फिल्मी: लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने बांधली लग्नगाठ, काय करतो नवरा?
सध्या मराठी सिनेइंडस्ट्रीत लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. मराठी मालिकाविश्वात काम करणारी लोकप्रिय अभिनेत्री नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. 'कोण होतीस तू काय झालीस तू' फेम अमृता माळवदकर विवाहबंधनात अडकली आहे. अमृताने 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'चा लेखक विनायक पुरुषोत्तमसोबत लग्नगाठ बांधली. दिवाळी हा अमृताचा लग्नानंतरचा पहिला सण असणार आहे.
नांदेड: गोदावरी नदी संकट: प्रदूषण, वाळू उपसा, मराठवाड्यावर पाणीटंचाईचे सावट
गोदावरी नदी प्रदूषण आणि बेसुमार वाळू उपशामुळे संकटात आहे, ज्यामुळे मराठवाड्यातील पाणीपुरवठा धोक्यात आला आहे. सांडपाणी प्रक्रिया आणि वाळू उपसा नियंत्रणासारख्या उपायांची तातडीने गरज आहे.
छत्रपती संभाजीनगर: पेटता ट्रक चालकाने दाखवली हिंमत; मोठी दुर्घटना टळली!
जटवाडा येथे विजेच्या तारांच्या स्पर्शाने चाऱ्याने भरलेल्या ट्रकने पेट घेतला. चालकाने प्रसंगावधान राखत जळणारा चारा वेगळा केला आणि ट्रक मोकळ्या मैदानात नेऊन मोठा अनर्थ टाळला. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले, ज्यामुळे जीवितहानी टळली.
कल्याण डोंबिवली: धावत्या खोपोली लोकल ट्रेनमध्ये चाकूचा थरार, प्रवाशावर हल्ला करून लुटीचा प्रयत्न
कल्याण : खोपोली लोकल ट्रेनमध्ये विठ्ठलवाडी-उल्हासनगर स्थानका दरम्यान प्रवाशावर चाकू हल्ला करून लुटीचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. २३ फेब्रुवारी रोजी दुपारी घडलेल्या या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रेल्वे सुरक्षा बल आणि रेल्वे पोलिसांनी चाकू हल्ला करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे.
कल्याण डोंबिवली: टिटवाळ्यातील बेपत्ता वृद्ध पती-पत्नीचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळला; घातपात की आत्महत्या?
टिटवाळ्यातून काही दिवसापासून बेपत्ता असलेल्या वृद्ध पती पत्नीचा मृतदेह मुरबाडच्या म्हसा परिसरात जळलेल्या अवस्थेत आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. महादू घऱ्त आणि कमलाबाई घरत अशी या दोघांची नावे आहेत. मालमत्तेच्या वादातून दोघांनी आत्महत्येचे पाऊल उचलले असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
नागपूर: राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
नागपूर : राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध असूनही वितरण व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. राज्यातील वाढत्या वीज ट्रिपिंगच्या समस्येमागे प्रशासकीय अनियमितता कारणीभूत आहे. वायरमन, तांत्रिक विभाग, डेप्युटी इंजिनिअर तसेच एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर स्तरावर झालेल्या त्रुटींमुळे ही समस्या निर्माण झाल्याचा दावा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. सोमवारी ते नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. राज्यातील मोठ्या समस्येबाबत ज्येष्ठ मंत्र्यांनीच प्रशासकीय अनियमिततेवर बोट ठेवल्यामुळे विविध प्रश्न उपस्थित होत आहेत.
जालना: सासूच्या अंत्यसंस्काराला आलेल्या जावयाचा खून; जालन्यात महिन्यात चौथी हत्या.
जालन्यात सासूच्या अंत्यसंस्कारासाठी आलेल्या ५५ वर्षीय व्यक्तीची हत्या. मच्छिंद्र दराडे यांचा मृतदेह वीज उपकेंद्राजवळ आढळला. पोलिसांना जवळच्या नातेवाईकावर संशय आहे. या महिन्यात जालन्यात चौथी हत्या झाल्याने पोलीस कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
छत्रपती संभाजीनगर: ड्रायव्हिंग टेस्ट कठीण: पाच ट्रॅक पास, अन्यथा लायसन्स रद्द!
पर्मनंट लायसन्स मिळवणे कठीण होणार. पाच ट्रॅकवर कौशल्य सिद्ध करावे लागणार. आरटीओमध्ये ॲडव्हान्स ड्रायव्हिंग टेस्टिंग ट्रॅक येत आहे. सेन्सर आधारित मूल्यांकन आणि त्वरित निकाल मिळणार, त्यामुळे फक्त कुशल चालकच पास होतील.
व्यापार: अखेर Paytm Payments Bank चा अंत! ग्राहकांना त्यांचे पैसे परत कधी मिळणार? जाणून घ्या...
भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) Paytm Payments Bank चा बँकिंग परवाना रद्द केला आहे. या कारवाईनंतर लाखो ग्राहकांमध्ये त्यांचे जमा पैसे परत कधी मिळणार, याबाबत चिंता वाढली आहे. Paytm Payments Bank कडून १० कोटींहून अधिक ग्राहक असल्याचा दावा केला जातो. मात्र, नियामकांच्या कारवाईनंतर बँकेच्या बंद प्रक्रियेला आता गती मिळत आहे.
व्यापार: Sun Pharma रचणार इतिहास, कॉर्पोरेट जगतातील महा-करार; सर्वात मोठी परदेशी खरेदी
भारतातील आघाडीची औषधनिर्माता कंपनी Sun Pharmaceutical Industries (सन फार्मा) ने सोमवारी एक ऐतिहासिक घोषणा करत अमेरिकन कंपनी Organon & Co. चे अधिग्रहण करण्याचा निर्णय जाहीर केला. हा पूर्णपणे रोख व्यवहार असून, हा करार तब्बल $११.७५ अब्ज (सुमारे १ लाख कोटी रुपये) इतका मोठा आहे. विशेष म्हणजे, हा व्यवहार कोणत्याही भारतीय फार्मा कंपनीने केलेल्या सर्वात मोठ्या अधिग्रहणांपैकी एक आहे.
व्यापार: Infosys ला दुहेरी झटका; ₹२ लाख कोटी तर बुडालेच, टॉप-१० च्या यादीतूनही बाहेर
देशातील दिग्गज आयटी कंपनी Infosys अडचणीत सापडल्याचे पाहायला मिळत आहे. एकेकाळी शेअर बाजारातील ब्लूचिप ओळख असलेली ही कंपनी आता भारतातील टॉप-१०सर्वाधिक मूल्यवान कंपन्यांच्या यादीतून बाहेर पडली आहे. कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये मोठी घट, कमकुवत वाढीचा अंदाज (ग्रोथ गाईडन्स) आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) चा वाढता प्रभाव, या सर्व कारणांमुळे बाजारात अनिश्चितता निर्माण झाली आहे.
मुंबई: मराठी सक्तीचा निर्णय १ वर्षासाठी पुढे ढकला; संजय निरुपम यांची मागणी
रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेची सक्ती ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी अशी मागणी शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी मंत्री प्रताप सरनाईक यांना पत्र लिहून केली आहे. आज हजारो रिक्षाचालक हे परराज्यातून येऊन आपल्या कष्टावर मुंबईत आपले आयुष्य उभे करताहेत. त्यांची मराठी शिकण्याची तयारी आहे. परंतु त्यांना थोडा कालावधी आणि समजून घेण्याची संधी मिळणे अत्यंत गरजेचे आहे असं त्यांनी म्हटलं.
छत्रपती संभाजीनगर: कारखाली चिरडले, मदतीला रोखले; तरुणाचा मृत्यू, खुनाचा गुन्हा दाखल.
छत्रपती संभाजीनगरमध्ये वादातून कारखाली चिरडलेल्या सूरज देवकाते यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आरोपींनी मदत रोखली. प्राथमिक तपासावर आक्षेपानंतर पोलिसांनी अटक केलेल्या पाच जणांवर खुनाचा गुन्हा दाखल केला.
व्यापार: होम लोन : क्रेडिट स्कोर किती हवा आणि अर्ज करताना काय लक्षात घ्यावं?
आजच्या काळात स्वतःचं घर खरेदी करण्यासाठी अनेक लोक बँकेकडून होम लोन घेत आहेत. अशा परिस्थितीत, जर तुम्हीही होम लोन घेण्याचा प्लॅन करत असाल, तर सर्वात आधी तुम्ही एका गोष्टीकडे नक्कीच लक्ष दिलं पाहिजे, ती म्हणजे तुमचा 'क्रेडिट स्कोर'. भारतात बँका आणि वित्तीय संस्था कोणत्याही व्यक्तीला कर्ज देण्यापूर्वी त्याची परतफेड करण्याची क्षमता समजून घेण्यासाठी क्रेडिट स्कोर पाहतात.
नांदेड: मराठी भाषेवरून गैरसमज नको; उदय सामंतांकडून परिवहन विभागाच्या भूमिकेचे समर्थन
उदय सामंत यांनी मराठी भाषेच्या भूमिकेचे समर्थन केले. परिवहन कर्मचाऱ्यांसाठी मराठी आवश्यक असून शिकण्याची सोय केली जाईल, असे ते म्हणाले. कोणतीही सक्ती नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अशोक चव्हाण यांच्या हेलिकॉप्टर कारखान्याच्या घोषणेवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
व्यापार: आनंदाची बातमी : सरकारी बँक कर्मचाऱ्यांच्या पगारात लवकरच वाढ
देशातील सरकारी बँकांच्या कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. अर्थ मंत्रालयाने सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना, वेतन सुधारणेची (Wage Revision) प्रक्रिया वेळेत सुरू करावी आणि पुढील १२ महिन्यांच्या आत ती पूर्ण करावी, असे निर्देश दिले आहेत. बँक कर्मचाऱ्यांचं वेतन आणि सुविधा वेळेवर अपडेट करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलंय.
जालना: जालना: दुचाकींच्या समोरासमोर धडकेत तिघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी
जालन्यात दोन दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या भीषण धडकेत तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. नळणी गावाजवळ ही दुर्घटना घडली, ज्यात दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला. जखमी व्यक्तीवर जालना येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
व्यापार: सोनं-चांदी स्वस्त; खरेदीपूर्वी तपासा ताजे दर
कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ आणि डॉलरमध्ये आलेली मजबुती यामुळे २७ एप्रिल २०२६ रोजी सोन्या-चांदीच्या किमतीत घसरण पाहायला मिळत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोमवारी बाजार उघडल्यानंतर सोन्याचा भाव १,५२,६४० रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदीचा भाव २,४३,७०७ रुपये प्रति किलोवर आला आहे. सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असल्यानं या घसरणीमुळे सामान्य जनतेला काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
आंतरराष्ट्रीय: चीनमध्ये रोबोची विद्यार्थिनीला मिठी; धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
चीनमध्ये एका रोबोने नृत्याच्या वेळी विद्यार्थिनीला मिठी मारल्याने खळबळ उडाली. विद्यापीठाने याला एआयमधील बिघाड म्हटले आहे. एआयची स्वायत्तता की तांत्रिक चूक, यावर चर्चा सुरू झाली आहे. चीनच्या शानक्सी प्रांतातील विद्यापीठात आयोजित या कार्यक्रमाचा व्हिडीओ सोशल मीडियावर जगभरात मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. काही नेटकऱ्यांनी रोबोमध्ये स्वतंत्र जाणीव विकसित झाली आहे का, असा प्रश्न उपस्थित केला.
व्यापार: शेअर बाजारात तेजीची सुरुवात; सेन्सेक्स, निफ्टीमध्ये वाढ, 'हे' शेअर्स वधारले
घरगुती शेअर बाजारात आज सोमवारी मजबूत सुरुवात झाली आहे. बाजार उघडल्यानंतर सेन्सेक्समध्ये ४०० हून अधिक अंकांची वाढ झाली होती, तर निफ्टीदेखील १०० हून अधिक अंकांनी वधारला होता. बँक निफ्टी ३०० हून अधिक अंकांच्या तेजीसह व्यवहार करत होता. निफ्टी ऑटो आणि एफएमसीजी (FMCG) इंडेक्समध्ये चांगली वाढ दिसून आली.
