शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
4
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
5
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
6
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
7
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
8
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
9
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
10
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
11
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
12
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
13
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
14
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
15
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
16
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
17
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
18
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
19
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
20
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
Daily Top 2Weekly Top 5

कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा बिगुल, आयोगाकडून मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर

By शोभना कांबळे | Updated: September 15, 2023 18:54 IST

गतवेळी १६,२२२ मतदारांची नोंदणी झाली होती

रत्नागिरी : कोकण पदवीधर मतदारसंघाची मुदत ७ जुलै रोजी संपत आहे. त्या अनुषंगाने आता २०२४ साली होणाऱ्या संभाव्य निवडणुकीच्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाकडून मतदार याद्या पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. याबाबतची अधिसूचना येत्या ३० सप्टेंबर रोजी प्रसिद्ध केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी शुक्रवारी पत्रकारांना दिली.कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक २०१८ साली झाली होती. त्यामुळे आता मुदत संपत आल्याने त्यापूर्वी निवडणुका घेण्यात येणार आहेत. त्यासाठी निवडणूक आयोगाने मतदार याद्या पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार या याद्या अद्यावत करतानाच पदवीधर नवीन मतदारांना नाव नोंदविता येणार आहे. त्यासाठी १८ क्रमांकाचा फाॅर्म भरून मतदार नाव नोंदवू शकतात. यासाठी ६ नोव्हेंबरपर्यंत मतदारांना आपले नाव कोकण पदवीधर मतदार यादीत नोंदविता येणार आहे.मतदारांची प्रारूप यादी २३ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर २३ नोव्हेंबर ते ९ डिसेंबर या कालावधीत या याद्यांवर हरकती मागविण्यात येणार आहेत. त्यावरील सुनावणीनंतर ३० डिसेंबर २०२३ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. या निवडणुकीसाठी विभागीय आयुक्त निवडणूक अधिकारी तर जिल्हाधिकारी हे सहायक निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.

गतवेळी या निवडणुकीसाठी १६,२२२ मतदारांची नोंदणी झाली होती. तसेच निवडणुकीसाठी २६ मतदान केंद्र होती. यावेळीही सुमारे १६ हजार मतदारांची नोंदणी होईल, असा विश्वास यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी व्यक्त केला. त्यासाठी मुख्य निवडणूक आयोगाकडे ५० हजार अर्जांची मागणी करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीElectionनिवडणूकkonkanकोकण