शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

वेळेचा सदुपयोग -- लॉकडाऊनच्या काळात त्यांनी दिले महिलांना योगाचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 13:23 IST

पूर्वा आणि प्राप्ती या बहिणींनी राज्य, राष्ट्र आणि आता आंतरराष्ट्रीय स्तरावरही योगाचे महत्त्व पोहोचविले आहे. शरीराबरोबरच मनही सुदृढ होण्यात योगाचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे.

ठळक मुद्देशरीर, मनाच्या सुदृढ आरोग्यासाठी किनरे भगिनींचा उपक्रमइमारतीतील महिलांसह लहान मुलांसाठी विशेष उपक्रम

रत्नागिरी : लॉकडाऊनच्या काळात सर्व व्यवहार थांबले असतानाच, या कालावधीचा सदुपयोग करीत घरात असलेल्या महिला आणि मुलांसाठी दोन वेळ योगाचे धडे देण्याचा अभिनव प्रयोग रत्नागिरीच्या योगापटू पूर्वा आणि प्राप्ती किनरे भगिनी करीत आहेत. महाराष्ट्र दिनापासून इमारतीच्या टेरेसवर सकाळी आणि सायंकाळी त्यांचे हे योगाचे धडे सुरू आहेत.पूर्वा आणि प्राप्ती या बहिणींनी राज्य, राष्ट्र आणि आता आंतरराष्ट्रीय स्तरावरही योगाचे महत्त्व पोहोचविले आहे. शरीराबरोबरच मनही सुदृढ होण्यात योगाचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. या दोन्ही बहिणींनी अगदी बालवयापासून शिक्षक असलेले वडील शिवराम किनरे यांच्याकडून योगाचे धडे आत्मसात केले. परिश्रम, चिकाटी त्याचबरोबर योगाची प्रचंड आवड असल्याने या दोघींनीही भारतीय योग आंतरराष्ट्रीय स्तरावर नेत रत्नागिरी जिल्ह्याचेच नव्हे तर देशाचे नाव उज्ज्वल केले आहे.सध्या सर्वत्र लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे बहुतांशी लोक अजूनही घरातच आहेत. विशेषत: महिला आणि लहान मुले यांना घराबाहेर पडता येत नाही. कोरोनाच्या संकटातून सुरक्षित राहण्यासाठी योगा हे महत्त्वाचे साधन आहे, हे या भगिनींच्या लक्षात आले. आणि घरात राहणाऱ्या महिला आणि मुले यांचे आरोग्य लॉकडाऊनच्या काळातही सुदृढ राहावे, यासाठी त्यांनी त्या राहात असलेल्या इमारतीमधील महिला आणि लहान मुलांना योगाचे धडे देण्याचा निर्णय घेतला आणि तो अंमलातही आणला.पूर्वा आणि प्राप्ती यांच्या या अभिनव प्रयोगाला त्यांच्या इमारतीमधील नागरिकांकडूनही सदैव प्रोत्साहन मिळत आहे. त्यामुळे त्यांची ही संकल्पना सर्व नागरिकांना पटली आणि आवडलीही. महाराष्ट्र दिनापासून या उपक्रमाची सुरूवात झाली आहे. पूर्वा आणि प्राप्ती सकाळी आणि सायंकाळी ६ ते ७.३० असे दोनवेळा इमारतीमधील महिला आणि मुलांचे योगाचे वर्ग घेत आहेत.

सकाळी प्राणायाम आणि सायंकाळी सूर्यनमस्कार तसेच विविध आसनांचे प्रकार या माध्यमातून महिला व मुलांना शिकायला मिळत आहेत. नियमित प्राणायाम, सूर्यनमस्कार व विविध आसने यामुळे महिला, मुलांचे आरोग्यही चांगले राहात आहे. कोरोना संकट काळात प्रत्येकाने आपली रोगप्रतिकारकशक्ती चांगली ठेवणे गरजेचे आहे. योगाच्या माध्यमातून त्याला हातभार लागत आहे.आनंदासाठी हास्ययोगलॉकडाऊनच्या काळात पूर्वा आणि प्राप्ती किनरे या भगिनी आपल्या इमारतीमधील महिला आणि मुलांकडून नियमित सूर्यनमस्कार, ताडासनाचे प्रकार, कटीचक्रासन, सिंहासन, मंडुकासन, उत्तान मंडुकासन, आकर्ण धनुरासन, नाकासन, मेरू दंडासन आदी प्रकार करून घेत आहेत. त्याचबरोबर चित्त आनंदी राहण्यासाठी हास्ययोगही करून घेत आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसYogaयोग