Raigad Crime: तरुणीचा रक्ताच्या थारोळ्यात विवस्त्र अवस्थेत सापडला मृतदेह; लॉजमध्ये हत्या करून आरोपी फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 09:31 IST2026-04-21T09:28:42+5:302026-04-21T09:31:15+5:30

Maharashtra Crime: रायगड जिल्ह्यातील लोणेरे एका लॉजच्या खोलीत तरुणीचा नग्नावस्थेत मृतदेह आढळून आला. कर्मचाऱ्याने दरवाजा उघडल्यानंतर ही घटना समोर आली. 

Raigad Crime: Young woman's naked body found in a pool of blood; Accused absconds after murdering her in a lodge | Raigad Crime: तरुणीचा रक्ताच्या थारोळ्यात विवस्त्र अवस्थेत सापडला मृतदेह; लॉजमध्ये हत्या करून आरोपी फरार

Raigad Crime: तरुणीचा रक्ताच्या थारोळ्यात विवस्त्र अवस्थेत सापडला मृतदेह; लॉजमध्ये हत्या करून आरोपी फरार

सफाई करणाऱ्या कर्मचाऱ्याने खोलीचा दरवाजा उघडला, तेव्हा त्याला दरदरून घाम फुटला. खोलीमध्ये एका तरुणीचा नग्नावस्थेत असलेला मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. ही घटना समोर आल्यानंतर माणगाव तालुक्यात खळबळ उडाली. लोणेरे येथील ओमकार लॉजमध्ये ही घटना घडली असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे. 

मुंबई-गोवा महामार्गावर लोणेरे येथे ओमकार लॉज आहे. एक तरुण आणि तरुणी येथे आले होते. त्यांनी रुम भाड्याने घेतली. सोमवारी दुपारी तरुणी अचानक निघून गेला. त्यानंतर सफाई कर्मचारी खोली साफ करण्यासाठी गेला होता. त्याने खोली उघडल्यानंतर ही घटना समोर आली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणीचा मृतदेह रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आला. तिच्यासोबत असलेल्या तरुणाने हत्या केली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून, गुन्ह्याचा तपास सुरू केला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, हत्या करण्यात आलेली तरुणी ही माणगाव तालुक्यातील वडगाव येथील आहे. तिचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. त्याच्यासोबतच ती या लॉजमध्ये आली होती. दोघेही लॉजमध्ये राहिले. मात्र, घटना उघडीस येण्यापूर्वीच तरुण फरार झाला. दोघांमध्ये काय घडले आणि तो तरुण कोण आहे? याचा तपास पोलीस करत आहेत. 

Web Title : रायगढ़ अपराध: लॉज में युवती की हत्या; आरोपी फरार।

Web Summary : रायगढ़ के एक लॉज में एक युवती नग्न अवस्था में खून से लथपथ मृत पाई गई। पुलिस को संदेह है कि उसकी हत्या उसके साथ आए एक आदमी ने की थी। जांच जारी है।

Web Title : Raigad Crime: Young woman found murdered in lodge; suspect flees.

Web Summary : A young woman was found dead, unclothed and in a pool of blood, at a lodge in Raigad. Police suspect she was murdered by a man who accompanied her. The investigation is underway.