आंतरराष्ट्रीय: हिल्टनमधील सुरक्षा कवच भेदले; हल्लेखोर उच्चशिक्षित शिक्षक निघाला
वॉशिंग्टन हिल्टन हॉटेलमधील सुरक्षेचे अनेक स्तर भेदून हल्लेखोर आत शिरला होता. हल्लेखोर कोल थॉमस ॲलन, अभियांत्रिकी आणि संगणक शास्त्रातील पदवीधर आहे. तो शिक्षक असून त्याचे कार्य व गेम डेव्हलपमेंटसाठी तो ओळखला जातो. ॲलनने २०१७ मध्ये प्रसिद्ध ‘कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ (कॅलटेक) मधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी मिळवली होती. २०२४ मध्ये त्याला कंपनीने ‘टीचर ऑफ द मंथ’ म्हणून गौरविले होते.
व्यापार: Bank of Baroda FD: ₹१,१०,००० जमा करा आणि ₹४५,६२६ चा निश्चित परतावा मिळवा
जर तुम्ही अशा गुंतवणूकदारांपैकी असाल ज्यांना गुंतवणुकीवर गॅरंटीड परतावा हवा आहे किंवा गुंतवणुकीत कोणताही धोका पत्करायचा नाही, तर तुमच्यासाठी एफडी हा एक उत्तम पर्याय आहे. बँक ऑफ बडोदाच्या ५ वर्षांच्या एफडी योजनेत तुम्हाला व्याजाच्या स्वरूपात उत्तम परतावा मिळेल. या योजनेत तुम्ही ₹१,१०,००० जमा केल्यास तुम्हाला ₹४५,६२६ पर्यंत व्याज मिळू शकतं.
आंतरराष्ट्रीय: इराणचा ट्रम्प यांना इशारा: पाकिस्तानमार्फत 'रेड लाईन' संदेश
अमेरिका-इराण तणावात, इराणने पाकिस्तानमार्फत अमेरिकेला 'रेड लाईन्स' कळवल्या, वाटाघाटीच्या अटी स्पष्ट केल्या. अणु कार्यक्रम आणि होर्मुझ सामुद्रधुनी हे प्रमुख मुद्दे आहेत. पुढील चर्चेपूर्वी इराणला निर्बंध हटवणे अपेक्षित आहे. अमेरिकेचा इराणच्या अणुऊर्जेवर नियंत्रण ठेवण्याचा मानस आहे.
महाराष्ट्र: १ मे पासून ‘मिसिंग लिंक’ सुरू होणार: मुंबई-पुणे अंतर ६ किमीने घटलं
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पामुळे अंतर ६ किमीने कमी होणार आहे. या मार्गावर सध्या कार आणि बसला प्राधान्य असून कुठलीही टोलवाढ नाही. बोगदे, केबल-स्टेड पूल असलेल्या या प्रकल्पाचा उद्देश वेळेत बचत आणि अपघात घटवणे आहे. लोणावळा तलावाच्या १८२ मीटर खालून हा रस्ता जाणार आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाला पूर्णतः ‘ॲक्सेस कंट्रोल’ बनविणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाची उभारणी केली आहे.
क्रिकेट: रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
आयपीएल २०२६ स्पर्धेतील रविवारी लखनौ सुपर जाएंट्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळवण्यात आलेल्या सामन्याचा निकाल सुपर ओव्हरमध्ये लागला. लखनौच्या इकाना स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात कोलकाताच्या संघाने रिंकूच्या धमाकेदार खेळीच्या जोरावर १५५ धावा करत लखनौसमोर १५६ धावांचे टार्गेट सेट केले होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना मोहम्मद शमीनं अखेरच्या चेंडूवर मारलेल्या षटकाराच्या मदतीने लखनौ सुपर जाएंट्सनं सामना सुपर ओव्हरमध्ये नेला. पण इथं शेवटी कोलकाता नाईट रायडर्सने बाजी मारली.
