शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
2
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
3
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
4
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
5
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
6
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
7
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
8
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
9
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
10
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
11
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
12
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
13
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
14
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
15
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
16
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
17
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
18
WTC 2025-27 Points Table : बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय! टीम इंडिया फायद्यात; ते कसं?
19
सावधान! ९९% लोकांना टरबूज खाण्याची योग्य पद्धतच माहीत नाही; डॉक्टरांनी सांगितलेल्या 'या' ३ चुका पडू शकतात महागात
20
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळात डुकरांचा महिमा!

By admin | Updated: January 14, 2015 23:37 IST

रब्बी ज्वारीवर संक्रांत : पिकांची नासधूस होत असल्याने शेतकरी त्रस्त

पिंपोडे ब्रुदुक : उत्तर कोरेगाव तालुक्यातील शेतकरी दुष्काळाचा सामना करित असतानाच सध्या रब्बी ज्वारी पिकाचे रानडुकरे अतोनात नुकसान करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे दुष्काळात तेरावा महिना अशी परिस्थती निर्माण झालेली आहे.
यापूर्वी सोळशी, रणदुल्लाबाद, करंजखोप, सर्कलवाडी, राऊतवाडी, अनपटवाडी, आसनगाव या डोंगर पायथ्याच्या गावाना वन्य प्राण्यांचा त्रास नित्याचा होता. डोंगर पायथ्याच्या शेतीचे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान या प्रान्यांकडून होत होते. आजही होते आहे. मात्र, गेल्या तीन ते चार वर्षापासून अगदी मानवी वस्तीजवळ हे प्राणी येऊ लागले आहेत. त्यामुळे नित्य रहदारी असलेल्या रस्त्याकडेच्या शेतातही हे प्राणी दिवसाही वास्तव्य करू लागले आहेत. त्यामुळे सध्या शेतात एकट्याने जाणे धाडसाचे ठरू लागले आहे.पिंपोडे बुद्रुकसह परिसरातील शिवारात ज्वारींचे पीक बहरात येऊ लागले आहे. मुळातच दुष्काळी सावटाचाली इथला शेतकरी वावरतो आहे. कधी अचानक थंडी वाढत आहे. तर कधी अवकाळी पाऊस या बदलत्या निसर्गचक्रामधून सध्या उभी असलेली ज्वारी, गहु, हरभरा ही पिके अजूनही पूर्णपणे हातात येण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झालेला आहे.
अशातच सध्या पिंपोडे बुद्रुक, दहिगाव, घिगेवाडी, आसनगाव येथील शिवारात रानडुकरांनी धुमाकुळ घातला आहे. ज्वारीच्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर रानडुकरे नुकसान करित आहेत. त्यामुळे सध्या निसवलेली व पोटऱ्यात असलेली ज्वारी डोळ्यादेखत आडवी झालेली पहावी लागत आहे. या रानडुकरांचा बंदोबस्त करणे शेतकऱ्यांसाठी अशक्य काम आहे. त्यामुळे वन खात्याने लक्ष घालण्याची मागणी शेतकरी वर्गातुन केली जात आहे. (वार्ताहर)

४गेल्या चार वर्षापासून सोळशी, ता. कोरेगाव येथिल डोंगर रांगेपासून अरबवाडी, दुधनवाडी पर्यंतच्या डोंगरावर पवनचक्क्यांचे जाळे निर्माण झाले आहे. त्याकामी डोंगरमधून मोठ-मोठे रस्ते करण्यात आलेले आहेत. पवनचक्क्यांच्या सुरक्षेसाठी तेथे सुरक्षा रक्षक काम करतात. त्याचबरोबर पात्यांच्या घर-घर आवाजामुळे वन्य प्राण्यांनी आपले निवासस्थान बदलल्या लक्षात येते. एरव्ही दाट झाडी अथवा अडोशाला राहणारे लांडगा, तरस, रानडुक्कर आणि वन्यप्राणी सध्या मानवी वस्तीकडे सरकल्याचे लक्षात येते. अन् त्याचमुळे ऊस अथवा ज्वारीच्या पिकाचा आडोसा रानडुक्कर अथवा लांडगा, तरस या या प्राण्यांसाठी महत्त्वाचा ठरतो. पिकांच्या नुकसानीस हे प्राणी कारणीभूत ठरु लागले आहेत. गेल्या काही दिवसांपासून येत आहे. परिणामी शेतकऱ्यांना मोठ्या नुकसाणीस सामोरे जावे लागत आहे.

सध्या ज्वारी पोटरा धरू लागली आहे. त्यामुळे ज्वारीचे नुकसान भरून निघणार नाही. जवळपास अर्ध्या एकरामध्ये ज्वारीचे पीक अर्ध्यातच कुरतडुन टाकून रानडुकरांनी नुकसान केले आहे. वन विभागाने या प्राण्यांच्या बंदोबस्त करणे आवश्यक आहे.
-नानासाहेब लेंभे,
शेतकरी पिंपोडे बुदु्रक


वन्य प्राणी मानवी वस्तीकडे सरकू लागले
रात्र गस्त धोकादायक
पिकांचे नुकसान हे बहुतेकवेळा रात्रीचेच होत असते. हे प्राणी दिवसां अडचणीचे ठिकाण शोधतात. त्यामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी जर शेतकऱ्यांनी रात्रगस्त घालून या पाण्यांपासून पिकांचे नुकसान टाळण्याचा प्रयत्न केल्यास ते धोकादायक ठरू शकते. लांडग्यांचा कळप अथवा रानडुकर माणसावर प्रतिहल्ला करण्यासही मागे-पुढे पाहत नाही. त्यामुळे शेतकरी हा धोका पत्करु शकत नाहीत.
विद्युत करंटचा प्रयोग
अनेक वेळा शेतकरी रानडुकरांच्यापासून पिकांचे संरक्ष करण्यासाठी विद्युत करंट देण्याचा प्रयोग केला जातो. शेतीच्या चौफेर तारांचे कुंपन तयार करून त्याला विद्युत करंट देण्यात येतो. त्यामुळे रानडुक्कर करंट लागल्यास सहजासहजी पिकात शिरकाव करू शकत नाही. मात्र संबंधित शेतकरी अथवा शेजारी किंवा अन्य कुणी त्या शेतामध्ये गेल्यास आणि याचा अंदाज न आल्यास मोठी जिवितहानी होऊ शकते. त्यामुळे तो प्रयोगही अंगलट येण्याची शक्यताच जास्त असते.

वन्य प्राणी मानवी वस्तीकडे सरकू लागले
रात्र गस्त धोकादायक
पिकांचे नुकसान हे बहुतेकवेळा रात्रीचेच होत असते. हे प्राणी दिवसां अडचणीचे ठिकाण शोधतात. त्यामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी जर शेतकऱ्यांनी रात्रगस्त घालून या पाण्यांपासून पिकांचे नुकसान टाळण्याचा प्रयत्न केल्यास ते धोकादायक ठरू शकते. लांडग्यांचा कळप अथवा रानडुकर माणसावर प्रतिहल्ला करण्यासही मागे-पुढे पाहत नाही. त्यामुळे शेतकरी हा धोका पत्करु शकत नाहीत.
विद्युत करंटचा प्रयोग
अनेक वेळा शेतकरी रानडुकरांच्यापासून पिकांचे संरक्ष करण्यासाठी विद्युत करंट देण्याचा प्रयोग केला जातो. शेतीच्या चौफेर तारांचे कुंपन तयार करून त्याला विद्युत करंट देण्यात येतो. त्यामुळे रानडुक्कर करंट लागल्यास सहजासहजी पिकात शिरकाव करू शकत नाही. मात्र संबंधित शेतकरी अथवा शेजारी किंवा अन्य कुणी त्या शेतामध्ये गेल्यास आणि याचा अंदाज न आल्यास मोठी जिवितहानी होऊ शकते. त्यामुळे तो प्रयोगही अंगलट येण्याची शक्यताच जास्त असते.