Tata Altroz CNG AMT: ट्रॅफिकच्या कटकटीतून सुटका, टाटा अल्ट्रोझ सीएनजी ऑटोमॅटिक भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 14:37 IST2026-05-13T14:36:46+5:302026-05-13T14:37:30+5:30
Tata Altroz CNG AMT Launched in India: टाटा मोटर्सने भारतीय बाजारपेठेत आपली लोकप्रिय प्रीमियम हॅचबॅक टाटा अल्ट्रोझचे सीएनजी ऑटोमॅटिक मॉडेल अधिकृतपणे लॉन्च केले.

Tata Altroz CNG AMT: ट्रॅफिकच्या कटकटीतून सुटका, टाटा अल्ट्रोझ सीएनजी ऑटोमॅटिक भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत!
टाटा मोटर्सने भारतीय बाजारपेठेत आपली लोकप्रिय प्रीमियम हॅचबॅक टाटा अल्ट्रोझचे सीएनजी ऑटोमॅटिक मॉडेल अधिकृतपणे लॉन्च केले. या कारची सुरुवातीची किंमत ८.७० लाख रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे. टाटा अल्ट्रोझ ही या सेगमेंटमधील पहिली कार ठरली आहे, ज्यामध्ये सीएनजी इंजिनसोबत ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा पर्याय देण्यात आला आहे. टाटाच्या टियागो, टिगोर आणि पंचमध्ये ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा पर्याय मिळतो.
टाटा अल्ट्रोझ इंजिन आणि कार्यक्षमतेबद्दल बोलायचे झाले तर, यात यात १.२ लीटर, ३-सिलेंडर रेवोट्रॉन पेट्रोल इंजिन मिळत आहे, जे ७२ पीएचपीची पॉवर आणि १०३ एनएमचा टॉर्क जनरेट करते. शिवाय या कारमध्ये ५-स्पीड एएमटी गिअरबॉक्सचा पर्याय मिळतो. अल्ट्रोझ सीएनजीमध्ये टाटाचे प्रसिद्ध ट्विन सिलेंडर टेक्नोलॉजी वापरण्यात आलीआहे. यामुळे सीएनजी असूनही ग्राहकांना २१० लीटरची मोठी डिकी मिळते, जी सामान्य सीएनजी कारच्या तुलनेत अधिक सोयीस्कर आहे.
टाटा अल्ट्रोझ सीएनजी ऑटोमॅटिक: किंमत (Tata Altroz CNG AMT Price)
टाटाने ही कार टाटा अल्ट्रोझ प्युअर, टाटा अल्ट्रोझ प्युअर एस, टाटा अल्ट्रोझ क्रेटिव्ह, टाटा अल्ट्रोज क्रेटिव्ह एस आणि टाटा अल्ट्रोझ अकांप्लिश्ड अशा एकूण ५ व्हेरिएंटमध्ये लॉन्च केली आहे. टाटा अल्ट्रोझ प्युअरची किंमत ८.७० लाख रुपये आहे. तर, टाटा अल्ट्रोझ प्युअर एसची किंमत ९ लाख रुपये आहे. तर, टाटा अल्ट्रोझ क्रेटिव्ह, टाटा अल्ट्रोज क्रेटिव्ह एस आणि टाटा अल्ट्रोझ अकांप्लिश्ड या कारची किंमत अनुक्रमे ९ लाख ५७ हजार रुपये, ९.८२ लाख रुपये आणि १० लाख ७७ हजार रुपये इतकी आहे.
टाटा अल्ट्रोझ सीएनजी ऑटोमॅटिक: आरामदायी फीचर्स
या कारमध्ये ग्राहकांना अनेक आकर्षित फिचर्स देण्यात आली आहेत. ही कार सीनजी मोडवर सुरू करता येऊ शकते. सुरक्षिततेसाठी यात सिंगल ईसीयू आणि थर्मल प्रोटेक्शन देण्यात आले आहे. सीएनजी व्यतिरिक्त, अल्ट्रोझ पेट्रोल (मॅन्युअल आणि डीसीए) आणि डिझेल इंजिन पर्यायांमध्येही उपलब्ध आहे. ज्यांना शहरात चालवण्यासाठी आरामदायी आणि इंधन बचतीसाठी सीएनजी कार हवी आहे, त्यांच्यासाठी अल्ट्रोझ सीएनजी एएमटी हा एक उत्तम पर्याय ठरणार आहे.
ऑटोमॅटिक टेक्नोलॉजीचा नेमका फायदा काय?
सीएनजी ऑटोमॅटिक कार सध्या भारतीय बाजारपेठेत लोकप्रिय होत आहेत. साधारणपणे सीएनजी कारमध्ये मॅन्युअल गिअरबॉक्स असतो, ज्यामुळे ट्रॅफिकमध्ये वारंवार क्लच दाबावा लागतो. पण ऑटोमॅटिक टेक्नोलॉजीमुळे तुम्हाला वारंवार क्लच दाबण्याची किंवा गिअर बदलण्याची गरज पडत नाही. पेट्रोल ऑटोमॅटिक कारच्या तुलनेत सीएनजी ऑटोमॅटिक कार चालवण्याचा खर्च खूपच कमी असतो.