शहरं
Join us  
Trending Stories
1
“परिस्थिती बदलली नाही, तर दशकांच्या यश अन् मेहनतीवर पाणी फिरेल”; PM मोदींचे सूचक विधान
2
बँकॉकमध्ये मोठा अपघात! मालगाडीची बसला जोरदार धडक; आगीत ८ जणांचा मृत्यू, २० जखमी
3
Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन
4
“देशातील तरुणांचा मला अभिमान, माझ्या विधानाचा विपर्यास केला”; CJI सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण
5
NEET Exam Paper Leak: 'नीट’ पेपरफुटी प्रकरणात पुण्यातील प्राध्यापक मनीषा मांढरे अटकेत; सीबीआयकडून कारवाई
6
IPL फायनल दरम्यान PCB अध्यक्ष मोहसिन नक्वी भारतात येणार? जाणून घ्या ही चर्चा रंगण्यामागचं कारण
7
"तो युद्धविराम म्हणजे पाकिस्तानवर उपकार!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'त्या' विधानाने जागतिक राजकारणात खळबळ
8
Pakistan Petrol Diesel Price Cut: पाकिस्तानात पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त! एवढ्या रुपयांनी घटले दर; जाणून घ्या इंधनाचे नवे भाव
9
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
10
गजलक्ष्मी-गजकेसरी योगात अधिक मास २०२६: ९ राशींचे कल्याण-मंगल, पद-पैसा वाढ; महिनाभर अपार लाभ!
11
भयंकर! निळ्यानंतर आता 'हिरव्या ड्रम'ची दहशत; पतीसोबत मिळून पत्नीने केली प्रियकराची हत्या
12
NHAI मध्ये उपव्यवस्थापक पदांची भरती; १ लाख ७७ हजारांपर्यंत पगार; जाणून घ्या पात्रता
13
अरे देवा! साता जन्माची साथ १६ दिवसांत सुटली; नवरी ७२ हजार आणि सोन्याचे दागिने घेऊन पळाली
14
आवडीने खाल्ल्या जाणाऱ्या 'अरबी'ला इंग्रजीत काय म्हणतात? ९०% लोक देतात याचे चुकीचे उत्तर! तुम्हाला माहितीये?
15
हा ब्लश नाही, महिलांना होणारा गंभीर आजार आहे; लुपस विकार ज्याने गर्भपातही होऊ शकतो
16
बालेन शाह सरकारला नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाचा मोठा झटका! पंतप्रधानांनाचा 'तो' मनमानी निर्णय रद्द
17
अंदमानमध्ये फक्त ₹१, तर तेलंगणात ₹३५; पेट्रोल-डिझेलवर कोणत्या राज्यात किती कर लागतो? जाणून घ्या...
18
दरमहा २००० रुपयांच्या गुंतवणूकीवर रिटायरमेंटच्या वेळी मिळतील १.०८ कोटी; व्याजही फिक्स, कोणती आहे स्कीम?
19
बापरे! सुनेला सोन्याचे दागिने देण्यासाठी सासूने ओलांडली मर्यादा; घरमालकाच्या तिजोरीवर मारला डल्ला
20
कल्याणच्या वसार गावात कचरा गाडीच्या खाली सापडून २ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

उखडलेले डांबरीकरण, खचलेले रस्ते; पालखी महामार्ग पाहणी दरम्यान गडकरींनी केली अधिकाऱ्यांची कानउघाडणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2026 16:35 IST

निकृष्ट दर्जाचे काम आणि अपूर्ण कामे आढळल्याने गडकरींनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी करत ठेकेदारांचे बिल देण्याचे थांबवा, असा आदेशच दिला

पुणे : संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग धार्मिक आणि भावनिक आहे. देहू व पंढरपूर या दोन महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना जोडणारा संत तुकाराम महाराज पालखी मार्ग महत्त्वाचा आहे. राष्ट्रीय महामार्ग हा पाटस ते पंढरपूर असा १३० कि.मी. लांबीचा महामार्ग पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांना जोडतो. याचे ८० टक्के काम पूर्ण झाल्याने इतर उर्वरित कामे लवकरच करण्यात येतील, अशा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. निकृष्ट कामाचा दर्जा पाहून ठेकेदाराचे पैसे रोखा, असा आदेशही त्यांनी दिला.

संत ज्ञानेश्वर महाराज महामार्गाची गुरुवारी पाहणी केल्यानंतर गडकरी यांनी दुसऱ्या दिवशी संत तुकाराम महाराज पालखी मार्गातील इंदापूर ते वसुंदे या दरम्यान बसने पाहणी केली. यावेळी माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. या वेळी दौऱ्यात राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार राहुल कूल यांच्यासह प्रवीण माने आणि प्रदीप गारटकर उपस्थित होते.

पाटस ते बारामती, बारामती ते इंदापूर आणि इंदापूर ते तोंडले अशा ३ पॅकेजमध्ये या मार्गाचे काम करण्यात येत आहे. यापैकी पाटस ते बारामती हा भाग पूर्ण झाला असून, इंदापूर ते तोंडले भागाचे काम ९६ टक्के आणि बारामती ते इंदापूर भागाचे काम ८४ टक्के पूर्ण झाले आहे. उर्वरित काम प्रगतिपथावर असून लवकरच ते पूर्ण केले जाईल, अशी ग्वाही गडकरी यांनी दिली.

संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाची बसमधून बारकाईने पाहणी केली. यावेळी अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाचे काम, उखडलेले डांबरीकरण, खचलेले रस्ते आणि अपूर्ण कामे आढळल्याने त्यांनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी करत ठेकेदारांचे बिल देण्याचे थांबवा, असा आदेशच दिला.

पालखी मार्गावर ४० हजार वृक्षलागवड 

पुणे ते फलटण व पुणे बारामती पालखी मार्गावरील राष्ट्रीय मार्गावरील रस्त्याचे दुतर्फा देशी प्रजातीचे ४० हजार वृक्षलागवड करण्यात येणार आहे. यामध्ये कडुलिंब, वड, पिंपळ, शिसम, जांभूळ, बांबू या वृक्षांचा समावेश आहे. ज्यामुळे वारकऱ्यांसाठी सावलीची व्यवस्था तसेच पर्यावरण संवर्धन साधले जाईल, असे गडकरी म्हणाले. तसेच ४५० झाडांचे पुनर्रोपण केले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Gadkari Criticizes Officials Over Poor Work on Palkhi Highway

Web Summary : Nitin Gadkari inspected the Sant Tukaram Maharaj Palkhi highway, expressing dissatisfaction with the substandard work. He ordered officials to withhold payments to contractors due to poor construction quality, including damaged roads. He also announced 40,000 trees along the route.
टॅग्स :PuneपुणेNitin Gadkariनितीन गडकरीsant tukaram palkhiसंत तुकाराम पालखीsant dnyaneshwar palkhiसंत ज्ञानेश्वर पालखीhighwayमहामार्गCentral Governmentकेंद्र सरकारMONEYपैसाMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार