शहरं
Join us  
Trending Stories
1
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
2
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
3
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
4
Election Results 2026 LIVE: मुंबईत भाजपाचा 'झालमुरी स्टॉल', पश्चिम बंगाल विजयाचं हटके सेलिब्रेशन
5
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
6
जबलपूर क्रूझ दुर्घटनेत ५ वर्षांच्या विराजचा मृत्यू; पित्याचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या काळजाचंही झालं पाणी!
7
“पश्चिम बंगालमध्ये विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल”; DCM शिंदेंकडून मोदी-शाह यांचे अभिनंदन
8
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
9
हिमंता बिस्वांना आव्हान दिले, पण होमग्राऊंडवरच हरले, राहुल गांधींचे सहकारी गौरव गोगोईंचा दारुण पराभव
10
भारताच्या माजी क्रिकेटपटूची राजकीय मैदानात दमदार एंट्री, बड्या नेत्याविरोधात घेतली मोठी आघाडी
11
'या' स्टॉकनं केलं मालामाल! ५ वर्षांत १४००% चं छप्परफाड रिटर्न, आज पुन्हा अपर सर्किट
12
वैशाख अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: राहु काळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, चंद्रोदयाची वेळ!
13
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
14
UPSC टॉपर घडवणाऱ्या शिक्षिकेचे विद्यार्थ्याकडून अपहण; १.९० कोटी लुटून हॉस्पिटलमध्ये लपला, कारण समोर
15
'सैराट'फेम अरबाज शेखने केला निकाह, कोण आहे 'सल्या'ची पत्नी? रिंकू राजगुरुनेही केली कमेंट
16
"'ट्विंकल-ट्विंकल' शिकण्यासाठी २.५ लाख द्यायचे?"; सिनियर केजीची फी पाहून पालक शॉक
17
दोन सिलिंडर, एकदाच रांगेत राहून भरा, दुप्पट फिरा...! या कंपनीने सीएनजीमध्ये सात सीटर कार लाँच केली
18
बंगालमध्ये सायनी घोष यांचं गाणंच ठरलं गेमचेंजर; भाजपला थेट सत्तेच्या खुर्चीपर्यंत पोहोचवलं
19
'खुल्लम खुल्ला प्यार' आता बंद! 'गर्लफ्रेंड कल्चर' BCCIला अमान्य, 'हे' ४ भारतीय काय करणार?
20
नक्कल करायलाही अक्कल लागते! रोहितच्या स्टाईलमध्ये बाबरचं सेलिब्रेशन; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Daily Top 2Weekly Top 5

Local Body Election Voting: उमेदवाराचे मतदान दुसऱ्यानेच केले, सांगली जिल्ह्यात ७५.९६ टक्के मतदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 14:00 IST

आष्टा, शिराळा, विटा आणि आटपाडीत मतदान यंत्रात बिघाड, नगराध्यक्ष ४१, नगरसेवकपदाच्या ५९२ उमेदवारांचे भवितव्य यंत्रबंद 

सांगली: सहा नगरपरिषद आणि दोन नगरपंचायतींच्या नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मंगळवारी २९१ मतदान केंद्रांवर ७५.९६ टक्के मतदान झाले. शिराळा, विटा आणि आष्टा येथील मतदान यंत्रांमध्ये बिघाड झाल्यामुळे काहीकाळ मतदान थांबवावे लागले. काही मतदान केंद्रांवर उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांत जोरदार वादावादीच्या घटना घडल्या. या घटना वगळता शहरातील मतदान शांततेत पार पडले. आठ नगराध्यक्षासाठी ४१ उमेदवार आणि नगरसेवक पदाच्या १८० जागांसाठी निवडणूक लढवणाऱ्या ५९२ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात सील करण्यात आले.उरुण-ईश्वरपूर, आष्टा, पलूस, तासगाव, विटा आणि जत या नगरपरिषदांमध्ये आणि शिराळा, आटपाडी या नगरपंचायतींमध्ये भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार पक्ष), राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी प्रतिष्ठेची लढत लढवली होती. तासगाव, आष्टा आणि आटपाडी येथे स्थानिक आघाड्यांनीही पक्षांच्या उमेदवारांसमोर आव्हान उभे केले होते.सकाळच्या टप्प्यात मतदान हळूहळू सुरू होते, परंतु दुपारी मतदानाच्या आकड्यांमध्ये झपाट्याने वाढ झाली. सायंकाळी ५.३० वाजता मतदानाची वेळ संपली, तरीही सर्व २९१ मतदान केंद्रांवर मतदारांची रांगा होत्या. विटा, पलूस, शिराळा, जत, आटपाडी आणि तासगाव येथील मतदान केंद्रांवर रात्री सात वाजेपर्यंत मतदारांच्या रांगा चालू होत्या. सहा नगरपरिषद आणि दोन नगरपंचायतीसाठी दोन लाख ५७ हजार ९७७ मतदार होते. यापैकी एक लाख ९५ हजार ९५२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. आठ पालिकांमध्ये सरासरी ७५.९६ टक्के मतदान झाले आहे. शिराळा नगरपंचायतीत सर्वाधिक ८३.०८ टक्के तर सर्वात कमी ७०.४६ टक्के मतदान तासगाव नगरपरिषदेत झाले.आष्टा, शिराळा, विटा आणि आटपाडीत मतदान यंत्रात बिघाडआष्ट्याच्या प्रभाग तीनमधील अंगणवाडी मतदान केंद्रावर सकाळी ७:३० ते ८:४० पर्यंत आणि प्रभाग क्रमांक पाचमध्ये सकाळी ७:३० ते ८:४५ पर्यंत ईव्हीएम मशीन खराब झाल्यामुळे मतदारांना थांबावे लागले. आटपाडी नगरपंचायतीच्या मतदानावेळीही मशीन बंद पडल्यामुळे काही काळ मतदान थांबावं लागलं. शिराळ्यात प्रभाग ११ मधील केंद्रावर सकाळी मतदान यंत्र खराब झाले; मात्र कर्मचारी ताबडतोब दुसरी ईव्हीएम मशीन आणून मतदान सुरू केले. विटा येथील दोन केंद्रांवर मतदान यंत्र खराब झाल्याच्या तक्रारी आल्या, परंतु नंतर मतदान सुरळीत झाले.

२१ डिसेंबरला मतमोजणीसहा नगरपरिषद आणि दोन नगरपंचायतींसाठी मतदान झाले आहे. मात्र, मतमोजणी ३ डिसेंबरऐवजी २१ डिसेंबरला सकाळी १० वाजता सुरू होणार आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

चक्क उमेदवाराचे मतदान दुसऱ्याने केलेपलूसमध्ये चक्क शिवसेनेचे उमेदवार सुनिल कुंभार यांच्या पत्नी राजश्री कुभार यांचे मतदान दुसऱ्याच महिलेने केल्याने मतदान केंद्रावर तणाव निर्माण झाला होता. उमेदवाराच्या पती मतदान केंद्रातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना याबाबत जाब विचारल्याने काही काळ गोंधळ निर्माण झाला होता.

नगरपालिकेसाठी झालेले मतदानपालिका / टक्केवारी- उरुण-ईश्वरपूर / ७४.१४- विटा/ ७९.३६- आष्टा / ७४.७६- तासगाव / ७०.४६- जत / ७२.८५- पलूस / ८०.२८- शिराळा/ ८३.०८- आटपाडी / ७९.६२

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli Local Body Elections: High Voter Turnout, Candidate's Vote Cast by Another

Web Summary : Sangli witnessed 75.96% voter turnout in local body elections. Voting was temporarily halted due to EVM glitches. In Palus, tension rose when someone else cast a candidate's vote. Counting is on December 21.