शहरं
Join us  
Trending Stories
1
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
2
Top Marathi News LIVE Updates: "दादांच्या अंत्यविधीच्या दिवशी १६ कोटी दिले"; रोहित पवारांचा 'व्हीएसआर' कंपनीवरून सरकारवर हल्ला
3
Mutual Fund Redemption Rules: काय आहे FIFO नियम आणि तो कसा वाचवतो तुमचा टॅक्स? जाणून घ्या डिटेल्स
4
बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने झाला 'त्या' चार जणांचा मृत्यू? पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आलं खरं कारण
5
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
6
Chanakya Niti: समाजात राजासारखा मान हवा? चाणक्यनीतीतल्या 'या' ५ सवयी तुमचं आयुष्य बदलतील!
7
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
8
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
9
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
10
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
11
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी
12
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
13
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
14
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
15
'सैराट'फेम अभिनेता 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार, रितेशसोबत फोटो पोस्ट करत म्हणाला...
16
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
17
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
18
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
19
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
20
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
Daily Top 2Weekly Top 5

स्वाइन फ्लूचा वाढला धोका

By admin | Updated: April 14, 2017 04:24 IST

ऐन उन्हाळ्यात स्वाइन फ्लूने डोके वर काढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. सध्या तापमानामध्ये सातत्याने चढ-उतार

पिंपरी : ऐन उन्हाळ्यात स्वाइन फ्लूने डोके वर काढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. सध्या तापमानामध्ये सातत्याने चढ-उतार होत असल्याने हे वातावरण स्वाइन फ्लूला अनुकूल ठरू शकते, असे वैद्यकीय तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात स्वाइन फ्लू वाढत आहे. केवळ हिवाळा आणि पावसाळ्यातच होतो, हा दावा यंदा फोल ठरला असून, ऐन उन्हाळ्यात या आजाराचे शेकडो रुग्ण आढळल्याने वैद्यकीय तज्ज्ञदेखील बुचकाळ्यात पडले आहेत. स्वाइन फ्लूच्या या प्रादुर्भावामागे तापमानामध्ये होणारा बदल असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. सध्या शहरातील तापमान ३६ ते ३८ अंशापर्यंत असते. मात्र, अचानक उष्णतेची लाट येऊन चार-पाच दिवसांसाठी पारा ४१ अंशापर्यंत चढतो. तसेच दिवसभरात सकाळ, दुपार आणि रात्रीच्या तापामानात असणारी मोठी तफावत स्वाइन फ्लूच्या विषाणूसाठी पोषक ठरत असल्याने हे विषाणू उन्हाळ्यातही टिकाव धरून आहेत. त्यामुळेच शहरात तीन महिन्यांमध्ये ११ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात बुधवारी ४१०९ रुग्णांची तपासणी केली असता ४२२ जणांना तापसदृश्य आजाराची लागण झाल्याचे दिसून आले. यापैकी ३७ जणांना टॅमी फ्लू देण्यात आल्या आहेत तर तीन जणांच्या घशातील द्रव तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. सात रुग्ण रुग्णालयात उपचार घेत असून त्यापैकी एका रुग्णावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.(प्रतिनिधी)दिवसभराच्या तापमानात मोठी तफावत असल्याने हे वातावरण विषाणूंसाठी पोषक ठरत आहे. मार्चमध्ये दुपारी कडक ऊन आणि रात्री थंडी असे वातावरण होते. या वातावरणामुळे विषाणूंचा जोर वाढला होता. मात्र, सध्या या विषाणूंचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. तरीही लोकांनी तापसदृश्य आजार जाणवू लागल्यास लगेच तपासणी करून घ्यावी.- डॉ. लक्ष्मण गोफणे, समन्वयक अधिकारी, स्वाइन फ्लू नियंत्रक कक्ष