शहरं
Join us  
Trending Stories
1
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
2
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
3
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
4
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
5
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
6
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
7
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
8
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
9
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
10
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
11
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
12
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
13
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
14
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
15
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
16
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
17
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
18
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
19
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
20
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
Daily Top 2Weekly Top 5

वडगावशेरीचा पाणीटंचाई प्रश्न मार्गी लागणार, उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर भामा आसखेड प्रकल्पाच्या कामाला वेग

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2020 10:37 IST

गेल्या १० वर्षांपासून रखडलेले भामा आसखेड पाईपलाईनचे काम मार्गी लागणार

पुणे : गेल्या दहा वर्षांपासून रखडलेल्या भामा आसखेड पाणी पुरवठा प्रकल्पाचे काम राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून लवकरच पूर्ण होणार असून त्यामुळे वडगाव शेरी मतदार संघातील पाणी टंचाईचा प्रश्न मार्गी लागणार असल्याची माहिती आमदार सुनील टिंगरे यांनी दिली.  भामा आसखेड प्रकल्पाची आमदार सुनील टिंगरे यांनी महापालिका अधिकाऱ्यांसह पाहणी केली, यावेळी ते बोलत होते.  या  महत्वपूर्ण प्रकल्पांमधील जलशुद्धीकरण केंद्र(WTP), कुरुळी (BPT- ब्रेकिंग प्रेशर टँक) व भामा आसखेड धरणाच्या जॅकवेल पंप हाऊसची यावेळी पाहणी करण्यात आली. केळगाव येथील 1.1 किमी पाईपलाईनचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडले होते. या संदर्भात आमदार सुनील टिंगरे यांनी ही बाब उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निदर्शनास आणून देत, भामा आसखेड प्रकल्पाचे रखडलेले काम लवकरात लवकर मार्गी लावण्याची विनंती केली होती. राज्याचे उपमुख्यमंत्री पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या बैठकीत भामा आसखेड धरणाच्या कालव्यासाठी आरक्षित केलेल्या जमिनींच्या सातबारा उताऱ्यावरील शेरे काढण्याचे आदेश खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार सुनील टिंगरे,  आमदार दिलीप मोहिते यांच्या उपस्थितीत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले होते. त्याची तातडीने अंमलबजावणी करत केळगाव येथील 1.1 किलोमीटरचे रखडलेले काम त्वरित वेगाने सुरू करण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकल्पाच्या कामाची आमदार सुनील टिंगरे यांनी महापालिका व प्रकल्पाचे अधिकाऱ्यांसह पाहणी केली.  भामा-आसखेड प्रकल्पाचे काम लवकरात लवकर मार्गी लागणार असून त्यामुळे वडगावशेरी मतदार संघातील प्रलंबित पाणीटंचाईचा महत्वपूर्ण प्रश्न सुटण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मदत होणार असल्याची माहिती यावेळी आमदार सुनील टिंगरे यांनी दिली.

टॅग्स :Puneपुणेvadgaon-sheri-acवडगाव शेरीAjit Pawarअजित पवारPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाWaterपाणी