टिटवाळ्यातील बेपत्ता वृद्ध पती-पत्नीचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळला; घातपात की आत्महत्या?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 18:34 IST2026-04-27T18:33:00+5:302026-04-27T18:34:23+5:30

मालमत्तेच्या वादातून दोघांनी आत्महत्येचे पाऊल उचलले असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

bodies of an elderly couple who were missing from Titwala were found in a burnt state. Was it an accident or suicide? | टिटवाळ्यातील बेपत्ता वृद्ध पती-पत्नीचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळला; घातपात की आत्महत्या?

टिटवाळ्यातील बेपत्ता वृद्ध पती-पत्नीचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळला; घातपात की आत्महत्या?

कल्याण : टिटवाळ्यातून काही दिवसापासून बेपत्ता असलेल्या वृद्ध पती पत्नीचा मृतदेह मुरबाडच्या म्हसा परिसरात जळलेल्या अवस्थेत आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. महादू घऱ्त आणि कमलाबाई घरत अशी या दोघांची नावे आहेत. मालमत्तेच्या वादातून दोघांनी आत्महत्येचे पाऊल उचलले असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

कल्याण ग्रामीण भागातील म्हारळ परिसरात राहणारे महादू घरत (८५) आणि कमलाबाई घरत (७५) हे राहत होते. ते काही दिवसापासून बेपत्ता होते. आई वडील बेपत्ता असल्याची तक्रार त्यांच्या मुलीने २३ एप्रिल रोजी टिटवाळा पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानंतर पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली. पोलिसांकडून तपास सुरु असताना असतानाच मुरबाड तालुक्यातील म्हसा परिसरात रस्त्यालगत दोघांचे मृतदेह आढळून आले.

जळालेल्या अवस्थेत हे मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ उडाली. या दोघांनी आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. महादू आणि कमलाबई या दोघांचा मालमत्तेवरुन त्यांच्या घरच्याशी वाद होता. या वादातून प्रकार घडला असावा अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. ही हत्या आहे की आत्महत्या या अंगाने पोलिस पुढील तपास करीत आहेत.

Web Title : टिटवाला से लापता वृद्ध दंपत्ति जले हुए मिले: आत्महत्या?

Web Summary : टिटवाला से लापता एक वृद्ध दंपत्ति मुरबाड के म्हसा के पास जले हुए पाए गए। महादू घरत (85) और कमलाबाई घरत (75) के रूप में हुई पहचान। पुलिस को संपत्ति विवाद के कारण आत्महत्या का संदेह है, लेकिन सभी संभावनाओं की जांच कर रही है।

Web Title : Missing elderly couple found dead, burned in Titwala: Suicide?

Web Summary : An elderly couple missing from Titwala were found burned to death near Mhasa, Murbad. Mahadu Gharat (85) and Kamalabai Gharat (75) were identified. Police suspect suicide due to property disputes, but are investigating all possibilities.

टॅग्स :fireआग