शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

पुणे शहराचा पाणीपुरवठा संचारबंदीतही सुरू आहे सुरळीत; जोखीम पत्करत २४ तास काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2020 07:00 IST

मध्यरात्रीपासून ते दिवसभरातील दिलेल्या कोणत्याही वेळेत जाऊन व्हाल्व सोडण्याबरोबरच एखादी पाईपलाईन फुटली तर तिथे तत्काळ हजर होऊन युद्धपातळीवर काम...

ठळक मुद्देपाणी सोडण्याबरोबरच दुरूस्तीची कामेही सुरूचविद्यूत विभागापासून ते केंद्रातील वॉटरबेड स्वच्छ करण्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी कर्मचारी हजर सुरूवातीला व्हॉल्वमनला त्याच्या कामाच्या जागेपर्यंत पोहचण्यात संचारबंदीमुळे अडचणी

राजू इनामदार- पुणे: एरवी उन्हाळ्यात कायम टिकेच्या टोकावर असलेला शहराचा पाणी पुरवठा कोरोना विषाणूच्या संचारबंदी काळात मात्र सुरळीत सुरू आहे. मागील वीस दिवसात एकदाही पाण्याची समस्या निर्माण न होण्यामागे महापालिकेच्या या विभागातील कर्मचाऱ्यांचे दिवसरात्रीचे श्रम आहेत. मध्यरात्रीपासून ते दिवसभरातील दिलेल्या कोणत्याही वेळेत जाऊन व्हाल्व सोडण्याबरोबरच एखादी पाईपलाईन फुटली तर तिथे तत्काळ हजर होऊन युद्धपातळीवर काम करून घेण्यापर्यंत अनेक कामे या विभागात नेहमी सुरू असतातच, पण आता संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर ती अधिक काटेकोरपणे सुरू आहेत.शहरात १ हजार ८०० किलोमीटरच्या वितरिका (जलवाहिन्या) आहेत. जलशुद्धीकरण केंद्र १० आहेत. त्याच्या दुप्पट पंपीग स्टेशन्स आहेत. २०० पेक्षा अधिक लोक दिवसरात्र काम करत आहेत. शहराच्या ५० लाख लोकसंख्येला रोजच्यारोज व्यवस्थित पाणी पुरवठा करणे त्यामुळेच शक्य होत आहे.  पर्वती जलशुद्धीकरण केंद्रातील अधीक्षक अभियंता प्रमोद उंडे म्हणाले, ही सगळीच यंत्रणा २४ तास सुरू असते. ती एखादा मिनीटही बंद पडली तरीही पाणी पुरवठा विस्कळीत होते. त्यामुळे विद्यूत विभागापासून ते केंद्रातील वॉटरबेड स्वच्छ करण्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी कर्मचारी हजर लागतातच.शहराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये पाण्याचे व्हॉल्व सोडण्यासाठी काही कर्मचारी आहेत. त्यांना सगळे वेळापत्रक पाळावेच लागते.या विभागाचे कार्यकारी अभियंता आशिष जाधव व साहेबराव दांडगे यांनी सांगितले. सुरूवातीला व्हॉल्वमनला त्याच्या कामाच्या जागेपर्यंत पोहचण्यात संचारबंदीमुळे अडचणी आल्या. त्यामुळे सर्वांना अत्यावश्यक सेवेची ओळखपत्रे देण्यात आली. आता अडचण येत नाही. गळती किंवा पाईपलाईन फुटल्याच्या तक्रारीही येत असतात. लॉकडाऊन असले तरी ते काम करावेच लागते. अन्यथा त्या परिसराचा पाणी पुरवठा बंद होतो. शहरात दिवसाला किमान २ तरी अशा घटना घडतातच............

पाणी पुरवठा अत्यावश्यक सेवेत येतो. त्याची जाणीव ठेवूनच या विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी काम करत आहेत. लॉकडाऊनमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यात पाण्याची आणखी भर पडू नये याची काळजी आम्ही सगळेच मिळून घेत आहोत. त्यांच्या सहकायार्मुळेच आतापर्यंत एकदाही पाणी पुरवठ्यात कसला व्यत्यय आलेला नाही.- अनिरूद्ध पावसकर, मुख्य अभियंता, पाणी पुरवठा, महापालिका

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका