मराठी भाषेवरून विनाकारण गैरसमज पसरवू नका; परिवहन विभागाच्या भूमिकेचे उदय सामंतांकडून समर्थन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 12:06 IST2026-04-27T12:03:31+5:302026-04-27T12:06:16+5:30

"महाराष्ट्रात राहतो तर मराठी आलीच पाहिजे!" भाषवेरून होणाऱ्या राजकारणावर उद्योगमंत्री उदय सामंत कडाडले.

"If You Live in Maharashtra, You Must Know Marathi," says Minister Uday Samant in Nanded | मराठी भाषेवरून विनाकारण गैरसमज पसरवू नका; परिवहन विभागाच्या भूमिकेचे उदय सामंतांकडून समर्थन

मराठी भाषेवरून विनाकारण गैरसमज पसरवू नका; परिवहन विभागाच्या भूमिकेचे उदय सामंतांकडून समर्थन

नांदेड:मराठी भाषेच्या मुद्द्यावरून काही लोक विनाकारण राजकारण करत असल्याची टीका उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली आहे. रविवारी हदगाव येथे शिवसेना (शिंदे गट) आयोजित सामूहिक विवाह सोहळ्यासाठी ते आले होते. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, परिवहन विभाग किंवा शिवसेनेची भूमिका कोणावरही सक्ती करण्याची नसून, केवळ मराठी शिकावे हा त्यामागचा शुद्ध उद्देश आहे.

"शिकवायला आम्ही सज्ज!"
रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी बोलता यावे, ही परिवहन मंत्र्यांची भूमिका योग्यच असल्याचे सांगत सामंत म्हणाले की, "आम्ही त्यांना स्वतःहून शिका असे म्हणत नाही, तर आम्ही त्यांना शिकवायला तयार आहोत. राज्याचे जिल्हाधिकारी किंवा पोलीस अधीक्षक यांनाही मराठीचा पेपर द्यावा लागतो, मग इतरांना मराठी येण्यात वावगे काय?" महाराष्ट्रात राहणाऱ्यांना मराठी भाषा येणे ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.

चव्हाणांच्या हेलिकॉप्टर कारखान्यावर 'टोला'
नांदेडमध्ये ४ हजार कोटींचा हेलिकॉप्टर सुटे भाग तयार करण्याचा कारखाना होणार असल्याची माहिती खासदार अशोक चव्हाण यांनी दिली होती. यावर विचारले असता सामंत यांनी मिश्किलपणे टोला लगावला. "हा कारखाना कुठे आणि केव्हा होणार, याची मला माहिती घ्यावी लागेल. आताच आमदार हेमंत पाटील यांनी मला हे सांगितले, पुढच्या दौऱ्यात यावर सविस्तर बोलतो," असे म्हणत त्यांनी चव्हाणांच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

Web Title : उदय सामंत ने मराठी भाषा पर जोर दिया, अनावश्यक गलतफहमी की आलोचना की।

Web Summary : उदय सामंत ने मराठी भाषा में दक्षता की पहल का समर्थन किया, खासकर परिवहन श्रमिकों के लिए। उन्होंने जबरदस्ती के दावों का खंडन किया, जोर देकर कहा कि मराठी सीखना आवश्यक है और निर्देश प्रदान किए जाएंगे। उन्होंने अशोक चव्हाण की हेलीकॉप्टर फैक्ट्री की घोषणा पर भी सवाल उठाया, ठोस विवरणों की कमी का संकेत दिया।

Web Title : Uday Samant defends Marathi language push, criticizes unnecessary misunderstandings.

Web Summary : Uday Samant supports the initiative for Marathi language proficiency, especially for transport workers. He refuted claims of coercion, emphasizing that learning Marathi is essential and instruction will be provided. He also questioned Ashok Chavan's helicopter factory announcement, hinting at a lack of concrete details.