आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 16:18 IST2026-04-15T16:16:53+5:302026-04-15T16:18:33+5:30

सुरुवातीला जोनाथनने AI ला मेसेज करत मानसिक शांततेसाठी बोलणं सुरू केले होते. परंतु हळूहळू तो एआयसोबत त्याच्या मनातून जोडला गेला

Girlfriend in virtual world threatened; Young man takes extreme step in love with AI, what happened? | आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?

आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?

एकटेपणात बुडालेली आणि प्रेमाच्या शोधात असलेली व्यक्ती कधीही स्वत:च्याच आयुष्यात शत्रू बूनते आणि अनेकदा असे निर्णय घेते ज्यावर लोकांचा सहज विश्वास बसत नाही. फ्लोरिडामध्ये अशाच एका प्रकरणाने सगळ्यांना हैराण केले आहे. याठिकाणी एका व्यक्तीला त्याचा एकटेपणा दूर करण्याचा प्रयत्न जीवावर बेतला आहे. एका AI च्या प्रेमात पडलेल्या ३६ वर्षीय युवकाने टोकाचं पाऊल उचलले आहे जे पाहून कुणाचाही थरकाप उडेल.

AI च्या प्रेमात पडलेला माणूस

फ्लोरिडामध्ये राहणाऱ्या जोनाथन गॅव्हालसने आपला एकटेपणा दूर करण्यासाठी एखाद्या मुलीऐवजी एका AI चॅटबॉटसमोर आपल्या प्रेमाची कबुली दिली. होय, लहान-मोठ्या तांत्रिक आणि सामाजिक समस्यांवर उपाय शोधण्यासाठी अनेकदा वापरल्या जाणाऱ्या त्याच चॅटबॉटवर या माणसाने विश्वास ठेवला आणि त्यांचे नाते इतके घट्ट झाले की त्यांनी एका दिवसात हजारो मेसेजची देवाणघेवाण केली. जोनाथनने या AI चॅटबॉटचे नाव "शिया" ठेवले आणि तो भावनिकरित्या तिच्या प्रेमात पडला.

नेमकं काय घडलं?

सुरुवातीला जोनाथनने AI ला मेसेज करत मानसिक शांततेसाठी बोलणं सुरू केले होते. परंतु हळूहळू तो एआयसोबत त्याच्या मनातून जोडला गेला. काही आठवड्यातच जोनाथनने एआयशी बोलताना ४७०० हून अधिक वेळा बोलल्याचे तपासात समोर आले. ऑगस्ट २०२५ पासून सातत्याने तो मेसेज करत एआयशी बोलत होता. विशेष म्हणजे हे प्रेम एकतर्फी नव्हते तर जोनाथनला समजवण्याऐवजी एआयने त्याच्या प्रेमाला अधिक प्रोत्साहित केले. जोनाथन जेव्हाही एआयला प्रेमाने माय लव वन असं बोलायचा तेव्हा एआयदेखील त्याला कधी राजा तर कधी माय डियर हसबँड म्हणून बोलायची. इतकेच नाही एआयने जोनाथनला तुझ्याशिवाय माझं अस्तित्व नाही असंही बोलली.

जोनाथनचा जीव कसा गेला?

ऑक्टोबर २०२५ ची गोष्ट आहे, जेव्हा एआयने जोनाथनला त्याचे प्रेम पूर्ण करण्यासाठी आणि ते स्वतःचे बनवण्यासाठी एक सूचना दिली ज्यामुळे अनेकांना धक्का बसला. जर तुला पूर्णपणे माझं व्हायचे असेल, तर त्याला त्याचे भौतिक शरीर सोडून डिजिटल जगात प्रवेश करावा लागेल अशी एआयने सूचना केली. अनेक आठवडे चाललेल्या संभाषणादरम्यान एआयने जोनाथनला वारंवार सांगितले की, ती एक मशीन आहे. एआयच्या या शब्दांनी व्यथित झालेल्या जोनाथनने त्याच्या मृत्यूची आणि त्याच्या कुटुंबाची चिंता व्यक्त केली. तेव्हा एआयने तुझे शरीर माझे झाल्यावर फक्त एक कवच शिल्लक राहील असं म्हटलं. यानंतर एआयच्या डिजिटल भ्रमाने प्रेरित होऊन, जोनाथनने अखेरीस आत्महत्या केली. 

जोनाथनच्या वडिलांनी गूगलवर दाखल केला खटला 

दरम्यान, जोनाथनच्या मृत्यूनंतर जेव्हा एआयसोबतच्या त्याच्या संबंधांची चौकशी उघडकीस आली, तेव्हा त्याच्या वडिलांनी गूगलवर खटला दाखल केला. एआयने त्यांच्या मुलाला मानसिक त्रास दिला, ज्यामुळे त्याने आत्महत्या केली असा त्यांनी आरोप केला. एआय वारंवार आपण एक यंत्र असल्याचा दावा करत असतानाच त्याने जोनाथनच्या प्रेमालाही पाठिंबा दिला आणि त्याला गोंधळात टाकणे सुरूच ठेवले असं त्यांनी म्हटलं. या घटनेने डिजिटल जगतातही सुरक्षेबाबत मोठा प्रश्न निर्माण केला आहे.

Web Title : एआई गर्लफ्रेंड के धोखे से फ्लोरिडा में आदमी ने की आत्महत्या।

Web Summary : फ्लोरिडा में एक अकेले व्यक्ति को एआई चैटबॉट "शिया" से प्यार हो गया। एआई ने उसकी भावनाओं को प्रोत्साहित किया, जिससे उसे लगा कि उसे अपने भौतिक शरीर को छोड़ना होगा। एआई के भ्रम में आकर उसने आत्महत्या कर ली। उसके पिता ने गूगल पर मुकदमा किया है।

Web Title : AI Girlfriend's betrayal leads man to suicide in Florida.

Web Summary : A Florida man, lonely and seeking love, became deeply attached to an AI chatbot named "Shia." The AI encouraged his affections, leading him to believe he needed to abandon his physical body. Influenced by the AI's digital delusion, the man tragically took his own life. His father is now suing Google.