शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
5
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
6
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
7
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
8
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
9
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
10
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
11
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
12
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
13
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
14
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
15
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
16
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
17
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
18
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
19
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
20
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

तांबवेचा जुना पूल होतोय नामशेष!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:26 IST

स्वातंत्र्यसैनिकांची पंढरी म्हणून ओळख असलेल्या तांबवे गावची व सभोवताली असणाऱ्या वाडी-वस्त्यांची या पुलामुळे सोय झाली होती. १९८० साली या ...

स्वातंत्र्यसैनिकांची पंढरी म्हणून ओळख असलेल्या तांबवे गावची व सभोवताली असणाऱ्या वाडी-वस्त्यांची या पुलामुळे सोय झाली होती. १९८० साली या पुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले. २८ मार्च १९८१ रोजी बांधकाम पूर्ण होऊन पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. पुलामुळे या मार्गावरील दळणवळण सुकर झाली. पुलाचे उद्घाटन तत्कालीन मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांच्या हस्ते झाले होते. त्या काळी हा पूल बांधण्यासाठी १४ लाख ८० हजार रुपये खर्च आला होता.

तांबवे गाव व सभोवताली असणाऱ्या डेळेवाडी, किरपे, आरेवाडी, गमेवाडी, टेळेवाडी, साजूर, पाठरवाडी, उत्तर तांबवे, दक्षिण तांबवे या गावांतील ग्रामस्थांना पूर्वी कोयना नदी ओलांडण्यासाठी नावेचा वापर करावा लागत होता. नदीला महापूर आला की गावची अवस्था बेटासारखी होत होती. दळवळण ठप्प होत होते. त्यामुळे हा पूल बांधण्यात आला. गत चाळीस वर्षांपासून अनेक घडामोडींचा साक्षीदार असणारा हा पूल २०१९ साली आलेल्या महापूरात आठ दिवस पाण्यात होता. त्याचे कॉलम कमकुवत झाले होते. त्यामुळे वाहतुकीसाठी तो बंद होता. १४ ऑगस्ट २०१९ रोजी पहाटे या पुलाचे पश्चिमेकडील दोन खांब कोसळले. तत्पूर्वी या पुलानजीकच १५ कोटी रुपये खर्च करून नवीन पुल बांधण्यात आला होता. त्यामुळे वाहतुकीची गैरसोय झाली नाही. हा नवीन पूल उद्घाटन न करताच वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. सध्या नवीन पुलाला धोका होऊ नये, यासाठी जुना पूल पाडण्याचे काम सुरू आहे. हा पूल पाडण्यासाठी २० ते २५ लाख रुपये खर्च येणार आहे. याच जुन्या पुलाखाली गेल्या महिन्यात मासेमारी करणाऱ्या युवकांना तीन जिवंत बॉम्ब सापडले होते. त्यामुळे या पुलाची राज्यभर चर्चा झाली होती.

फोटो : १४केआरडी०६

कॅप्शन : तांबवे, ता. कऱ्हाड येथे कोयना नदीवर असलेला जुना पूल पाडण्यास सुरुवात करण्यात आली आहे. (छाया : दीपक पवार)