शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
5
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
6
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
7
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
8
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
9
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
10
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
11
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
12
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
13
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
14
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
15
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
16
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
17
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
18
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
19
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
20
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

लिंगीवरे ओढ्याचे नालाबांध निकामी

By admin | Updated: October 14, 2014 23:25 IST

दुरुस्तीच नाही : गळतीमुळे पाणी वाया

लक्ष्मण खटके -- लिंगीवरे परिसरातील ओढ्याचे पाणी अडविण्यासाठी बांधण्यात आलेले नालाबांध निकामी झाल्यामुळे पावसाचे पाणी पूर्ण क्षमतेने अडले नाही. पाऊस पडला, पण गळतीमुळे पाणी वाहून चालले आहे.लिंगीवरेच्या दक्षिणेला असणाऱ्या ओढ्यावर ठिकठिकाणी नालाबंडिंगची कामे करण्यात आली. पश्चिमेकडील मांगोबा शेतापासून लिंगीवरे हद्दीतील कोंडरापर्यंत सुमारे २०० ते ३०० मीटर अंतरावर नालाबंडिंग बांधण्यात आले आहेत. सुमारे बारा नालाबांधांचे काम तीस वर्षांपूर्वी पूर्ण झाले असून पहिली एक-दोन वर्षे फक्त या नालाबांधात पाणीसाठा झाला होता. परंतु त्यानंतर पाण्याबरोबर वाहून आलेला गाळ सर्वच नाल्यात साचून राहिला. त्यामुळे तेथील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत गेला.पाण्याच्या दाबामुळे व प्रवाहामुळे सिमेंटच्या बांधाला आधार देणारे मातीचे बांध फुटले. काही सिमेंटचे नालाबांधही फुटले आहेत. त्यामुळे होणारा पाणीसाठा व पाण्याचा प्रवाह याच मार्गाने वाया जाऊ लागला. पाणी अडविण्यासाठी नालाबांधात अडथळा राहिलेला नसल्यामुळे मुरणेही बंद झाले आहे.१९९८-९९ मध्ये कृषी विभागामार्फत या नाल्यांच्या दुरुस्तीस लोकसहभागातून नुकताच प्रारंभ झाला. नाल्यांमध्ये वाढलेली झाडे-झुडपे तोडण्याचे काम नावाला झाले. उपस्थितांनी गाळ गाढून पाणी अडविण्यासाठी फुटलेल्या बांधावर पाच पाट्या माती टाकली. या कार्यक्रमाचे सरकारी नियमाप्रमाणे औपचारिक उद्घाटन होऊन, आजअखेर १५ वर्षे परिस्थिती जैसे थे आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जलसंधारणाची विविध कामे करण्यात आली असून, नवीन कामांवर लाखो रुपये खर्च केले गेले. त्याप्रमाणात त्याची उपयोगिता नालाबंडिंगच्या दुरुस्तीच्या कामापेक्षा कमीच आहे.ओढ्याच्या पात्रात बाभळी जोमाने वाढत आहेत. मजुरांना रोजगार मिळावा यासाठी गाळ काढण्याची कामे सुरू करण्यासाठी स्थानिक प्रशासन धडपडले. मात्र शासनाच्या धोरणामुळे गाळ काढण्याची योजना बारगळली. झाडे-झुडपे तशीच वाढली. यावर्षी पाऊस पडून या ओढ्याला पाणी आले. पण अशा परिस्थितीत पाणी वाहून गेले व पूर्ण क्षमतेने पाणीसाठा झाला नाही. मातीचे व सिमेंटचे बांधही फुटलेलिंगीवरे हद्दीतील कोंडरापर्यंत सुमारे २०० ते ३०० मीटर अंतरावर नालाबंडिंग बांधण्यात आले आहेत. सुमारे बारा नालाबांधांचे काम तीस वर्षांपूर्वी पूर्ण झाले असून, पहिली एक-दोन वर्षे फक्त या नालाबांधात पाणीसाठा झाला होता. पाण्याच्या दाबामुळे व प्रवाहामुळे सिमेंटच्या बांधाला आधार देणारे मातीचे बांध फुटले. तसेच काही सिमेंटचे नालाबांधही फुटले आहेत. त्यामुळे होणारा पाणीसाठा व पाण्याचा प्रवाह याच मार्गाने वाया जाऊ लागला आहे.