शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
2
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
4
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
5
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
6
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
7
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
8
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
9
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
10
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
11
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
12
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
13
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
14
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
15
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
16
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
17
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
18
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
19
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
20
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक महिला दिन विशेष : ‘ कांदा, मुळा भाजी, अवघी विठाई माझी’; येरवडा महिला मध्यवर्ती कारागृहाचा राज्यात ठसा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2020 07:00 IST

शेती उत्पादनात येरवडा महिला मध्यवर्ती कारागृह राज्यात अव्वल

ठळक मुद्देएकूण 40 महिला बंदी करतात शेती31 लाख 38 हजारांची केली कमाई

युगंधर ताजणे - पुणे : येरवडा मध्यवर्ती कारागृहातील बंदीवान महिलांनी पुरुष बंदीवानांपेक्षा वरचढ कामगिरी करून शेतीच्या उत्पादनात अव्वल कामगिरी बजावली आहे. या बंदीवान महिलांनीशेती उत्पादनातून येरवडा महिला मध्यवर्ती कारागृहाला ३१ लाख ३८ हजारांचे उत्पन्न मिळवून राज्यात वेगळा ठसा उमटविला आहे.  येरवडा महिला मध्यवर्ती कारागृहाचे शेतीकरिता १७ एकरांचे क्षेत्र आहे. पाण्यासाठी विहीर आहे. नियोजित बैठकीत ठरल्याप्रमाणे कुठल्या वेळी कोणते पीक घ्यायचे, त्यासाठी आवश्यक ती खते, बी-बियाणे यांची खरेदी करायची याचा निर्णय प्रशासकीय विभाग घेते. त्यानंतर त्या निर्णयाची अंमलबजावणी केली जाते. येरवडा तुरुंगाचे अधीक्षक यू. टी. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली रवींद्र दाभाडे हे कृषी पर्यवेक्षक, तर विजय वाघमोरे हे सहायक कृषी पर्यवेक्षक म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. येरवडा महिला कारागृहात एकूण २९५ महिला बंदी आहेत, २२ लहान मुलांचा समावेश आहे.  सध्या ४० महिला बंदी शेतकरी म्हणून काम करतात. त्यांचे अर्धकुशल, कुशल असे वर्गीकरण करण्यात आले असून खुरपणी, नांगरणी, फवारणी ही कामे अर्धकुशल महिलांकडे, तर रोपांची देखभाल, बी-पेरणी, कापणी, तोडणी यांसारखी कामे कुशल महिला बंद्यांना दिली गेली आहेत. येरवडा महिला तुरुंगाच्या अधीक्षक एस. एस. पवार म्हणाल्या, की २५ ते ५५ वयोगटांतील बंदी महिला शेती करतात. सतत चार भिंतींच्या आत असणाºया बंदी शेतात काम करण्यासाठी येतात तेव्हा त्यांना मनस्वी आनंद होतो. त्या मनापासून काम करतात. त्यांना याठिकाणी मोकळे वातावरण मिळते. शेतीचे काम केल्यास एका महिन्याला एका महिन्याची शिक्षा माफ असल्याने अनेक बंदी महिला त्याचा लाभ घेतात. बंदीवान महिला प्रामुख्याने भाजीपाला, कलिंगडासारखी हंगामी फळे पिकवतात. 

* बंदीवान महिला शेतकऱ्यांचे काम कौतुकास्पद आणि प्रेरणादायी म्हणावे लागेल. राज्यातील इतर मध्यवर्ती व खुल्या कारागृहाच्या तुलनेत येरवडा मध्यवर्ती कारागृह उत्पन्न, उत्पादन, सतत नवनवीन प्रयोग यात अग्रेसर आहे. याचे श्रेय त्या बंदीवान महिलांना द्यावे लागेल. आता शासनाकडून ग्रीन शेड नेटसाठी ४ लाख ९८ हजार रुपये मंजूर झाले असून, त्याचे काम लवकरच सुरू होणार आहे. कारागृहातून बाहेर पडल्यानंतर बंदी महिलांना त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी पाठबळ देण्याचे काम शेतीच्या निमित्ताने केले जाते. -  यु. टी. पवार ( अधीक्षक - येरवडा मध्यवर्ती कारागृह) 

-  अशी चालते बंदीवान महिलांची शेती- अर्धकुशल बंदी महिला शेतकऱ्यांना दिवसाला ५५, तर कुशल बंदी महिला शेतकऱ्यांना ६१ रुपयांचा रोज मिळतो. - सकाळी साडेआठ वाजता काम सुरु होते. दुपारी एक वाजता शेतातच महिलांना जेवण, त्यानंतर चार वाजेपर्यंत काम सुरू राहते. शासकीय सुट्यांनुसार कामाला सुटी असते. - साधारण तीन ते चार दिवसांकाठी ६०० ते ८०० किलो भाजीपाला दोन्ही तुरुंगाला पुरवला जातो. शेतीसाठी पाच बैल आहेत. - कारागृह परिसरात १४३ चिंचेची झाडे असून, त्यातून बंदीवान महिलांनी कारागृह प्रशासनाला ३ लाख १७ हजारांचे उत्पन्न मिळवून दिले आहे. 

टॅग्स :PuneपुणेjailतुरुंगWomenमहिलाFarmerशेतकरीagricultureशेतीyerwada jailयेरवडा जेल