IPL 2026: अवघ्या ३० रूपयांनी बदललं Ashwani Kumarचं नशीब; ४ बळी घेत Mumbai Indiansला जिंकवलं!

Ashwani Kumar Success Story Mumbai Indians IPL 2026: मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सचा ९९ धावांनी धुव्वा उडवला.

अहमदाबादमध्ये मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सचा ९९ धावांनी धुव्वा उडवला. अवघ्या ४५ चेंडूंमध्ये नाबाद १०१ धावा करून तिलक वर्मा या विजयाचा शिल्पकार ठरला.

तिलक वर्माने तुफान फटकेबाजी करून मुंबईच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. पण त्याचसोबत डावखुरा वेगवान गोलंदाज अश्वनी कुमारनेही संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.

अश्वनीने ४ षटकांत २४ धावांमध्ये ४ बळी घेतले. शुभमन गिल, शाहरुख खान, राहुल तेवतिया आणि रशीद खान यांच्या विकेट्स घेत त्याने संपूर्ण सामन्याचे चित्र पालटून टाकले.

अश्वनी कुमारने यंदाच्या हंगामातील त्याच्या पहिल्याच सामन्यात धमाका केला. त्याच्या या यशामागे ३० रुपयांची एक प्रेरणादायी कथा आहे. नेमका काय आहे तो प्रवास, जाणून घेऊया.

अश्वनी कुमार पंजाबचा असून त्याने मोहालीच्या पीसीए स्टेडियममध्ये वेगवान गोलंदाजीचे प्रशिक्षण घेतले. सरावासाठी अश्वनी कुमार तब्बल ११ किलोमीटर सायकल चालवत असे.

वेगवान गोलंदाजीचे प्रशिक्षण घेताना दूरवर सायकल चालवत जाणे आणि क्रिकेट सराव दोन्ही जमणे शक्य होत नव्हते. अशावेळी तो दिवसाला ३० रुपयांच्या शेअर ऑटोरिक्षाने मैदान गाठत असे.

याच ३० रुपयांच्या जोरावर अश्वनीने IPLमध्ये आपले स्थान निर्माण केले. क्रिकेटसाठी त्याने शिक्षण सोडले.१२वी पर्यंत शिकून झाल्यानंतर त्याने आपले संपूर्ण लक्ष क्रिकेटवरच केंद्रित केले.