शहरं
Join us  
Trending Stories
1
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
2
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
3
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
4
Top Marathi News LIVE Updates: "दादांच्या अंत्यविधीच्या दिवशी १६ कोटी दिले"; रोहित पवारांचा 'व्हीएसआर' कंपनीवरून सरकारवर हल्ला
5
गोलsss... पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सिक्कीमच्या तरूणांसोबत खेळला फुटबॉल, PHOTOSची रंगली चर्चा
6
वाढदिवसासाठी Reel तयार करण्याच्या नादात युवकाने भलताच उद्योग केला; शेवटी हातात पडल्या बेड्या
7
Adhar Card : मोठा बदल! आता आधार कार्ड तुमचे वय सिद्ध करणार नाही, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'ही' कागदपत्रे दाखवावी लागणार
8
कलमा वाचता येतो का? विचारले अन् सुरक्षा रक्षकांवर चालवला चाकू; मीरा रोडच्या हल्ल्यात 'लोन वुल्फ'चा संशय
9
Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांची २०२६-२७ मध्ये मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी; भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं?
10
तुमच्या छोट्याशा बाल्कनीला, खिडकीला द्या 'ग्रीन टच'; कमी जागेत बाग फुलवण्याच्या 'मास्टर ट्रिक'
11
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
12
हृदयद्रावक! IPL सामना पाहून घरी परतणाऱ्या २ भावांवर काळाचा घाला; 'हिट अँड रन'मध्ये मृत्यू
13
Mutual Fund Redemption Rules: काय आहे FIFO नियम आणि तो कसा वाचवतो तुमचा टॅक्स? जाणून घ्या डिटेल्स
14
बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने झाला 'त्या' चार जणांचा मृत्यू? पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आलं खरं कारण
15
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
16
Chanakya Niti: समाजात राजासारखा मान हवा? चाणक्यनीतीतल्या 'या' ५ सवयी तुमचं आयुष्य बदलतील!
17
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
18
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
19
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
20
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील प्रसिद्ध ओशो आश्रमातील दोन भूखंड विक्रीला; भक्तांचा तीव्र संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 20:33 IST

पुण्यातल्या कोरेगाव पार्क येथे रजनीश उर्फ ओशो यांचा मोठा आश्रम आहे.

पुणे: पुण्यातील प्रसिद्ध ओशो आश्रमातील दोन भूखंड विक्रीला काढले असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. गेल्या काही वर्षांपासून आर्थिक अडचणी वाढलेले असल्यामुळे हा प्लॉट विकायचा निर्णय घेतला गेला आहे असा दावा ओशो आश्रमाच्या वतीने करण्यात येतो आहे. पण ओशो यांच्या भक्तगणांनी भक्तगणांनी या सगळ्या प्रकारावर संताप व्यक्त केलाय. 

पुण्यातल्या कोरेगाव पार्क येथे रजनीश उर्फ ओशो यांचा मोठा आश्रम आहे. झुरिच मधील ओशो इंटरनॅशनल फाऊंडेशन यांची मालकी असलेला हा आश्रम जगभरातल्या लोकांचे आकर्षणाचे केंद्र आहे. देश-विदेशातून अनेक लोक या ठिकाणी येत असतात. या केंद्रांमधील दोन मोठे भूखंड विक्रीसाठी काढण्यात आले आहेत. यासाठी परवानगी मिळावी म्हणून ऊन इंटरनॅशनल च्या वतीने धर्मादाय आयुक्त कार्यालयात अर्ज करण्यात आला आहे. एकूण दीड एकर प्रत्येकी असे हे दोन भूखंड असून ते रिकाम्या जागेत असल्याचे ओशो इंटरनॅशनल च्या प्रतिनिधींचे म्हणणे आहे. 

यासाठी तीन मोठ्या उद्योग दिन कडून बोली लावण्यात आली होती. प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि पंचशील रियालिटी चे संचालक अतुल चोर्दिया तसेच ए टू झेड ऑनलाइन सर्विसेस या सगळ्यांनी यासाठी बोली लावली होती. सर्वाधिक रक्कम ही या जागे शेजारी ज्यांचा बंगला आहे त्या राजीव बजाज यांनी लावली आहे. तब्बल एकशे सात कोटींना त्यांनी हे भूखंड विकत घेण्याची तयारी दाखवली आहे. धर्मादाय आयुक्तांकडून परवानगी मिळाल्यानंतर ही सगळी प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल.

........

...म्हणून भूखंड विकू नका; ओशोंच्या अनुयायांची आर्त हाकओशो आश्रमचे दोन भूखंड १०७ कोटी रुपयांत विकणार आहेत. मात्र, ही जागा ओशोच्या भक्तांची जागा आहे. ती जागा पूर्ण जगातून आलेल्या ओशो अनुयायांनी बनवली आहे. तसेच येथे ओशोची समाधी आहे. मात्र, कोविडमध्ये आश्रम बंद होते. त्यामुळे आश्रमचा आर्थिक खर्च उचलणे अवघड आहे. या कारणास्तव आम्ही ते विकत आहोत, असे ओशो ट्रस्टने सांगितले आहे. आश्रमकडे ६ कोटी रुपये अजून आहेत. मात्र ओशो आश्रम अडचणीत असेल तर तुम्ही  अनुयायांकडे या. ते नक्कीच आर्थिक मदत करण्यास तयार आहेत.  - योगेश ठक्कर, ओशो अनुयायी.  ....

................भूखंड विकणे हे पूर्ण षडयंत्र...

पुण्यातील ओशो आश्रमाचे भूखंड विकणे हे पूर्ण षडयंत्र आहे. मात्र, ओशोंच्या आश्रमाचे सर्व हक्क मुख्यालय स्विझर्लंड येथे दिले आहे. त्या ठिकाणच्या ट्रस्टचे नावही ओशो इंटरनॅशनल फाउंडेशन आहे. त्यांचे एका वर्षाचे आर्थिक उत्पन्न ४० ते ५० कोटी आहे, असे त्यांनी खूप वर्षांपूर्वी सांगितले होते. आता तर त्यात नक्कीच वाढ झाली असणार आहे. तेच भारतात आले तर भूखंड विकण्याची गरज भासणार नाही. आम्ही ओशोंच्या आश्रमाचे भूखंड अजिबात विकू देणार नाही. त्याविरुद्ध आम्ही न्यायालयात हक्क लढा देणार आहोत.- ओशो अनुयायी.   

टॅग्स :Puneपुणे