SSC Exam Result 2026: दहावीत मराठीचा 'टक्का' घसरला; महाराष्ट्रात तब्बल ९४ हजार विद्यार्थी नापास

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2026 11:06 IST2026-05-09T11:05:41+5:302026-05-09T11:06:19+5:30

SSC Exam Result 2026 मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर मराठी माणसांना विचार करायला लावणारी ही आकडेवारी असल्याचे दिसून येत आहे

SSC Exam Result 2026 Marathi's 'percentage' drops in 10th standard; As many as 94 thousand students fail in Maharashtra | SSC Exam Result 2026: दहावीत मराठीचा 'टक्का' घसरला; महाराष्ट्रात तब्बल ९४ हजार विद्यार्थी नापास

SSC Exam Result 2026: दहावीत मराठीचा 'टक्का' घसरला; महाराष्ट्रात तब्बल ९४ हजार विद्यार्थी नापास

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्चमध्ये झालेल्या दहावीत १५ लाख ४२ हजार ४७२ पैकी १० लाख ८७ हजार ६९९ विद्यार्थ्यांनी पहिली भाषा म्हणून मराठीचा पर्याय निवडला हाेता. त्यापैकी १० लाख ०६ हजार ८९६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. याची सरासरी टक्केवारी ९२.५७ टक्के इतकी आहे. याचाच अर्थ महाराष्ट्रात राहणारे, राज्य बाेर्डाची परीक्षा देणारे तब्ब्ल ८० हजार ८०३ विद्यार्थीमराठी विषयात नापास झाले आहेत. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर मराठी माणसांना विचार करायला लावणारी ही आकडेवारी असल्याचे दिसून येत आहे. सर्वात कमी हिंदी भाषेचा ८९.६९ टक्के निकाल लागला आहे.

याचबराेबर दुसरी भाषा म्हणून मराठी भाषेची निवड केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ४ लाख १५ हजार ४७३ इतकी हाेती. त्यातील ४ लाख १३ हजार ९१७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ४ लाख १७६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. याची टक्केवारी ९६.६८ इतकी आहे. याचाच अर्थ दुसरी भाषा म्हणून मराठी भाषेची निवड केलेल्यांपैकी १३ हजार ७४१ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. ही माहिती राज्य मंडळाने दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवारी (दि. ८) जाहीर केलेल्या निकालातून स्पष्ट झाली आहे. यात राज्याचा एकूण निकाल ९२.०९ टक्के लागला असून, गतवर्षीच्या तुलनेत यात २.०१ टक्क्याने घट झाली आहे.

इतर भाषेचा विचार करता तेलुगू, सिंधी आणि बंगाली या भाषेला पहिली भाषा म्हणून निवड केलेल्या विद्यार्थीसंख्या कमी असली, तरी निकाल शंभर टक्के लागला आहे. त्यानंतर इंग्रजी ही भाषा प्रथम भाषा म्हणून निवड केलेल्या विद्यार्थ्यांचा नंबर लागताे. इंग्रजी भाषेची टक्केवारी ९७.८८ आहे. दुसरी भाषा म्हणून इंग्रजी निवडलेल्या विद्यार्थ्यांचा निकालही ९२.११ टक्के आहे. मागील पाच वर्षांचा भाषा विषयनिहाय निकालाची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला, पण तशी माहिती उपलब्ध नसल्याचे राज्य बाेर्डाने सांगितले.

पहिली भाषा निवडलेल्या विद्यार्थ्यांचा विषयनिहाय निकाल

भाषा - परीक्षेसाठी नोंदणी - प्रविष्ट - उत्तीर्ण - टक्केवारी

मराठी - १०,९८,६२३ - १०,८७,६९९ - १०,०६,८९६ - ९२.५७
इंग्रजी - ३,६६,००६ - ३,६५,२०३ - ३,५७,४४७ - ९७.८८

हिंदी - ३६,७६२ - ३६,१७६ - ३२,४४७ - ८९.६९
उर्दू - ९३,३४७ - ९२,४४२ - ८८,२५६ - ९५.४७

गुजराती - १,२१९ - १,१९० - १,१२१ - ९४.२०
कन्नड - २,७२१ - २,६१३ - २,४०० - ९१.८५

तमिळ - २२१ - २१४ - २०७ - ९६.७३
तेलुगू - १२० - १२० - १२० - १००

सिंधी - १० - १० - १० - १००
बंगाली - ९ - ९ - ९ - १००

दुसरी व तिसरी भाषा निवडलेल्या विद्यार्थ्यांचा विषयनिहाय निकाल

भाषा - परीक्षेसाठी नोंदणी - प्रविष्ट - उत्तीर्ण - टक्केवारी

मराठी - ४,१५,४७३ - ४,१३,९१७ - ४,००,१७६ - ९६.६८

हिंदी - १२,३०,७०७ - १२,१९,४८८ - ११,३१,०२९ - ९२.७५
इंग्रजी - १२,३१,९७४ - १२,१९,४९१ - ११,२३,३२३ - ९२.११

उर्दू - ४ - ४ - १ - २५
गुजराती - ३०२ - ३०२ - ३०२ - १००

कन्नड - १ - ० - ०- ०
तमिळ - १ - १ - १ - १००

संस्कृत - ९६,४१३ - ९६,३३१ - ९५,५७१ - ९९.२१
पाली - २६१ - २६० - २५९ - ९९.६२

अरबी - २४६ - २४६ - २४५ - ९९.५९

Web Title : एसएससी परिणाम 2026: मराठी में गिरावट; महाराष्ट्र में 94,000 विफल।

Web Summary : एसएससी 2026 के नतीजों में मराठी भाषा के अंक गिरे, 80,000 से ज़्यादा छात्र पहली भाषा में और 13,000 दूसरी भाषा में फ़ेल हुए। कुल पास प्रतिशत 2.01% घटकर 92.09% हो गया। तेलुगु, सिंधी, और बंगाली जैसी अन्य भाषाओं में 100% परिणाम प्राप्त हुए।

Web Title : SSC Result 2026: Marathi scores decline; 94,000 fail in Maharashtra.

Web Summary : Marathi language scores dipped in the SSC 2026 results, with over 80,000 students failing the first language exam and over 13,000 failing the second. Overall pass percentage decreased by 2.01% to 92.09%. Other languages like Telugu, Sindhi, and Bengali achieved 100% results.