शहरं
Join us  
Trending Stories
1
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
2
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
3
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
4
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
5
“प्रियंका चोप्रामुळे राघव चड्ढा यांचा भाजपात प्रवेश”; नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नीचा मोठा दावा
6
धक्कादायक! नाशिक, अमरावतीसारखा प्रकार कोल्हापुरात; तरुणींचे Video बनवून ब्लॅकमेल, तरुणाला अटक
7
Budh Pradosh 2026: कर्जमुक्ती आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी २९ एप्रिलला न चुकता करा 'बुध प्रदोष' व्रत
8
Top Marathi News LIVE Updates: १ मेपासून मराठीची मोहीम सुरूच राहणार; मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
9
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
10
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
11
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
12
गोलsss... पंतप्रधान नरेंद्र मोदी सिक्कीमच्या तरुणांसोबत खेळले फुटबॉल, PHOTOS ची रंगली चर्चा
13
वाढदिवसासाठी Reel तयार करण्याच्या नादात युवकाने भलताच उद्योग केला; शेवटी हातात पडल्या बेड्या
14
Adhar Card : मोठा बदल! आता आधार कार्ड तुमचे वय सिद्ध करणार नाही, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'ही' कागदपत्रे दाखवावी लागणार
15
कलमा वाचता येतो का? विचारले अन् सुरक्षा रक्षकांवर चालवला चाकू; मीरा रोडच्या हल्ल्यात 'लोन वुल्फ'चा संशय
16
Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांची २०२६-२७ मध्ये मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी; भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं?
17
‘RTE’ प्रवेश! पसंतीच्या शाळेसाठी पालकांची कोंडी; ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ, तरीही संभ्रम कायम
18
तुमच्या छोट्याशा बाल्कनीला, खिडकीला द्या 'ग्रीन टच'; कमी जागेत बाग फुलवण्याच्या 'मास्टर ट्रिक'
19
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
20
हृदयद्रावक! IPL सामना पाहून घरी परतणाऱ्या २ भावांवर काळाचा घाला; 'हिट अँड रन'मध्ये मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

लक्ष्मीनगर, येरवडा परिसरात सहा दुचाकी जाळल्या; तीन संशयित ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2020 13:35 IST

पुणे (येरवडा) : येरवड्यातील लक्ष्मीनगर परिसरात सराईत गुन्हेगारांनी शुक्रवारी पहाटे सहा चाकी पेटवून दिल्या. गाड्या उभ्या करण्याच्या वादातून हा ...

ठळक मुद्देयाप्रकरणी पोलिसांनी संबंधित आरोपींविरुद्ध केला गुन्हा दाखल

पुणे (येरवडा) : येरवड्यातील लक्ष्मीनगर परिसरात सराईत गुन्हेगारांनी शुक्रवारी पहाटे सहा चाकी पेटवून दिल्या. गाड्या उभ्या करण्याच्या वादातून हा प्रकार घडल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी सोमनाथ सोपान गायकवाड यांनी फिर्याद दिली असून तीन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.   लक्ष्मीनगर येथील संतोष मित्र मंडळजवळ शुक्रवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास दुचाकी पेटवल्या असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. घराबाहेर दुचाकी उभी करण्याच्या वादातून स्थानिक सराईत आरोपींनी हा प्रकार केल्याचे समजते. रात्रगस्त अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक बलभीम ननावरे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. या घटनेत 6 दुचाकीसह एक सायकल जाळण्यात आली  आहे.

याप्रकरणी पोलिसांनी संबंधित आरोपींविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल केला असून संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. घटनास्थळी गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त बच्चन सिंग, सहाय्यक पोलीस आयुक्त (येरवडा) किशोर जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त  (गुन्हे)लक्ष्मण बोराटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस शेख गुन्हे निरीक्षक अजय वाघमारे, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अंजुम बागवान यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या. लक्ष्मीनगर परिसरातील सराईत गुन्हेगारांनी दहशत पसरविण्यासाठी हे कृत्य केल्याचे समजते. आगामी काळात येरवडा परिसरातील सराईत गुन्हेगारांची दहशत कमी करण्यासाठी येरवडा पोलिसांनी कठोर कारवाईचे आदेश सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर जाधव यांनी दिले आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मंगेश भांगे करत आहेत.

टॅग्स :Puneपुणेtwo wheelerटू व्हीलरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक