शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
5
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
6
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
7
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
8
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
9
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
10
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
11
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
12
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
13
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
14
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
15
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
16
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
17
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
18
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
19
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
20
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

अभियांत्रिकीचे द्वितीय वर्षाचे वर्ग फुल

By admin | Updated: September 25, 2015 00:51 IST

बारावी आणि सीईटी परीक्षेतून सूट मिळवूनही अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होत चालली आहे

पुणे : बारावी आणि सीईटी परीक्षेतून सूट मिळवूनही अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. त्यामुळे अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षाच्या वर्गातील विद्यार्थी संख्येच्या तुलनेत द्वितीय वर्षाच्या वर्गांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक असल्याची माहिती समोर आली आहे. त्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पदवी मिळविण्यासाठी पुणे विभागाबाहेरील विद्यार्थी प्रवेशासाठी येत असल्याचेही दिसून येत आहे.काही पालकांनी आपल्या मुलाने इंजिनिअरच व्हावे, असे निश्चित केलेले असते. त्यामुळे दहावी उत्तीर्ण झालेले बहुतेक विद्यार्थी दहावीनंतरच्या पॉलिटेक्निक अभ्यासक्रमास प्रवेश घेतात. पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाची पदवी मिळविल्यानंतर त्यांना थेट द्वितीय वर्षाच्या अभियांत्रिकी अभ्यासक्रमास प्रवेश मिळतो. त्यामुळे या विद्यार्थ्यांना बारावीच्या परीक्षेचा अभ्यास करावा लागत नाही. शैक्षणिक वर्ष २०१५-१६ मध्ये पुणे विभागात थेट द्वितीय वर्षातील अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या ४३ हजार ९३२ जागा उपलब्ध होत्या. या जागांसाठी २२ हजार ६०७ विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता. या सर्व विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलाच, शिवाय पुण्याबाहेरील तब्बल सहा हजार विद्यार्थ्यांनी पुणे विभागातील विविध महाविद्यालयांत प्रवेश घेतला. पुणे विभागीय तंत्र शिक्षण विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसर लोणावळा येथील विद्या प्रसारणी सभेच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रथम वर्षास ३० विद्यार्थ्यांनी, तर द्वितीय वर्षास १४७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. तळेगाव येथील डी.वाय. पाटील महाविद्यालयात प्रथम वर्षास ५५, तर द्वितीय वर्षात २७७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. केवळ पुण्यातच नाही, तर कोल्हापूर, सोलापूर आदी विद्यापीठांतर्गत येणाऱ्या काही महाविद्यालयांमध्ये हीच स्थिती आहे.