धडधड वाढली, युद्ध पुन्हा पेटणार? नेतन्याहू म्हणाले, "इराणमधील आमचे मिशन अजून बाकी आहे"; ट्रम्प यांचीही धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 08:48 IST2026-04-21T08:46:41+5:302026-04-21T08:48:28+5:30

Iran-US war 2026: २२ एप्रिल रोजी इराण आणि अमेरिका यांच्यातील शस्त्रसंधीचा संपुष्टात येणार आहे. त्यामुळे दोन्ही देशातील चर्चा होणार की नाही, याकडे जगाचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे इस्रायलच्या तोंडी अजूनही युद्धाचीच भाषा आहे. 

Tensions have increased, will iran us war flare up again? Netanyahu said, "Our mission in Iran is still pending"; Trump also threatened | धडधड वाढली, युद्ध पुन्हा पेटणार? नेतन्याहू म्हणाले, "इराणमधील आमचे मिशन अजून बाकी आहे"; ट्रम्प यांचीही धमकी

धडधड वाढली, युद्ध पुन्हा पेटणार? नेतन्याहू म्हणाले, "इराणमधील आमचे मिशन अजून बाकी आहे"; ट्रम्प यांचीही धमकी

Iran-US war Latest Update: पश्चिम आशियामध्ये पुन्हा युद्धाचा भडका उडणार की, शांततेवर शिक्कामोर्तब होणार, याकडे सगळ्यांचे लक्ष असतानाच इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी युद्धाची भाषा केली आहे. इराण-अमेरिका यांच्यातील शस्त्रसंधी २२ एप्रिल रोजी संपुष्टात येत आहे. त्यामुळे पुढील २४ तास पश्चिम आशियासाठी महत्त्वाचे असतानाच ट्रम्प आणि नेतन्याहू शांतता करार न झाल्यास हल्ल्याचे संकेत देऊ लागले आहेत. 

इराण आणि अमेरिका यांच्यात चर्चेची दुसरी फेरी सुरू होणार आहे. पाकिस्तानात होणाऱ्या चर्चेत इराणने आधी सहभागी होणार नसल्याचे म्हटले होते. पण, आता चर्चेसाठी पुढे येऊ असे म्हटले आहे. दुसरीकडे ट्रम्प यांच्याकडून दबाव टाकला जात असल्याचे दिसत आहे. 

इराणमधील आमची मोहीम अजून बाकी

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी इराण-अमेरिकेत चर्चा सुरू होण्यापूर्वीच एक महत्त्वाचे विधान केले आहे. ते म्हणाले की, "इराणविरोधातील इस्रायलचे ऑपरेशन अजूनही संपलेले नाही. इराणमध्ये आमचे काम अजून बाकी आहे."

एकीकडे शांततेच्या चर्चेकडे लक्ष असतानाच नेतन्याहूंनी केलेल्या विधानाने वेगळेच संकेत दिले आहेत. नेतन्याहू यांची भूमिका इराणविरोधात लष्करी कारवाई करण्याचीच असल्याचा अर्थ यातून काढला जात आहे. 

डोनाल्ड ट्रम्प काय म्हणालेले?

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पश्चिम आशियातील संघर्षाबद्दल बोलताना म्हणालेले की, "इराणसोबतची शस्त्रसंधी बुधवारी सायंकाळी संपुष्टात येईल. जर त्यापूर्वी कोणताही तोडगा निघाला नाही, करार होऊ शकला नाही; तर शस्त्रसंधी आणखी वाढवण्याची शक्यता खूपच कमी आहे." ट्रम्प यांनी अप्रत्यक्षपणे पुन्हा युद्ध सुरु होण्याबद्दल विधान केले आहे. 

कोणत्या मुद्द्यावर अडली चर्चा?

अमेरिकेने इराणच्या बंदरांची नाकेबंदी केली आहे. त्यामुळे इराणमधून मालवाहू आणि तेल-गॅस जहाजांना बाहेर जाता येत नाहीये. त्याचबरोबर बाहेरच्या जहाजांना इराणमध्ये येणे कठीण झाले आहे. त्यामुळे अमेरिकेने आधी ही नाकेबंदी हटवावी अशी मागणी इराणची आहे. दुसरीकडे ट्रम्प नाकेबंदी हटवणार नाही, अशी भूमिका घेत आहे. 

Web Title : तनाव बढ़ा: क्या फिर होगा युद्ध? नेतन्याहू ने ईरान मिशन को अधूरा बताया, ट्रंप की धमकी

Web Summary : नेतन्याहू ने ईरान के खिलाफ कार्रवाई जारी रखने का संकेत दिया है क्योंकि अमेरिका-ईरान के बीच तनाव बढ़ गया है। हथियारों का सौदा खत्म होने के साथ, ट्रंप ने सुझाव दिया कि यदि कोई समझौता नहीं होता है तो संघर्ष फिर से शुरू हो सकता है। ईरान ने बंदरगाह नाकाबंदी हटाने की मांग की, लेकिन अमेरिका ने इनकार कर दिया।

Web Title : Tensions rise: War again? Netanyahu warns Iran mission incomplete; Trump threatens.

Web Summary : Netanyahu hints at continued action against Iran as US-Iran tensions escalate. With the arms deal expiring, Trump suggests conflict could resume if no agreement is reached. Iran demands lifting of port blockade, but the US refuses.