'तुला लवकरच चित्रपटात काम देणार', तरुणीला आमिष दाखवून केला अत्याचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2026 12:08 IST2026-04-20T12:08:26+5:302026-04-20T12:08:41+5:30
आमिष दाखवल्यानंतर दोघांमध्ये प्रेम प्रकरणातून शरीरसंबंध झाले, त्यानंतर पीडितेला चित्रपटात काम न देता तिची फसवणूक केली

'तुला लवकरच चित्रपटात काम देणार', तरुणीला आमिष दाखवून केला अत्याचार
पुणे : लवकरच चित्रपटात काम देतो, असे आमिष दाखवत एकाने २४ वर्षीय तरुणीवर बलात्कार केला. तसेच पीडितेची छायाचित्रे, व्हिडीओ व्हॉट्सॲपद्वारे व्हायरल केले. याप्रकरणी पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून नऱ्हे पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिजीत गाडे (वय २७, रा. थेरगाव) असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर २०२४ ते १७ एप्रिल २०२६ या कालावधीत आरोपी गाडे याने पीडितेला मी तुला लवकरच चित्रपटात काम देणार आहे, असे आमिष दाखविले. त्यानंतर प्रेम प्रकरणातून दोघांमध्ये शरीरसंबंध झाले. त्यानंतर पीडितेला चित्रपटात काम न देता तिची फसवणूक केली. या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक आसाराम शेटे करीत आहेत.