शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

Satara Phaltan Doctor Death Case: महिला डॉक्टर, पोलिसांच्या परस्पर तक्रारी; फॉरेन्सिक टीम तळ ठोकून

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 12:40 IST

Satara Phaltan Women Doctor Death Case: पोलिसांनी सुरुवातीला आकस्मिक गुन्हा दाखल केला

Satara Crime: फलटण तालुक्यात महिला सरकारी डॉक्टरच्या तळहातावर सुसाइड नोट आहे. त्यात फलटण ग्रामीणचा पोलिस उपनिरीक्षक व अन्य एक अशा दोघांची नावे आहेत. याप्रकरणी मानसिक व शारीरिक त्रास व लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी फलटण शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींना अटक करण्यासाठी पथके रवाना झाली आहेत. तसेच, उपनिरीक्षकाला निलंबित करण्यात आले आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिली.फलटण शहरातील एका हॉटेलमध्ये महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याचा प्रकार गुरुवार रात्री उघडकीस आला. डॉक्टरच्या मृतदेहावर शुक्रवारी दुपारी शवविच्छेदन करण्यात आले. त्याठिकाणी पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधून माहिती दिली.पोलिस अधीक्षक दोशी म्हणाले, संबंधित डॉक्टरने फलटण शहरातील हॉटेलची रूम बुक केली होती. रूम बंद असल्याने व फोनही लागत नसल्याने हॉटेल व्यवस्थापनाने बनावट चावीने दरवाजा उघडल्यानंतर ही घटना समोर आली. पोलिसांनी सुरुवातीला आकस्मिक गुन्हा दाखल केला. नातेवाइकांशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी 'आम्ही घटनास्थळी पोहोचत नाही, तोपर्यंत पंचनामा करू नका', अशी मागणी केली. यानंतर रात्री तीनच्या सुमारास पंचनामा करण्यात आला. यावेळी महिलेच्या तळहातावर सुसाइड नोट आढळली. घटनास्थळी पेनही आढळले आहे. पोलिसांनी त्या हॉटेलचा तीन दिवसांचा डीव्हीआर घेतला आहे. महिलेच्या तळहातावरील सुसाइड नोटनुसार आत्महत्या आणि अत्याचाराचा गुन्हा फलटण शहर पोलिसांत दाखल करण्यात आला असून, फलटण शहर पोलिस तपास करत आहेत. तपासाची जबाबदारी उपविभागीय पोलिस अधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्याकडे देणार असल्याचेही दोशी नमूद केले.

महिला डॉक्टर, पोलिसांच्या परस्पर तक्रारीपोलिसांना सोईस्कर अशी वैद्यकीय प्रमाणपत्रे देण्यासाठी महिला डॉक्टरवर दबाव टाकला जात होता काय, असा प्रश्न माध्यमांनी केला असता तुषार दोशी म्हणाले, महिला डॉक्टरने तत्कालीन पोलिस उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पोलिसांविराेधात तक्रार केली होती.त्याचप्रमाणे पोलिसांनीही जिल्हा शल्यचिकित्सकांकडे महिलेच्या विरोधात तक्रार केली होती. या दोन्ही गोष्टींचा काही संबंध नसावा, मात्र, गुन्हा दाखल केला आहे. ही आत्महत्याच आहे काय आणि आत्महत्या असेल, तर त्यामागील कारणे काय, याचा शोध घेतल्यानंतर सत्य परिस्थिती समोर येईल, असे दोशी यांनी सांगितले.

फॉरेन्सिक टीम रात्रीपासून तळ ठोकूनफलटण शहरात ज्या ठिकाणी घटना घडली, तेथे फॉरेन्सिक टीम रात्रीपासून तळ ठोकून आहे. तपास योग्य रीतीने सुरू असून, तांत्रिक बाजूही तपासून घेतल्या जात असल्याचे दोशी यांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Phaltan: Woman Doctor's Suicide Sparks Investigation; Police Officer Suspended

Web Summary : A female doctor's suicide in Phaltan, with a note alleging police harassment, led to a case against officers. A police officer is suspended. Forensic teams investigate the incident.
टॅग्स :Deathमृत्यूSatara areaसातारा परिसरdoctorडॉक्टरPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी