शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून एकावर गोळीबार, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
2
Top Marathi News LIVE Updates: १५ लाखांपेक्षा जास्त मेडिकल दुकानांना कुलूप! औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप 
3
ट्विशा शर्माचा कॉल कट होण्यापूर्वी आईने ऐकलेला आवाज; गच्चीवर तासाभरात नेमकं काय घडलं?
4
"खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलू नका, फक्त क्रिकेटवर लक्ष द्या" रियान पराग समालोचकांवर भडकला!
5
दुचाकीच्या धडकेनंतर लक्झरी बसने घेतला पेट, बाळापूर शेगाव मार्गावरील घटना
6
Twisha Sharma : "३० लोक बोलावून मारहाण करीन"; आता ट्विशा शर्माच्या वहिनीने उघड केला सासरच्यांचा क्रूर चेहरा
7
नवी मुंबई हादरली! घणसोलीत रिक्षाचालकांच्या हाणामारीत मध्यस्थी करणाऱ्या तरुणाची हत्या; दोन आरोपींना अटक
8
सांगा..मुंबई कशी तुंबणार नाही! नालेसफाईवेळी नाल्यात सापडला चक्क रिक्षाचा सांगाडा अन् भलीमोठी लोखंडी कचरापेटी
9
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
10
मनोज जरांगेंकडून प्रसाद लाड यांना चर्चेचं निमंत्रण; गावागावांतील बैठका २३ तारखेपर्यंत स्थगित, दिला 'हा' इशारा
11
हा निव्वळ भास नाही! तुमच्यातल्या 'सिक्स सेन्स'ची जागृती दर्शवणारे 'हे' १० बदल अनुभवलेत का?
12
ऑनलाइन कंपन्यांविरोधात औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप! १५ लाखांहून अधिक मेडिकल दुकाने बंद
13
Giorgia Meloni: बारटेंडर ते देशाच्या पंतप्रधान; जाणून घ्या इटलीच्या PM जॉर्जिया मेलोनी यांची न ऐकलेली कहाणी
14
Twisha Sharma : 'लिगेचर रिपोर्ट' समोर आल्याने मृत्यूचे कारण स्पष्ट; पण संशयाची सुई अजूनही सासरच्यांवर!
15
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
16
'Welcome to Rome, my friend' म्हणत पंतप्रधान मेलोनींनी केले स्वागत, PM मोदींनीही शेअर केले रोममधील भेटीचे फोटो
17
"...तर मीदेखील मेलो असतो", 'नटसम्राट'बद्दल नाना पाटेकरांनी केलेल्या वक्तव्याने उंचावल्या भुवया, म्हणाले...
18
नीट पेपरफुटीचा भांडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
19
गोव्यात कमी किमतीत पेट्रोल विसरा, दराने ओलांडली शंभरी; डिझेल ९० पैशांनी महाग, ताजे रेट पाहा
20
गश्मीर महाजनी 'देऊळ बंद २'मध्ये दिसणार? मोहन जोशींना म्हणाला, "स्वामींनी आदेश दिलाय तर..."
Daily Top 2Weekly Top 5

Pune Water Supply: 'पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद करणार, जलसंपदा विभागाचा महापालिकेला इशारा'; सुप्रिया सुळेंचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 16:00 IST

पुणे महापालिकेकडून मर्यादेपेक्षा जास्त पाण्याचा वापर झाल्याने जलसंपदा विभागाने महापालिकेला दंड ठोठावला आहे. हे समस्या गंभीर होण्याची शक्यता असून, खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मार्ग काढण्यासंदर्भात पत्र पाठवले आहे. 

Pune Water Supply News: पुणे शहराच्या पाण्यावरून आणि पाणी बिलाच्या थकबाकीवरून महापालिका आणि जलसंपदा विभाग यांच्यामध्ये जुंपली आहे. हे प्रकरण वाढत असतानाच खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालून तोडगा काढवा, अशी मागणी केली आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. शासनाच्या दोन विभागांमध्ये अशा प्रकारे वाद निर्माण होणे योग्य नाही, त्यामुळे याबाबत आपण मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार असल्याचेही त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले होते. 

'पाणी पुरवठा बंद करण्याचा इशारा'

सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे की, "पुणे शहराला खडकवासला धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो. जलसंपदा विभागाने यावर्षी मंजूर केलेल्या मर्यादेपेक्षा जास्त पाणी महापालिकेने वापरले आहे. त्यामुळे तरतूदीनुसार महापालिकेला जलसंपदा विभागाने दंड आकारला आहे."

"त्यानुसार महापालिकेने थकबाकी न भरल्यास शहराचा पाणीपुरवठा खंडीत करण्याचा इशारा जलसंपदा विभागाने दिलेला आहे. नागरीकांना पाणीपुरवठा कमी झाल्याने अडचणींना सामोरे जावे लागू शकते. उन्हाळ्यात ही समस्या अधिक गंभीर होण्याची चिन्हे आहेत", अशी चिंता सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे.  

सुप्रिया सुळे यांनी मनपा आयुक्तांची घेतली भेट

बारामती लोकसभा मतदारसंघातील आणि पुणे महापालिकेच्या हद्दीत असलेल्या भागातील विविध नागरी प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सुप्रिया सुळे यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेतली. महापालिका अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी पाण्यावरून निर्माण झालेल्या महापालिका व जलसंपदा विभागातील वादावर मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालण्याची मागणी केली. 

सुप्रिया सुळे म्हणाल्या, "बारामती मतदारसंघात येणाऱ्या शहरातील विविध भागांमध्ये पाणी, कचरा, वाहतूक कोंडी आणि प्रदूषणाची समस्या सातत्याने वाढत आहेत. या समस्या सोडविण्यासाठी दर दोन महिन्यांनी मी महापालिकेकडे पाठपुरावा करते. त्यानुसार आजही महापालिका अधिकाऱ्यांशी हे प्रश्न सोडविण्यासाठी चर्चा केली आहे."

"समाविष्ट गावातील मिळकत कराच्या संदर्भात आम्ही आंदोलन केले, त्यामुळे कराच्या वसुलीसाठी स्थगिती देण्यात आली आहे. हा प्रश्न राज्य सरकारने सोडविणे गरजेचे आहे. वडगाव येथे विकास दांगट यांच्या प्रयत्नातून एक शाळा आणि नाट्यगृहाचे काम दहा वर्षांपूर्वी सुरू झाले. मात्र, हे काम अजूनही पूर्ण झाले नाही. प्रकल्प पूर्ण होण्यास वेळ लागला तर त्या प्रकल्पाची किंमत आणि खर्चही वाढतो. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी लक्ष घालून हे प्रकल्प पूर्ण करावेत", अशी मागणीही त्यांनी केली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune Water Supply Threatened; Water Resources Dept Warns; Sule Writes CM

Web Summary : Pune faces water supply disruption due to unpaid bills. The Water Resources Department has warned the Municipal Corporation. Supriya Sule urges CM intervention to resolve the dispute and prevent water shortages.
टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाwater shortageपाणी कपातDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPuneपुणेWaterपाणी