शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
5
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
6
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
7
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
8
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
9
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
10
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
11
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
12
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
13
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
14
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
15
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
16
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
17
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
18
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
19
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
20
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

शाळा सुरू झाली दप्तर मात्र रिकामेच!

By admin | Updated: July 3, 2014 05:40 IST

नेमिची येतो पावसाळा’ या उक्तीप्रमाणे दर वर्षी शिक्षण मंडळाच्या धिम्या गतीच्या कारभारामुळे विद्यार्थ्यांना वेळेवर शैक्षणिक साहित्य उपलब्ध होत नाही

पुणे : ‘नेमिची येतो पावसाळा’ या उक्तीप्रमाणे दर वर्षी शिक्षण मंडळाच्या धिम्या गतीच्या कारभारामुळे विद्यार्थ्यांना वेळेवर शैक्षणिक साहित्य उपलब्ध होत नाही. याही वर्षी महापालिकेच्या सर्व शाळा सुरू होऊन तीन आठवडे झाले, तरीही विद्यार्थ्यांना वही, पेन्सील, कंपास, रंगपेटी, विज्ञान व चित्रकला वही आदी शैक्षणिक साहित्य मिळालेले नाही.महापालिकेच्या ३१० शाळांतील विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी गणवेश व शैक्षणिक साहित्य देण्याची घोषणा दर वर्षी केली जाते. त्यानुसार महापालिकेमार्फत शिक्षण मंडळाचा अर्थसंकल्प अगोदर तीन महिने (डिसेंबरअखेर) मंजूर केला जातो. २०१४-१५च्या अर्थसंकल्पात १ कोटी ६० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. त्यानुसार शैक्षणिक साहित्य खरेदीची प्रक्रिया जानेवारी ते मार्चअखेर पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु, शिक्षण मंडळाने जानेवारीमध्ये राबविलेल्या पहिल्या निविदा प्रक्रियेत ठेकेदारांनी प्रत्येक वहीसाठी २९ ते ३० रुपयांचा दर दिला होता. मात्र, ही किमत दुप्पट असून, शिक्षण मंडळाचे नुकसान करणारा असल्याचा आपेक्ष स्वयंसेवी संस्थांनी घेतला होता. अखेर पहिली निविदा प्रक्रिया रद्द करून आयुक्त विकास देशमुख यांनी नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्याचे आदेश दिले होते. मात्र, संपूर्ण प्रक्रिया प्रशासनामार्फत राबविली जात असल्याने शिक्षण मंडळातील कारभाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे महापालिकेच्या सर्व शाळा १६ जूनला सुरू झाल्या, तरी वह्यांसह शैक्षणिक साहित्याचा अद्याप पत्ताच नाही. त्यामुळे महापालिकेचे लाखो विद्यार्थी शैक्षणिक साहित्याशिवाय तीन आठवड्यांपासून शाळेत शिकत असल्याची गंभीर बाब उजेडात आली आहे. (प्रतिनिधी)