शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

Karad Bus Accident: नाशिकमधील विद्यार्थ्यांच्या बसचा कराडजवळ अपघात; २० फूट खड्ड्यात कोसळली, ४५ जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 10:09 IST

Satara Karad School Bus Accident: कराडमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. कराड जवळ नाशिकच्या कॉलेजमधील विद्यार्थ्यांची बस २० फूट खड्ड्यात कोसळली आहे.

कराडमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. कराड जवळ नाशिकच्या कॉलेजमधील विद्यार्थ्यांची बस २० फूट खड्ड्यात कोसळली आहे. या बसमध्ये ४० ते ४५ विद्यार्थी प्रवास करत होते, या घटनेमध्ये अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पुणे-बंगळुर महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. यामुळे सातारा ते कराड दरम्यान अनेक ठिकाणी रस्त्यात वळणे आहेत. अनेक ठिकाणी बॅरिकेड्स आहेत. रस्त्याच्या बाजूने खुदाईचे काम सुरू आहे. यामुळे दररोज अपघात होत आहेत.

चालकाचा ताबा सुटून सहलीची बस उड्डाणपुलाचे काम सुरू असलेल्या खड्ड्यात पडून झालेल्या भीषण अपघातात चालकासह ५० विद्यार्थी, २ शिक्षक व ४ आचारी असे ५७ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी एका विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक आहे. पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर वाठार ता कराड गावच्या हद्दीत मंगळवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातानंतर अपघात स्थळी एकच कल्लोळ उडाला होता.

अपघात स्थळावरून व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक येथील पी बी पाटील महाविद्यालया ची बस (क्रमांक एम एच ०४ जे पी ०९२० मधून ५० विद्यार्थ्यांसह २ शिक्षक व ४ आचारी असे ५७ जण नाशिक वरून मालवणला सहलीसाठी गेले होते. सहल आटपून परत नाशिकला परत जात असताना पुणे बेंगलोर महामार्गावर वाठार तालुका कराड गावच्या हद्दीत आले असता सुरक्षिततेचा उपाय नसल्यामुळे चालकाचा ताबा सुटून बस उड्डाण पुलावरून काम सुरू असलेल्या खोल खड्ड्यात कोसळली. या अपघातात चालकासह ५० विद्यार्थी, २ शिक्षक व ४ आचारी असे ५७ जण जखमी झाले आहेत.

जखमींपैकी एका विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक आहे. अपघात होताच अपघात स्थळी एकच गोंधळ उडाला होता. वाठार ता कराड गावच्या ग्रामस्थांनी अपघात स्थळी धाव घेतली. अपघाताची माहिती पोलिसासह महामार्ग पोलीस व देखभाल विभागाला दिली. अपघाताची माहिती मिळताच कराड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, प्रशांत जाधव यांच्यासह पोलीस कर्मचारी तातडीने अपघात स्थळी दाखल झाले. ग्रामस्थांच्या मदतीने अपघातग्रस्त विद्यार्थ्यांना येथील कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमी विद्यार्थ्यांपैकी सुमारे ४० जणांना रुग्णालयात भरती करून घेण्यात आले. तर उर्वरित विद्यार्थ्यांवर प्राथमिक उपचार करण्यात आले.

अपघाताची नोंद घेण्याचे काम कराड तालुका पोलिसांच्या वतीने सुरू आहे.  आमदारांकडून अपघातगृहस्थ विद्यार्थ्यांची विचारपूस सहलीतील अपघातग्रस्त विद्यार्थ्यांवर कृष्णा हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत. आमदार डॉ. अतुल भोसले यांनी हॉस्पिटलमध्ये तात्काळ जाऊन जखमी विद्यार्थ्यांची भेट घेतली. त्यांच्या प्रकृत्तीची विचारपूस केली तसेच डॉक्टरांशी चर्चा करून उपचारांबाबत सर्व आवश्यक सुविधा तात्काळ उपलब्ध करण्याचे निर्देश दिले आहेत. फोटो कॅप्शन पुणे बेंगलोर महामार्गावर वाठार ता. कराड येथील उड्डाणपुलाचे उड्डाणपुलाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था व्यवस्थित नसल्यामुळे सहलीची बस उड्डाण पुलावरून खाली खड्ड्यात कोसळल्याने बसच्या समोरील बाजूचा चक्काचूर झाला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Nashik students' bus accident near Karad; bus fell into pit.

Web Summary : Near Karad, a bus carrying Nashik students fell into a 20-foot pit, injuring 45. Road widening work caused the accident. Injured admitted to Krishna Hospital. No fatalities reported.
टॅग्स :AccidentअपघातKaradकराडSatara areaसातारा परिसर