एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार भविष्यात भाजपमधून लढण्याची शक्यता; रोहित पवार यांचा सूचक दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 13:39 IST2026-05-13T13:37:04+5:302026-05-13T13:39:17+5:30

खर तर भाजप प्रवेशाची ही प्रक्रिया २०२९ पूर्वी होणार होती, पण आता ती थोडी लवकर सुरू झाली आहे

Sunil Tatkare, Praful Patel will contest from BJP; 22 MLAs are also on the path of BJP, Rohit Pawar's revelation | एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार भविष्यात भाजपमधून लढण्याची शक्यता; रोहित पवार यांचा सूचक दावा

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार भविष्यात भाजपमधून लढण्याची शक्यता; रोहित पवार यांचा सूचक दावा

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी महायुतीतील राजकीय हालचालींबाबत मोठा दावा करत राज्याच्या राजकारणात नवा चर्चेचा विषय निर्माण केला आहे. रोहित पवार यांनी थेट नाव घेत सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे भविष्यात भाजपमधूनच निवडणूक लढवतील, असा खळबळजनक दावा केला. त्यांच्या या वक्तव्यानंतर महायुतीत नवा राजकीय भूकंप होण्याची चर्चा सुरू झाली आहे.

रोहित पवार म्हणाले, “काहीही झालं तरी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल भाजपमधूनच लढणार आहेत. त्यांच्यासोबत २२ आमदारांचंही ठरलेलं आहे. इतकंच नाही तर एकनाथ शिंदे गटातील काही आमदारांचंही जवळपास निश्चित झालं आहे. त्यामुळे आता मोघम बोलून चालणार नाही. जे आहे ते स्पष्ट आहे.”

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटातील काही आमदारही भविष्यात भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवू शकतात, असा सूचक दावा करत रोहित पवार यांनी महायुतीत मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता असल्याचं म्हटलं.

खर तर भाजप प्रवेशाची ही प्रक्रिया २०२९ पूर्वी होणार होती, पण आता ती थोडी लवकर सुरू झाली आहे. रोहित पवार यांनी पुढे बोलताना तटकरे यांच्यावर निशाणा साधला. “जर त्यांनी आता भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला, तर पुन्हा निवडणूक लागू शकते. आणि तटकरे यांच्या मतदारसंघात निवडणूक झाली, तर ते निवडून येणार नाहीत. शिंदे गटच त्यांना त्या ठिकाणी पाडेल,” असा दावा त्यांनी केला.

या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणात अनेक तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. विशेषतः अजित पवार गट, भाजप आणि शिंदे गटातील अंतर्गत समीकरणांवर आता चर्चा रंगू लागली आहे. रोहित पवार यांच्या दाव्यानंतर महायुतीतील नेते काय प्रतिक्रिया देतात, याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

Web Title : सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल बीजेपी से लड़ेंगे: रोहित पवार

Web Summary : रोहित पवार का दावा है कि सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल बीजेपी के टिकट पर चुनाव लड़ेंगे। एकनाथ शिंदे गुट के कुछ विधायकों सहित लगभग 22 विधायक भी बीजेपी में शामिल हो सकते हैं। यदि फिर से चुनाव होता है तो तटकरे को हार का सामना करना पड़ सकता है, क्योंकि शिंदे गुट उनका विरोध कर सकता है।

Web Title : Sunil Tatkare, Praful Patel to Fight from BJP: Rohit Pawar

Web Summary : Rohit Pawar claims Sunil Tatkare, Praful Patel will contest elections on BJP ticket. Around 22 MLAs, including some from Eknath Shinde's group, are also likely to join BJP. Tatkare may face defeat if re-election occurs, as Shinde faction could oppose him.