शहरं
Join us  
Trending Stories
1
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
2
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
3
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
4
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
6
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
7
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
8
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
9
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
10
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
11
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
12
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
13
"इंधन दर १७ रुपयांनी वाढले तरच...!", ब्रोकरेज फर्मनं मांडलं थक्क करणारं गणित; पेट्रोल-डिझेल आणखी भडकणार?
14
"रेवंत रेड्डी बनणार तेलंगणाचे 'शुभेंदु अधिकारी'!" भाजप खासदाराची भविष्यवाणी, केला मोठा दावा; काँग्रेसचं टेन्शन वाढणार 
15
मोहम्मद शमीचं आंतरराष्ट्रीय करिअर संपलं? "आम्ही त्याचा विचारच केला नाही..." आगरकर नेमकं काय म्हणाले?
16
मॅरिड बॉयफ्रेंडसाठी सेल्स गर्लने १.६६ कोटींच्या दागिन्यांवर डल्ला मारला, पण आंघोळीला गेली अन् घात झाला
17
Sanjay Raut: "लोक भाजपला मतदान करून आपल्या कर्माची फळं भोगतायत!" संजय राऊत असं का म्हणाले?
18
टीम इंडियाची घोषणा; गिलच्या कॅप्टन्सीत श्रेयस अय्यर वनडेत डेप्युटी! KL राहुल कसोटी संघाचा उपकर्णधार
19
उमर खालिदला दिलासा नाहीच, जामीन याचिका फेटाळली; दिल्ली कोर्टाने फटकारले, नेमके काय घडले?
20
बारसू, पूर्णगड, सिंधुदुर्गात अणुऊर्जा प्रकल्प होणार; CM फडणवीसांच्या उपस्थितीत सामंजस्य करार
Daily Top 2Weekly Top 5

Pune Water Cut: पुण्यातील 'या' भागात ८ ते १० दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 09:56 IST

Water Cut in Pune: पुणे महापालिकेच्या चिखली येथील जलशुद्धीकरण केंद्रास पाणीपुरवठा करणाऱ्या ७०० मि. मी. व्यासाच्या मुख्य जलवाहिनीला रावेत येथील नाल्यामध्ये मोठी गळती आढळून आली आहे

पुणे : पवना बंधाऱ्यातून पुणे महापालिकेच्या चिखली येथील जलशुद्धीकरण केंद्रास पाणीपुरवठा करणाऱ्या ७०० मि. मी. व्यासाच्या मुख्य जलवाहिनीला रावेत येथील नाल्यामध्ये मोठी गळती आढळून आली आहे. ही गळती दुरुस्त करण्यासठी चिखली येथील जलकेंद्रातून पाणीपुरवठा होणाऱ्या बंडगार्डन पाणीपुरवठा विभागातील कळस, विश्रांतवाडी, विमाननगर या भागांस आठ ते दहा दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

पुणे महापालिकेने चिखली येथे जलशुद्धीकरण केंद्र उभारले आहे. या जलकेंद्राला पवना बंधाऱ्यातून ७०० मि. मी. व्यासाच्या जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा करतात. मुख्य जलवाहिनीला रावेत येथील नाल्यामध्ये मोठी गळती आढळून आली आहे. महापालिकेने ही गळती दुरुस्तीचे काम हाती घेतले होते. मात्र, या ठिकाण दलदलीचे असून जलवाहिनीवर विद्युत केबल्स, इंटरनेट केबल्स, ड्रेनेज लाईन, पावसाळी लाईन इत्यादी सेवा वाहिनीचे जाळे असल्याने गळती बंद करणे शक्य झाले नाही. त्यामुळे ही जलवाहिनी दुरुस्त करण्याऐवजी त्याठिकाणी नवीन पर्यायी जलवाहिनी टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार काम सुरू करण्यात आले आहे. हे काम पूर्ण करण्यास अंदाजे आठ ते दहा दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे ही लाईन बंद करण्यात आली आहे.
या लाईनवरून पाणीपुरवठा होणाऱ्या कळस माळवाडी, जाधववस्ती, गणेशनगर (बोपखेल), विश्रांतवाडी अंशतः, म्हस्के वस्ती, संजय पार्क, वर्माशेल, विमानतळ व सभोवतालच्या परिसराला पर्यायी पाण्याच्या लाईनमधून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे पुढील आठ ते दहा दिवस या भागाला कमी दाबाने व अनियमित पाणीपुरवठा होणार असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे.

बालभारतीजवळ जलवाहिनी फुटलेली नाही

सेनापती बापट रस्त्यावरील बालभारती जवळ जलवाहिनी फुटून पाणी वाया जात असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. याबाबत पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंते नंदकिशोर जगताप यांनी स्पष्टीकरण दिले आहे. फर्ग्युसन टेकडी येथे नवीन पाण्याची टाकी उभी केली आहे. या पाण्याच्या टाकीला एसएनडीटी जलकेंद्रातून चतु:श्रुंगीला पाणीपुरवठा करणाऱ्या १२०० मि. मी. व्यासाच्या मुख्य जलवाहिनीतून पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्यासाठी बालभारती येथे जलवाहिनी जोडली जाणार आहे. या कामासाठी वेल्डिंग काम करावे लागणार आहे, त्यामुळे मुख्य जलवाहिनी मोकळी करण्यात आली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune Faces Water Supply Disruptions Due to Pipeline Leak

Web Summary : Pune's water supply will be disrupted for 8-10 days due to a major pipeline leak near Ravet. Areas like Kalas, Vishrantwadi, and Viman Nagar will experience low-pressure water supply as repairs are underway. Alternative lines are being used, but residents should expect irregularities. No leak near Balbharati, it's pipeline work.
टॅग्स :water shortageपाणी कपातWaterपाणीPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाFamilyपरिवारHomeसुंदर गृहनियोजन