹१९५४ (१३ एप्रिल) होती. म्हणजे, या शेअरमध्ये १९०% वाढ झाली.

6. National Aluminium Company

या शेअरने एका वर्षात १५०% परतावा दिला. सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीने गेल्या काही काळात मजबूत कामगिरी केली आहे.

7. Ather Energy

या शेअरच्या IPO ची किंमत ₹३०४-३२१  होती, तर सध्याची किंमत ₹९०७ (१३ एप्रिल) आहे. म्हणजेच, काही महिन्यांतच या शेअरमध्ये १८३% वाढ झाली आहे.

गेल्या वर्षभरात बाजारात मोठी अस्थिरता दिसून आली असली तरी योग्य कंपन्यांमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळू शकतो, हे या शेअर्सच्या कामगिरीतून स्पष्ट होते. विशेषतः मेटल, ऑटो, रिटेल आणि कमोडिटी क्षेत्रातील कंपन्यांनी उत्कृष्ट वाढ नोंदवली आहे.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title : शेयर बाजार के 7 'धुरंधर': गिरावट में भी 150-170% रिटर्न

Web Summary : बाजार की अस्थिरता के बावजूद, सात निफ्टी 500 कंपनियों ने पिछले एक साल में असाधारण रिटर्न (150-190%) दिया। हिंदुस्तान कॉपर, फोर्स मोटर्स और ट्रेंट लिमिटेड ने बढ़त का नेतृत्व किया। धातु, ऑटो, खुदरा और कमोडिटी क्षेत्रों में मजबूत विकास हुआ, जिससे साबित होता है कि रणनीतिक निवेश लाभ दे सकते हैं। निवेश से पहले विशेषज्ञों से सलाह लें।

Web Title : 7 Market 'Champions': Stocks Defying Downturn, Delivering 150-170% Returns

Web Summary : Despite market volatility, seven Nifty 500 companies delivered exceptional returns (150-190%) in the past year. Hindustan Copper, Force Motors, and Trent Ltd. led the gains. Metal, auto, retail, and commodity sectors showed strong growth, proving strategic investments can yield profits. Consult experts before investing.