SSC Exam Result 2026: आज दहावीचा निकाल! दुपारी १ वाजता ऑनलाइन जाहीर होणार, निकाल कुठे पाहाल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 10:00 IST2026-05-08T10:00:17+5:302026-05-08T10:00:35+5:30

SSC Exam Result 2026 राज्यातील एकूण २३ हजार ६८३ शाळांमधून विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, संपूर्ण राज्यातील पाच हजार १११ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली

SSC Exam Result 2026 Class 10th results today! Will be announced online at 1 pm, where will you see the results? | SSC Exam Result 2026: आज दहावीचा निकाल! दुपारी १ वाजता ऑनलाइन जाहीर होणार, निकाल कुठे पाहाल?

SSC Exam Result 2026: आज दहावीचा निकाल! दुपारी १ वाजता ऑनलाइन जाहीर होणार, निकाल कुठे पाहाल?

पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीच्या (एसएससी) फेब्रुवारी-मार्च २०२६ परीक्षेचा निकाल आज, शुक्रवार (दि.८) रोजी दुपारी १:०० वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात येणारी दहावीची परीक्षा २० फेब्रुवारी ते १८ मार्चदरम्यान आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेसाठी आठ लाख ६५ हजार ७४० विद्यार्थी, सात लाख ४९ हजार ७३६ विद्यार्थिनी आणि १५ तृतीयपंथी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. राज्यातील एकूण २३ हजार ६८३ शाळांमधून विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, संपूर्ण राज्यातील पाच हजार १११ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली.

निकाल कुठे पाहाल?

विद्यार्थ्यांना आपला निकाल राज्य मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर पाहता येणार आहे.

1. https://results.digilocker.gov.in
2. https://mahahsscboard.in
3. https://sscresult.mkcl.org

त्याचप्रमाणे डीजीलॉकर ॲपमध्ये डिजिटल गुणपत्रिका संग्रहित करून ठेवण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तसेच https://mahahsscboard.in (in school login) या संकेतस्थळावर शाळांना त्यांच्या शाळांचा एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

Web Title : SSC परीक्षा परिणाम 2026: दसवीं का परिणाम आज! दोपहर 1 बजे ऑनलाइन

Web Summary : महाराष्ट्र एसएससी परिणाम आज, शुक्रवार, दोपहर 1 बजे ऑनलाइन घोषित किए जाएंगे। फरवरी-मार्च में हुई परीक्षाओं के लिए आठ लाख से अधिक छात्रों ने पंजीकरण कराया था। परिणाम digilocker.gov.in, mahahsscboard.in और sscresult.mkcl.org पर उपलब्ध।

Web Title : SSC Exam Result 2026: Tenth Result Today! Online at 1 PM

Web Summary : Maharashtra SSC results will be declared online today, Friday, at 1 PM. Over eight lakh students registered for the February-March exams, held at 5,111 centers. Results available on digilocker.gov.in, mahahsscboard.in, and sscresult.mkcl.org.