शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
2
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
3
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
4
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
5
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
6
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
7
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
8
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
9
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
10
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
11
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
12
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
13
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
14
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
15
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
16
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
17
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
18
WTC 2025-27 Points Table : बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय! टीम इंडिया फायद्यात; ते कसं?
19
सावधान! ९९% लोकांना टरबूज खाण्याची योग्य पद्धतच माहीत नाही; डॉक्टरांनी सांगितलेल्या 'या' ३ चुका पडू शकतात महागात
20
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
Daily Top 2Weekly Top 5

नवघर गाव ते मर्क्स कंपनी रस्त्याचे काम निकृष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 23:11 IST

कारवाईची मागणी; सिडको कार्यालयावर फेर मोर्चा काढण्याचा इशारा

उरण : ग्रामस्थांच्या मोर्चानंतर सिडकोने नवघर गाव ते मर्क्स कंपनी दरम्यानच्या सुरू करण्यात आलेल्या रस्ता दुरुस्तीचे काम ठेके दाराकडूून अत्यंत निकृष्ट दर्जाचे केले जात आहे. त्यामुळे अशा ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून त्याला पाठीशी घालणाऱ्या सिडकोच्या अधिकाऱ्यांवर सात दिवसांत कारवाई करण्यात यावी, अन्यथा सिडको कार्यालयावर फेर मोर्चा काढण्याचा इशारा पागोटे ग्रामपंचायतीचे सरपंच भार्गव पाटील यांनी लेखी पत्राद्वारे दिला आहे.

सिडकोच्या अखत्यारित असलेल्या नवघर गाव ते मर्क्स कंपनी दरम्यानच्या रस्त्याची पार चाळण झाली आहे. दुरुस्तीअभावी रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे धुळीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे अपघाताच्या प्रमाणातही भरमसाठ वाढ झाली आहे. त्यामुळे धोकादायक ठरत चाललेल्या या रस्त्यावरून कामगार, वाहनचालक यांना जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागत आहे. नवघर गाव ते मर्क्स कंपनी दरम्यानचा नादुरुस्त झालेला रस्ता तत्काळ दुरुस्त करण्याची मागणी पागोटे ग्रामपंचायतीनेसिडकोकडे सातत्याने केली होती. मात्र, ग्रामपंचायतीच्या मागणीला सिडकोच्या अधिकाºयांनी केराची टोपली दाखवली आहे. त्यामुळे नवघर गाव ते मर्क्स कंपनी दरम्यानचा नादुरुस्त झालेला रस्ता तत्काळ दुरुस्त करण्याच्या मागणीसाठी पागोटे ग्रामपंचायतीचे सरपंच भार्गव पाटील यांच्या नेतृत्वाखाली संतप्त ग्रामस्थांनी उरण येथील सिडकोच्या कार्यालयावर २० फेब्रुवारी रोजी मोर्चा काढून निषेध व्यक्त केला होता.

ग्रामस्थांच्या मोर्चानंतर सिडकोने नवघर गाव ते मर्क्स कंपनी दरम्यानचा रस्ता १५ दिवसांत दुरुस्त करून देण्याचे आश्वासन सिडकोचे कार्यकारी अभियंता बी. बी. साळवे यांनी दिले होते. त्या आश्वासनानुसार रस्ता दुरुस्तीचे कामही सुरू करण्यात आले आहे. मात्र, ठेके दाराकडूूून रस्ता दुरुस्तीचे करण्यात येत असलेले काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे केले जात आहे.

जनतेचा पैसा निकृष्ट दर्जाचे काम करून वाया घालविणाºया अशा ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून आणि त्याला पाठीशी घालणाºया सिडकोच्या अधिकाºयांवर सात दिवसांत कारवाई करण्यात यावी, अन्यथा सिडको कार्यालयावर फेर मोर्चा काढण्याचा इशारा पागोटे ग्रामपंचायतीचे सरपंच भार्गव पाटील यांनी लेखी पत्राद्वारे दिला आहे.