येथील गृहरक्षक दलाच्या (होमगार्ड) रिक्त ५४५ पदभरतीसाठी बी.ए., बी.कॉम., एलएल.बी., एम.एस्सी., एम.ए., बी.एड, इंजिनिअर, अशा उच्चशिक्षित उमेदवारांनी अर्ज केले आहेत. बेरोजगारीमुळे हे उच्चशिक्षित तरुण-तरुणी आलेली प्रत्येक संधी अजमावून पाहत आहेत. नोंदणीकृत २
...