शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
5
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
6
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
7
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
8
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
9
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
10
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
11
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
12
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
13
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
14
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
15
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
16
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
17
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
18
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
19
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
20
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेचे साहित्य घेऊन जाणाऱ्या कंटेनरला अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:51 IST

लोकमत न्यूज नेटवर्क मलकापूर : मुंबईवरून रेल्वेचे सुटे पार्ट भरून कर्नाटक धारवाड येथे जात असताना चालकाचा ताबा सुटल्याने कंटेनर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मलकापूर : मुंबईवरून रेल्वेचे सुटे पार्ट भरून कर्नाटक धारवाड येथे जात असताना चालकाचा ताबा सुटल्याने कंटेनर पलटी झाला. पुणे-बंगलोर आशियायी महामार्गावर वहागाव (ता. कऱ्हाड) गावच्या हद्दीत रविवारी हा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

अपघातस्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, चालक मुलराज (वय ४५ रा. जम्मू काश्मीर) हा कंटेनर (केए ०१ एजे ४१८०) मधून मुंबईवरून रेल्वेचे सुटे पार्ट भरून कर्नाटक धारवाड येथे जात होता. चालकाचा कंटेनरवरील ताबा सुटल्याने महामार्गाकडेला असलेल्या नाल्यात पलटी झाला. कंटेनरमधील साहित्य उपमार्गावर पडल्यामुळे उपमार्गावरील वाहतूक काही काळ बंद झाली होती. अपघाताची माहिती मिळताच तत्काळ देखभाल विभागाचे कर्मचारी दस्तगीर आगा, जितेंद्र भोसले, सदाशिव सकट, तानाजी नामदास यांनी घटनास्थळी जाऊन त्यांना मदत केली. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

फोटो कॅप्शन

१४मलकापूर कंटेनर

मुंबईवरून रेल्वेचे सुटे पार्ट भरून कर्नाटक धारवाड येथे जात असलेल्या कंटेनरचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने वहागावच्या हद्दीत पलटी झाल्यामुळे साहित्य उपमार्गावर विस्कटले होते. (छाया : माणिक डोंगरे)

===Photopath===

140621\img-20210613-wa0079.jpg

===Caption===

फोटो कॕप्शन

मुंबई वरून रेल्वेचे सुट्टे पार्ट भरून कर्नाटक धारवाड येथे जात असलेल्या कंटेनरचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने वहागांव च्या हद्दीत पलटी झाल्यामुळे साहित्य उपमार्गावर विस्कटले होते. (छाया-माणिक डोंगरे)