महिला डॉक्टरांच्या स्नानगृहात छुपा स्पाय कॅमेरा प्रकरण : 'त्या' डॉक्टराबाबत धक्कादायक बाब समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2021 22:44 IST2021-07-14T22:44:17+5:302021-07-14T22:44:57+5:30

भारती विद्यापीठ परिसरातील प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरांच्या स्नानगृह व शयनकक्षात छुपा स्पाय कॅमेरा लावणारा एमडी डॉक्टरच निघाल्याने एकच खळबळ उडाली होती.

Spy camera case hidden in female doctor's bathroom: Police investigation reveals shocking matter about 'that' doctor | महिला डॉक्टरांच्या स्नानगृहात छुपा स्पाय कॅमेरा प्रकरण : 'त्या' डॉक्टराबाबत धक्कादायक बाब समोर

महिला डॉक्टरांच्या स्नानगृहात छुपा स्पाय कॅमेरा प्रकरण : 'त्या' डॉक्टराबाबत धक्कादायक बाब समोर

पुणे : भारती विद्यापीठ परिसरातील एका प्रशिक्षणार्थी डॉक्टर महिलेच्या स्नानगृह व शयनकक्षात स्पाय कॅमेरा लावणाऱ्या सुजित जगताप या डॉक्टराने या घटनेपूर्वी ८ दिवस अगोदर अशाप्रकारे स्पाय कॅमेरा लावल्याचे उघडकीस आले आहे.

डॉ. सुजित आबाजीराव जगताप (वय ४२, रा. सिंहगड रोड) असे या डॉक्टरचे नाव आहे. सुजित जगताप हा मेंदूविकारतज्ञ आहे. तो तेथील महाविद्यालया लेक्चर घेण्यासाठी नेहमी जातो. त्यावरुन त्याची तेथील प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरांशी चांगली ओळख झाली होती. विद्यार्थीनी आणि प्राध्यापक या नात्याने त्याने त्यांच्याशी बोलताना नकळत त्यांच्या रुमची चावीचे ठसे घेतले होते. त्याद्वारे त्याने त्यांच्या रुमची डुप्लिकेट चावी तयार करुन घेतली होती. त्यानंतर त्याने ॲमेझॉनवरुन कॅमेरा असलेले बल्ब खरेदी केले. त्याचे सेटिंग कसे असते, याचे प्रात्याक्षिक त्याने स्वत:च्या घरी केले होते. त्यानंतर या घटनेच्या अगोदर ८ दिवसांपूर्वी त्याने या महिला डॉक्टर हॉस्पिटलमध्ये असल्याचे पाहून बनावट चावीद्वारे रुम उघडून त्यांच्या स्नानगृह व बेडरुममध्ये हे कॅमेरा असलेले बल्ब लावले होते. त्यानंतर तो पुन्हा दुसर्या दिवशी अशाच प्रकारे त्यांच्या रुममध्ये गेला होता. त्याने ते बल्ब काढून घेतले. त्यानंतर घरी येऊन ते पाहिले. मात्र, त्यात रेकॉर्डिंग झाले नसल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यानंतर त्याने ६ जुलै रोजी पुन्हा दुपारच्या वेळी त्यांच्या रुममध्ये जाऊन हे बल्ब लावले. मात्र, यावेळी या महिला डॉक्टरांच्या हा प्रकार वेळीच लक्षात आला. त्यांनी पोलिसांकडे धाव घेतले.

भारती विद्यापीठ पोलिसांनी त्याच्याकडे केलेल्या चौकशीत हा प्रकार नव्याने समोर आला आहे.
याबाबत पोलीस निरीक्षक संगिता यादव यांनी सांगितले की, सुजित जगताप याने ओळखीतून बनावट चावी तयार करुन घेतली होती. त्याद्वारे तो त्यांच्या नकळत रुममध्ये शिरला होता. हे घृणास्पद कृत्य करण्यामागे काय उद्देश होता. याबाबत तो अजूनही काहीही सांगत नाही. यातील स्पाय कॅमेरा व अन्य साहित्य तपासणीसाठी पाठविण्यात येत आहे

Web Title: Spy camera case hidden in female doctor's bathroom: Police investigation reveals shocking matter about 'that' doctor