शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
5
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
6
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
7
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
8
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
9
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
10
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
11
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
12
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
13
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
14
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
15
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
16
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
17
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
18
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
19
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
20
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

आखाड्यात पैलवान ‘तेच’

By admin | Updated: September 30, 2014 00:13 IST

विधानसभा निवडणूक : सामंत-माने लढतीची हॅट्ट्रिक

रत्नागिरी : रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीकडे यंदा संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या मतदारसंघात जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले राष्ट्रवादीचे नेते उदय सामंत शिवसेनेत दाखल झाल्यानंतर सेनेच्या तिकिटावर निवडणूक लढत आहेत, तर गेल्या दोन निवडणुकांप्रमाणेच तिसऱ्यांदा त्यांच्याविरोधात भाजपाचे बाळ माने निवडणूक आखाड्यात उभे ठाकले आहेत. या दोघांपैकी सामंत यांनी पक्ष बदलला आहे. मात्र, असे असले तरी या मतदारसंघात सलग तिसऱ्यांदा मुख्य लढत ही उदय सामंत व बाळ माने यांच्यातच होणार आहे. २००४ व २००९ मधील विधानसभा निवडणुकीत उदय सामंत यांनी सलग दोनवेळा रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या तिकिटावर विजय मिळविला. दुसऱ्या टर्ममध्ये शेवटच्या सत्रात सामंत यांना राष्ट्रवादीने १५ महिन्यांसाठी नऊ खात्यांचे राज्यमंत्रिपदही दिले. त्यामुळे सामंत यांचे नेतृत्व राज्यस्तरावर झळकले. दुसरीकडे बाळ माने हे १९९९ मध्ये रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून भाजपाच्या तिकिटावर निवडून आले. त्यानंतर मात्र सामंत यांच्याकडून दोन्हीवेळा त्यांचा पराभव झाला आहे. परंतु त्या दोन्हीवेळची स्थिती वेगळी होती. आता महायुती तुटली आहे. भाजपा व सेना आमने - सामने ठाकली आहे. स्वबळावरच ही निवडणूक लढविली जात असल्याने अत्यंत अटीतटीचा सामना होणार हे नक्की आहे. भाजपातर्फे यंदा सलग चौथ्यांदा निवडणूक आखाड्यात असलेले बाळ माने हे यावेळी खचलेले दिसत नाहीत. गेल्या दोन वर्षांपासून त्यांनी रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात संपर्क ठेवताना कार्यकर्त्यांची कामे केली आहेत. कार्यकर्त्यांच्या सुखदु:खात सहभागी झाले आहेत. मागील दोन निवडणुकांमधील आपल्या पराभवाचे उट्टे काढण्यासाठी जय्यत तयारी केली. युतीतील दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये ते दुधातील साखरेप्रमाणे मिसळले. मात्र, यावेळी महायुती तुटली. परंतु त्याचा काहीही परिणाम होणार नाही. युती तुटली असली तरी शिवसैनिकांशी मतभेद नाहीत. त्यामुळे आपला विजय निश्चित असल्याचा दावा माने यांनी केला आहे. दुसरीकडे पालकमंत्री म्हणून काम केलेले उदय सामंत यावेळी राष्ट्रवादीतून शिवसेनेत दाखल झाले असून, राष्ट्रवादीतील हजारो कार्यकर्ते आपल्याबरोबर आल्याचा त्यांचा दावा आहे. त्याचबरोबर रत्नागिरी तालुक्यात ९४ पैकी ६८ ग्रामपंचायतींवर शिवसेनेचे वर्चस्व आहे. तालुक्यात गावागावात सेनेच्या शाखा आहेत. त्यामुळे हा मुद्दा सामंत यांच्या पथ्यावर पडणारा आहे. अवघ्या चार दिवसांपूर्वी सेनेत आलेल्या सामंत यांना शिवसैनिकांनी स्विकारले, तर त्यांचा विजय कठीण नाही. परंतु माने यांच्या दाव्याप्रमाणे शिवसैनिकांशी त्यांचे मनभेद नाहीत, या विधानात तथ्य असेल तर ही सामंत यांच्यासाठी धोक्याची घंटा म्हणावी लागेल. अत्यंत वेगळ्या स्थितीत ही निवडणूक होत असल्यानेच सामंत यांची विजयाची हॅट्ट्रिक होणार की माने यांची पराभवाची मालिका खंडित होणार याकडेच आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. येत्या आठवडाभरात याबाबतचे चित्र अधिकच स्पष्ट होणार आहे. (प्रतिनिधी)पक्ष बदलला, लढतीची समीकरणे बदलली.जिल्ह्यातील सर्वात लक्षवेधी लढत ठरण्याची अपेक्षा.सामना अटीतटीचा होण्याची शक्यता.शिवसैनिकांशी मतभेद नसल्याचा माने यांचा दावा.मानेंचा दावा खरा ठरल्यास सामंतांसाठी धोक्याची घंटा.