शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
5
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
6
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
7
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
8
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
9
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
10
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
11
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
12
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
13
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
14
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
15
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
16
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
17
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
18
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
19
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
20
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

बाबा म्हणे आपले..भाऊ मात्र परके!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2015 21:14 IST

कऱ्हाड मलकापूरची हद्द ठरेना : मिळकतीच्या मुद्द्यावरून मेहरबान गुद्द्यावर; नागरिकांचे मनोरंजन

प्रमोद सुकरे - कऱ्हाड सध्या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व कऱ्हाड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील आपली पक्षीय भूमिका बाजूला ठेवून एकमेकांना सहकार्याचीच भूमिका घेत आहेत. कऱ्हाड पालिकेत बाळासाहेबांची तर मलकापुरात पृथ्वीराजबाबांच्या समर्थकांची सत्ता आहे. ‘पृथ्वीबाबा अन् बाळासाहेबांची जमली जोडी, कऱ्हाडच्या राजकारणात आता आली गोडी’ अशा पोस्ट सध्या ‘सोशल मीडिया’च्या माध्यमातून फिरताना दिसतात. बाजार समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेते एकमेकांच्या गळ्यात गळे घालतात, प्रचारसभेत कऱ्हाड, मलकापूरचे नगरसेवक एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसतात; मग पालिकेच्या सभागृहांमध्ये हे आकांडतांडव कशासाठी, हे नागरिकांना न सुटणारे कोडे आहे.सध्या कऱ्हाड आणि मलकापूर शहरांतील काही मिळकतींमुळे हद्दीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तो वाद अगदी भावा-भावांचा बांधाचा वाद असावा, त्याप्रमाणे मुद्द्यावरून जणू गुद्द्यावरच आला आहे. पालिकेच्या दोन्ही सभागृहांत नगरसेवक एकमेकांवर तोंडसुख घेत आहेत. त्यामुळे नागरिकांचे मनोरंजन सुरू आहे. मात्र त्यातील तांत्रिक अडचणी समजावून घेऊन त्या सोडविण्यासाठी कोण प्रयत्न करणार, हा खरा प्रश्न आहे. कऱ्हाड शहरातील काही मिळकती आज कागदोपत्री मलकापूरच्या हद्दीत दिसतात. त्यातील बारा मिळकतींना कऱ्हाड पालिकेनेही मलकापूर नगरपंचायतीला हद्दीत घेण्यासाठी हिरवा कंदील दाखविला आहे. खरंतर हे दुखणे अगदी जुनेच आहे. म्हणजे मलकापूर नगरपंचायत झाल्यापासूनचे आहे. वास्तविक, या मोजक्या मिळकतींनी शहराच्या उत्पन्नावर काही परिणाम होतोय असे नाही. म्हणून त्या सोडाव्यात, असेही नाही. त्यातील तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन सामंजस्याने यावर मार्ग निघायला हवा; पण हे लक्षात कोण घेतो? मलकापूर नगरपंचायतीच्या जुलै महिन्यात झालेल्या मासिक सभेत उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी कऱ्हाडच्या मलकापूर हद्दीत आलेल्या मिळकती आम्ही त्यांना परत करायला तयार आहोत. कऱ्हाड शहर तर मलकापूर शहराच्या थोरल्या भावाप्रमाणे आहे, असे नमूद केले होते; पण त्याहीवेळी मलकापूरच्या काही नगरसेवकांनी ‘आम्ही चांगुलपणाने वागत असताना जर कुणी मुद्दाम टीका करत असेल, तर जशास तसे उत्तर देऊ’ असा दम भरला होता.’ त्यानंतर झालेल्या कऱ्हाड पालिकेच्या दोन सभांमध्ये मलकापूर नगरपंचायतीवरती टीका-टिप्पणी करण्यात आली. मंगळवारी झालेल्या सभेत तर ‘कऱ्हाडकडे वाकड्या नजरेने पाहाल तर याद राखा, मलकापूरची दादागिरी कऱ्हाडात खपवून घेतली जाणार नाही. धाकटा भाऊ म्हणवून घेण्याची तुमची पात्रता नाही. तरीही धाकट्या भावाने एखादी खोडी काढली तर मोठ्या भावाची मुस्काट बसल्याशिवाय राहणार नाही,’ असा सज्जड दमच भरण्यात आला आहे. त्यामुळे हद्दीच्या मुद्द्यावरून तोंडसुख घेणाऱ्यांना ‘हद कर दि आपने’ असेच म्हणावे लागेल.खरंतर कऱ्हाड तालुक्याचे राजकारण अलीकडच्या सात-आठ वर्षांत अस्थिर होऊ लागले आहे. म्हणजे, कऱ्हाड दक्षिणचे विलासराव पाटील-उंडाळकर व कऱ्हाड उत्तरचे पी. डी. पाटील यांच्यात अनेक वर्षे राजकीय समन्वय होता म्हणे. तो पंचायत समिती, बाजार समिती आदी तालुकास्तरीय संस्थांच्यामध्ये दिसून यायचा; पण तरीही दक्षिणचे आमदार नेहमीच उत्तरेच्या राजकारणावर प्रभाव ठेवून राहण्याचा प्रयत्न करायचे. याची सल उत्तरच्या नेत्यांमध्ये होतीच. म्हणून तर सात वर्षांपूर्वी कऱ्हाड तालुक्याच्या राजकारणात आमदार बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक महाआघाडी उदयाला आली. अन् बाजार समितीतील उंडाळकरांचे वर्चस्व असलेल्या सत्तेला सुरुंग लावला. तेव्हापासून तालुक्याच्या राजकारणात सतत काही ना काहीतरी घडतंय... बिघडतंय ! नेत्यांनी लक्ष घालावे... कऱ्हाड आणि मलकापूर शहरांतील हद्दीचा प्रश्न काही मिळकतींवरून ऐरणीवर आला असून, पालिकेतील प्रस्थापित नेते मंडळी मुद्द्यावरून गुद्द्यावर येत आहेत. अशावेळी कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील आमदार व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाळासाहेब पाटील या वरिष्ठ नेत्यांनी यामध्ये लक्ष घालावे, अशी मागणी कऱ्हाड व मलकापूरमधील नागरिकांतून होत आहे. प्यादं कोण ?कऱ्हाड पालिकेच्या सभागृहामध्ये नगरसेवक टीका करत असताना हा वाद न मिटू देणारं एक वेगळं ‘प्यादं’ आहे. असा उल्लेख वारंवार होत होता; पण ते प्यादं नक्की कोण? हे मात्र कळायला मार्ग नाही. हे प्यादं नक्की कऱ्हाडमधील का मलकापूरमधील आहे. याचा शोध सध्या नागरिक घेऊ लागले आहेत. कऱ्हाड, मलकापूर हद्दीबाबत झालेली ती तांत्रिक चूक नाही तर जाणीवपूर्वक घडवून आणलेली तांत्रिक चूक आहे. तेथील नेते चुकीची वक्तव्ये करून लोकांची दिशाभूल करीत आहेत. मलकापूर नगरपंचायत सध्या वेळकाढूपणा करीत आहे; पण त्या मिळकती कऱ्हाडच्याच राहण्यासाठी आम्ही यशस्वी प्रयत्न करू.- सुभाष पाटील, अध्यक्षलोकशाही आघाडी, कऱ्हाड पालिका खरंतर कऱ्हाड,मलकापूरच्या हद्दीचा प्रश्न ही तांत्रिक बाब आहे. आम्हाला न्यायालयाचा आदेश मान्य आहे. कऱ्हाडची कोणतीही मिळकत उगाचच आम्हाला बळकवायची नाही. आम्ही तसा ठरावही आमच्या पालिकेच्या सभागृहात यापूर्वीच केला आहे. - मनोहर शिंदे, उपनगराध्यक्षमलकापूर नगरपंचायत