धक्कादायक ! कोंडगावमध्ये तरुणाचा खून उघडकीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 06:59 PM2021-05-11T18:59:00+5:302021-05-11T19:00:56+5:30

साखरपा : संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव-बाईंगवाडी येथील राकेश मारुती सावंत (३५) या तरुणाचा अज्ञात व्यक्तीने खून केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी ...

Murder of a youth in Kondgaon | धक्कादायक ! कोंडगावमध्ये तरुणाचा खून उघडकीस

धक्कादायक ! कोंडगावमध्ये तरुणाचा खून उघडकीस

Next
ठळक मुद्देधक्कादायक ! कोंडगावमध्ये तरुणाचा खून उघडकीस घरापासून सहाशे मीटरावरील पऱ्यात टाकला मृतदेह

साखरपा : संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव-बाईंगवाडी येथील राकेश मारुती सावंत (३५) या तरुणाचा अज्ञात व्यक्तीने खून केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी उघडकीला आली. खून केल्यानंतर घरापासूनच पाचशे ते सहाशे मीटर लांब असलेल्या शिंदेवाडी येथील जवळच असलेल्या शेवरपऱ्यात टाकण्यात आले.

याबाबतची माहिती कोंडगावचे पोलीस पाटील मारुती शिंदे यांना समजताच साखरपा पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच साखरपा पोलीस दूरक्षेत्राच्या पोलीस उपनिरीक्षक विद्या पाटील यांच्यासहीत पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय मारळकर, महिला पोलीस नाईक अर्पिता दुधाणे, वैभव कांबळे, पोलीस पाटील मारूती शिंदे घटनास्थळी दाखल झाले.

या घटनेची माहिती वरिष्ठांना मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीनिवास साळोखे, पोलीस निरीक्षक मायती जगताप, पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय मारळकर यांनी घटनास्थळी भेट दिली.

हा खून नेमका किती वाजता झाला. कोणत्या कारणासाठी झाला व का झाला याचे कारण अद्याप समजले नाही. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सायंकाळपर्यंत याची कार्यवाही सुरु होती.
 

Web Title: Murder of a youth in Kondgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.