Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >गुंतवणूक > ₹५०,००० पगारावर कोट्यधीश होण्याची संधी; निवृत्तीपर्यंत सुमारे ₹२.९३ कोटींचा फंड शक्य...

₹५०,००० पगारावर कोट्यधीश होण्याची संधी; निवृत्तीपर्यंत सुमारे ₹२.९३ कोटींचा फंड शक्य...

EPF Retirement Planning: निवृत्तीपर्यंत कोट्यधीश होण्यासाठी किती गुंतवणूकीची गरज?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2026 20:04 IST2026-04-26T20:03:38+5:302026-04-26T20:04:41+5:30

EPF Retirement Planning: निवृत्तीपर्यंत कोट्यधीश होण्यासाठी किती गुंतवणूकीची गरज?

EPF Retirement Planning: Opportunity to become a millionaire on a salary of ₹50,000; Fund of around ₹2.93 crore possible by retirement | ₹५०,००० पगारावर कोट्यधीश होण्याची संधी; निवृत्तीपर्यंत सुमारे ₹२.९३ कोटींचा फंड शक्य...

₹५०,००० पगारावर कोट्यधीश होण्याची संधी; निवृत्तीपर्यंत सुमारे ₹२.९३ कोटींचा फंड शक्य...

EPF Retirement Planning: नियमित बचत आणि दीर्घकालीन गुंतवणुकीमुळे छोटी रकमदेखील मोठ्या निधीत रूपांतरित होऊ शकते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे Employees' Provident Fund (EPF). दरमहा ₹५०,००० पगार असलेला कर्मचारीही निवृत्तीपर्यंत जवळपास ₹२.९३ कोटींचा फंड तयार करू शकतो.

EPF म्हणजे काय आणि पैसा कसा वाढतो?

EPF ही नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी सुरक्षित आणि विश्वासार्ह बचत योजना मानली जाते. यात दरमहा कर्मचारी आणि नियोक्ता (कंपनी) दोघेही योगदान देतात. दीर्घकाळ गुंतवणूक आणि त्यावर मिळणाऱ्या व्याजामुळे छोटी बचतही मोठ्या रकमेच्या स्वरूपात वाढते. निवृत्तीच्या वेळी आर्थिक सुरक्षितता देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

₹५०,००० पगारावर EPFचे गणित

जर एखाद्या व्यक्तीचा मासिक पगार ₹५०,००० असेल आणि बेसिक पगार ₹२५,००० धरला, तर कर्मचाऱ्याचे मासिक योगदान सुमारे ₹३,००० आणि कंपनीचे योगदान सुमारे ₹९१७, अशाप्रकारे एकूण मासिक जमा ₹३,९१७ होते. तर, वर्षभरात सुमारे ₹४७,००० EPF खात्यात जमा होतात. या रकमेवर सध्या सुमारे ८.२५% वार्षिक व्याज मिळते, ज्यामुळे निधी सातत्याने वाढत राहतो.

निवृत्तीपर्यंत किती फंड तयार होऊ शकतो?

जर एखादी व्यक्ती वयाच्या २५ व्या वर्षी नोकरी सुरू करून ६० वर्षांपर्यंत EPFमध्ये सातत्याने गुंतवणूक करत राहिली, तर निवृत्तीवेळी एकूण फंड सुमारे ₹२,९३,९२,२५७, तर एकूण गुंतवणूक सुमारे ₹१,०१,३९,२६८ होते. हे गणित  (SBI Securities च्या EPF कॅल्क्युलेटरनुसार) पगार दरवर्षी सुमारे ९% दराने वाढतो, या गृहितकावर आधारित आहे.

कंपाउंडिंगचा मोठा फायदा

या संपूर्ण प्रक्रियेत सर्वात महत्त्वाची भूमिका कंपाउंडिंग (चक्रवाढ व्याज) बजावते. दीर्घकाळ गुंतवणूक केल्यामुळे व्याजावरही व्याज मिळत राहते, ज्यामुळे अंतिम रक्कम मोठ्या प्रमाणात वाढते.

Web Title : ₹50,000 वेतन: ईपीएफ से करोड़पति बनने का मौका

Web Summary : ईपीएफ ₹50,000 कमाने वालों को भी नियमित बचत और चक्रवृद्धि ब्याज के माध्यम से सेवानिवृत्ति कोष बनाने की अनुमति देता है। 25 से 60 वर्ष की आयु तक लगातार निवेश करने से ₹2.93 करोड़ मिल सकते हैं, जो सेवानिवृत्ति के बाद वित्तीय स्थिरता सुनिश्चित करता है।

Web Title : ₹50,000 Salary: Chance to Become a Crorepati with EPF

Web Summary : EPF allows even those earning ₹50,000 to build a significant retirement fund through regular savings and compounding. Investing consistently from age 25 to 60 can yield ₹2.93 crore, securing financial stability after retirement.