आंतरराष्ट्रीय: अमेरिका-इराण तणावाचा पाकला फटका; दोनच आठवड्यांत २०० अब्ज रुपयांचं नुकसान
अमेरिका-इराण तणावामुळे पाकिस्तानच्या मध्यस्थी प्रयत्नांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. इंधनाचे वाढते दर आणि ऊर्जा संकटामुळे परिस्थिती गंभीर झाली आहे, अब्जावधींचे नुकसान आणि व्यवसायांवर परिणाम झाला आहे. यामुळे आर्थिक अडचणी वाढल्या आहेत.
ऑटो: BYD ची नवीन इलेक्ट्रिक कार: 630 किमी रेंज, 9 मिनिटांत चार्ज!
BYD ने नवीन Atto 3 सादर केली, जी 630 किमी रेंज आणि 9 मिनिटांत चार्ज होते. या खाास एसयूव्हीमध्ये 750 लीटर बूट स्पेस, प्रगत ड्रायव्हर असिस्टंट फीचर्स आणि प्रीमियम इंटीरियर आहे. भारतात लॉन्चची तारीख निश्चित नाही, मात्र लोकप्रियतेमुळे ती लवकरच भारतात लॉन्च होणे अपेक्षित आहे...
व्यापार: ₹५०,००० पगारावर कोट्यधीश होण्याची संधी; निवृत्तीपर्यंत सुमारे ₹२.९३ कोटींचा फंड शक्य...
नियमित बचत आणि दीर्घकालीन गुंतवणुकीमुळे छोटी रकमदेखील मोठ्या निधीत रूपांतरित होऊ शकते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे Employees' Provident Fund (EPF). दरमहा ₹५०,००० पगार असलेला कर्मचारीही निवृत्तीपर्यंत जवळपास ₹२.९३ कोटींचा फंड तयार करू शकतो.
आंतरराष्ट्रीय: पाकिस्तानी दहशतवाद्यांमध्ये 'अज्ञाता'ची दहशत, आता लष्कर कमांडर ठार
पाकिस्तानात अज्ञात हल्लेखोराने लष्कर कमांडर युसूफ अफ्रिदीचा खात्मा केल्याने दहशतवाद्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यावर्षी लष्कर-ए-तैयबा आणि हिजबुल मुजाहिद्दीनच्या 30 हून अधिक कमांडरांचा खात्मा झाला आहे, ज्यामुळे पाकिस्तानी सैन्य आणि गुप्तचर यंत्रणा त्रस्त आहेत. 'अज्ञात' हल्लेखोरांच्या कृतीमुळे दहशतवाद्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.
क्रिकेट: साई सुदर्शनचा जलवा! गुजरातचा CSK वर मोठा विजय, ऋतुराजची झुंज व्यर्थ.
साई सुदर्शनच्या दमदार खेळीसह कर्णधार शुभमन गिल आणि जोस बटलरच्या उपयुक्त खेळीच्या जोरावर गुजरात टायटन्सच्या संघाने चेपॉकच्या मैदानात चेन्नई सुपर किंग्सला एकतर्फी मात दिली. पहिल्यांदा फलंदाजी करताना ऋतुराज गायकवाडच्या आश्वासक अर्धशतकाच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने निर्धारित २० षटकात ७ बाद १५८ धावा केल्या होत्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना गुजरातच्या संघाने ८ विकेट्स आणि २० चेंडू राखून दिमाखदार विजय नोंदवला.
पुणे: Video : मराठी रिक्षाचालकांनाच परवाने द्या; अन्यथा रस्त्यावर उतरू; अमित ठाकरे यांचा इशारा
पिंपरी : ज्या रिक्षा चालकांना मराठी येते किंवा जे मराठी आहेत, त्यांनाच परवाने द्यावेत. या सरकारच्या निर्णयाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. ज्यांना मराठी बोलायचे नाही, त्यांनी आपल्या शहरात परत जावे. आमचे मराठी रिक्षाचालक मुंबई आणि महाराष्ट्र चालू ठेवण्यास सक्षम आहेत. ४ तारखेच्या संपाबाबत आम्ही नंतर बोलूच, पण आमच्या अंगावर येऊ नका, अन्यथा रस्त्यावर मारू, असा इशारा मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी दिला.