शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
5
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
6
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
7
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
8
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
9
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
10
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
11
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
12
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
13
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
14
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
15
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
16
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
17
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
18
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
19
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
20
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

पीककर्जाचे काम संथ गतीने!

By admin | Updated: June 29, 2016 23:59 IST

संगमेश्वर तालुका : तळागाळातील शेतकरी अनभिज्ञच

देवरूख : खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना केंद्र शासनाच्या आदेशानुसार बँकांमार्फत पीक कर्ज वितरीत केले जात आहे. शेतकऱ्यांची उदासीनता, शासकीय कर्मचाऱ्यांकडून तळागाळातील शेतकऱ्यांना याची सविस्तर माहिती न मिळणे यामुळे योजनेचे काम धीम्या गतीने सुरू आहे. ७३ हजार १३९ शेतकऱ्यांपैकी केवळ २२ हजार ५४५ शेतकऱ्यांनी आजपर्यंत या योजनेचा फायदा उठवला आहे. तालुक्यात कर्ज वाटपाचे काम ३०.८२ टक्के एवढेच झाले आहे. कोकणातील शेतकरी आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे. शेती हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारने एक पाऊल पुढे टाकत पीक कर्ज वाटपाची योजना राबवण्याचा निर्णय घेत कामकाजाला प्रत्यक्षात प्रारंभ केला आहे. शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते, कीटकनाशके खरेदीसाठी कोणतीही आर्थिक टंचाई भासू नये, या उद्देशाने ही योजना आखण्यात आली आहे.राष्ट्रीयीकृत बँका, सोसायट्या यांच्यामार्फत पीककर्ज वाटपासाठी अर्ज वितरीत करण्यात येत आहेत. संगमेश्वर तालुक्यात ७३ हजार १३९ शेतकरी या योजनेसाठी योग्य आहेत. यातील २२ हजार ५४५ शेतकऱ्यांनी परिपूर्ण अर्ज लिहून सादर केले आहेत. या योजनेचे ३०.८२ टक्के कामपूर्ण झाले आहे. संगमेश्वर तालुका विस्तीर्ण असून, ग्रामीण भाग सर्वाधिक आहे. येथील ग्रामस्थांचा शेती हा व्यवसाय आहे. पीककर्ज वाटप योजनेची सविस्तर माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नसल्याची ओरड ग्रामीण भागातून होत आहे. शेतकऱ्यांमध्ये कर्जापोटी असलेली भीती मुख्य कारण आहे. याचसाठी शेतकरी कर्ज घेण्यासाठी धजावत नाहीत. तालुक्यातील पीक कर्ज घेण्यास योग्य असलेले सुमारे ५० हजार शेतकरी वंचित आहेत. पीक कर्ज योजनेचा लाभ तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन तहसीलदार वैशाली माने यांनी केले आहे. (प्रतिनिधी)शेतकऱ्यांची पाठ : जनजागृतीच नाही...शासकीय कर्मचाऱ्यांकडून म्हणाव्या त्या प्रमाणात जनजागृती केली जात नसल्याने तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत ही योजना पोहोचतच नाही. त्यामुळे गरिबी असल्याने केवळ पैसे नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी शेतीकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे संगमेश्वर तालुक्यात कर्जवाटप कमी झाले आहे.