Today's horoscope - 11 August 2020; Will get beneficial news from wife | आजचे राशीभविष्य - 11 ऑगस्ट 2020; अविवाहितांना योग्य जोडीदार मिळेल

आजचे राशीभविष्य - 11 ऑगस्ट 2020; अविवाहितांना योग्य जोडीदार मिळेल

मेष - श्रीगणेशाच्या कृपेने आजचा दिवस आपणाला अनुकूल असेल. शरीर व मन स्वस्थ राहील. त्यामुळे कामात उत्साह वाटेल. आज आपणावर लक्ष्मीची कृपादृष्टी राहील.  आणखी वाचा.

वृषभ - श्रीगणेश आज आपणाला सावध राहण्याचा सल्ला देत आहेत. आज घडणार्‍या घटनांमुळे आपण काळजीत पडाल. श्रीगणेशाच्या मते आपले स्वास्थ्य बिघडेल. आणखी वाचा.

मिथुन - श्रीगणेशाच्या मते आजचा दिवस आपणाला लाभदायक आहे. अविवाहितांना योग्य जोडीदार मिळेल. धनप्राप्तिच्या दृष्टिने योग्य दिवस. मित्राची अचानक झालेली भेट आनंददायी ठरेल.  आणखी वाचा.

कर्क - आजचा दिवस आपल्यासाठी अनुकूल आहे असे श्रीगणेशांना वाटते. प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल. नोकरीत वरिष्ठ खुश राहतील. बढतीचे योग.  आणखी वाचा.

सिंह - मध्यम फल देणारा दिवस. पूर्वनियोजित कामासाठी आपले प्रयत्न चालू राहतील. व्यवहार न्यायपूर्ण असेल. आज धार्मिक तसेच मंगल कार्यात तुम्ही मग्न रहाल असे श्रीगणेश पाहताहेत. आणखी वाचा.

कन्या - नवीन कामाचा शुभारंभ करण्यास दिवस उत्तम असल्याचे श्रीगणेश सांगतात. प्रकृतीची काळजी घ्या. बाहेरचे खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा. आणखी वाचा.

तूळ - श्रीगणेश सांगतात की आपला आजचा दिवस आनंदात जाईल. प्रियकरासोबत प्रेमालाप होईल. मित्रासोबत प्रवासातून आनंद मिळेल. आणखी वाचा.

वृश्चिक - घरातील वातावरण आनंदी राहील. आरोग्य चांगले राहील. योग्य गोष्टींसाठी पैसा खर्च होईल. आजारी माणसांच्या आरोग्यात सुधारणा. शत्रूवर मात होईल. आणखी वाचा.

धनु - आज प्रवास न करण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. संततीचे आरोग्य आणि अभ्यास या विषयी चिंतेने मन व्याकूळ होईल. कामे अपूर्ण राहिल्याने निराश व्हाल. आणखी वाचा.

मकर - श्रीगणेश पाहताहेत की, आज आपली मनःस्थिती व आरोग्य काही चांगले असेल. कौटुंबिक कटकटीमुळे मन दुःखी होईल. उत्साह आणि आनंद यांचा अभाव राहील. आणखी वाचा.

कुंभ - आज आपणास मनाने हल्के हल्के वाटेल. चिंता नाहीशी होऊन उत्साह वाढेल. घरात भावंडांबरोबर काही आयोजन कराल.  आणखी वाचा.

मीन - श्रीगणेश आज आपल्याला खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला देत आहेत. रागावर व वाणीवर ताबा ठेवा नाहीतर मन दुःखी होईल. आणखी वाचा.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Today's horoscope - 11 August 2020; Will get beneficial news from wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.